Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Syria War: सीरियात अमेरिकेचा ‘गेम ओव्हर’! तेल आणि वायूचे साठे सरकारच्या ताब्यात; USच्या पाठिंब्यावर चालणाऱ्या ‘SDF’ने टेकले गुडघे

Syrian Army: सीरियातील अमेरिकेच्या सेंट्रल कमांडला मोठा धक्का बसला आहे. सीरियन सैन्याने रक्का आणि देईर एझ-झोर सारख्या मोक्याच्या शहरांवर नियंत्रण मिळवले आहे आणि एसडीएफचे विघटन करण्यासाठी एक करार झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 19, 2026 | 07:36 PM
Syrian Army captures Raqqa and Deir ez-Zor 2026SDF integration into Syrian Army agreement

Syrian Army captures Raqqa and Deir ez-Zor 2026SDF integration into Syrian Army agreement

Follow Us
Close
Follow Us:
  • लष्करी विजय
  • ऐतिहासिक करार
  • अमेरिकेला धक्का

 मध्यपूर्वेतील राजकारणाने आज एक मोठे वळण घेतले आहे. सीरियामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेचा सर्वात मोठा मित्र राहिलेली ‘सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’ (SDF) आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. सीरियाचे अध्यक्ष अहमद अल-शारा आणि एसडीएफ प्रमुख मज्लूम अब्दी यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण करारानंतर, सीरियन सरकारी लष्कराने देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागातील प्रमुख प्रांतांवर ताबा मिळवला आहे. या घटनेला अमेरिकन सेंट्रल कमांडचे (CENTCOM) मोठे रणनीतिक अपयश मानले जात आहे.

रक्का आणि देईर एझ-झोरमध्ये विजयाचा जल्लोष

१८ आणि १९ जानेवारी २०२६ च्या दरम्यान सीरियन लष्कराने वेगवान हालचाली करत रक्का आणि देईर एझ-झोर या प्रांतांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. हे क्षेत्र सीरियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण देशातील सर्वात मोठे तेल साठे (Al-Omar Oil Field) आणि गॅस प्लांट (Conoco Gas Plant) याच भागात आहेत. एसडीएफने युफ्रेटिस नदीच्या पूर्व किनाऱ्यावरून माघार घेताच, स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून सीरियन लष्कराचे स्वागत केले. अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर ही शहरे पुन्हा एकदा दमिश्कच्या थेट नियंत्रणाखाली आली आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Human Rights: इस्लामचा रक्षक की भक्षक? ‘मशिदींच्या भिंती बोलू लागल्या, कुराणेही जाळली’; बलुच नेत्याने केला पाकिस्तानचा पर्दाफाश

अहमद अल-शारा आणि एसडीएफमधील ‘१४ कलमी’ करार

अध्यक्ष अल-शारा यांनी जाहीर केलेल्या नवीन करारानुसार, सीरियाच्या एकात्मतेसाठी एसडीएफने शरणागती पत्करली आहे. या करारातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

  • सैन्य विलीनीकरण: एसडीएफचे सुमारे ५०,००० सैनिक वैयक्तिक स्तरावर सीरियन संरक्षण आणि गृह मंत्रालयाच्या दलांमध्ये सामील केले जातील.
  • प्रशासकीय ताबा: सर्व सीमा चौक्या, सरकारी संस्था, तेल साठे आणि धरणे (तब्का डॅम) तातडीने सरकारकडे हस्तांतरित होतील.
  • कुर्द हक्क: सीरियाच्या नवीन संविधानात कुर्द नागरिकांच्या भाषेला आणि सांस्कृतिक हक्कांना अधिकृत मान्यता दिली जाईल.
  • ISIS कैदी: अल-होल सारख्या छावण्यांमधील हजारो आयएसआयएस (ISIS) कैद्यांची जबाबदारी आता सीरियन सरकारकडे असेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Ranking: ड्रॅगनची कमाल! संपूर्ण जगात जिथे हार्वर्डच होता शिक्षणविश्वाचा निर्विवाद सम्राट, तिथेच चीनने फडकवला विजयध्वज

सेंटकॉमचे ‘रणनीतिक अपयश’ आणि अफगाणिस्तानची आठवण

सीरियातील ही परिस्थिती अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याचे तज्ज्ञ मानत आहेत. ज्याप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने अब्जावधी डॉलर्स खर्च करूनही तालिबानने सत्ता काबीज केली, तसेच काहीसे चित्र सीरियामध्ये दिसत आहे. अमेरिकेने ज्या ‘एसडीएफ’ला सीरियाचे भविष्य मानले होते, त्यांनी रशिया आणि तुर्कीच्या दबावापुढे शरणागती पत्करली. यामुळे मध्यपूर्वेतील अमेरिकेची विश्वासार्हता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे.

जनतेचे समर्थन आणि अरब जमातींचा सहभाग

विशेष म्हणजे, केवळ लष्करी बळावर नाही तर स्थानिक लोकसमूहाच्या पाठिंब्यावर सरकारने हा विजय मिळवला आहे. देईर एझ-झोरमधील अनेक अरब जमातींनी (Tribal Forces) एसडीएफच्या विरोधात जाऊन सीरियन लष्कराला सहकार्य केले. “आम्हाला पुन्हा एकदा एका छत्राखाली राहायचे आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे सीरियामध्ये गृहयुद्ध संपून शांतता प्रस्थापित होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसडीएफ (SDF) आता सीरियन सैन्यात का विलीन होत आहे?

    Ans: अध्यक्ष अहमद अल-शारा आणि एसडीएफ प्रमुख यांच्यात झालेल्या करारानुसार, सीरियाची अखंडता टिकवण्यासाठी आणि लष्करी संघर्ष थांबवण्यासाठी एसडीएफने विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे.

  • Que: या करारामुळे अमेरिकेच्या स्थानावर काय परिणाम होईल?

    Ans: अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी भागीदार (SDF) आता सरकारी दलात सामील झाल्याने, सीरियातील अमेरिकेचा प्रभाव कमी झाला असून हे एक मोठे रणनीतिक अपयश मानले जात आहे.

  • Que: सीरियातील तेल साठ्यांचे नियंत्रण आता कोणाकडे आहे?

    Ans: अल-ओमर आणि कोनोको यांसारख्या मोठ्या तेल आणि वायू क्षेत्रांचे नियंत्रण आता पूर्णपणे सीरियन सरकारी लष्कराकडे हस्तांतरित झाले आहे.

Web Title: Syrian army captures raqqa deir ez zor sdf integration deal us centcom failure 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 07:36 PM

Topics:  

  • Syria
  • syria news

संबंधित बातम्या

Global Ranking: ड्रॅगनची कमाल! संपूर्ण जगात जिथे हार्वर्डच होता शिक्षणविश्वाचा निर्विवाद सम्राट, तिथेच चीनने फडकवला विजयध्वज
1

Global Ranking: ड्रॅगनची कमाल! संपूर्ण जगात जिथे हार्वर्डच होता शिक्षणविश्वाचा निर्विवाद सम्राट, तिथेच चीनने फडकवला विजयध्वज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.