Finally Tahawwur Rana in custody Pakistan's veil will be torn
Tahawwur Rana Extradition : जेव्हा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याला अमेरिकेतून राष्ट्रीय सुरक्षा – संस्थेच्या (एआयए) दिल्ली येथे आणले, अगदी त्याच वेळी पाकिस्तानच्या सरकारने राणापासून सुटका करून घेण्यासाठी सुरूवात केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी सांगितले की, तहव्वुर राणा पाकिस्तानचा नसून कॅनडाचा नागरिक आहे आणि त्याने मागील २ दशकापासून पाकिस्तानी दस्तावेजाचे नुतनीकरण केले नव्हते. राणाजवळ कॅनडाचे नागरिकत्व आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, ६४ वर्षीय तहव्वुर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनडीयन नागरिक आहे. त्याचा जन्म के कॅनडामध्ये झाला होता आणि पाकिस्तानी सेनेमध्ये त्याने अनेक वर्षे डॉक्टर म्हणून काम केले आहे. याच कालावधीत तो भारतविरोधी झाला.
पाकिस्तानला हे ठाऊक आहे की, जेव्हा चौकशी संस्था राणाची चौकशी करतील, तेव्हा २६/११ च्या हल्ल्याबाबत पाकिस्तान उघडा पडेल. अमेरिकेच्या न्यायालयीन दस्तावेजानुसार तहव्वुर राणा कॅनडामध्ये जेव्हा राहत होता, तेव्हा तो पाकिस्तानला जात होता आणि या दरम्यान त्याचे पाकिस्तानी सेनेसोबत संबंध होते. राणाला दिल्लीच्या तिहार तुरूंगात कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. दहशतवादी राणाला एआयएच्या अधिका-यांनी विचारपूस सुरू केलेली आहे. राणाच्या या चौकशीची रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे, त्यामुळे पाकिस्तान आता घाबरलेला आहे. ७ मार्च २०२५ ला अमेरिकेच्या सर्वोच्च गन्यायालयाने राणाची भारतात पाठविण्यासंबंधीची याचिका फेटाळून लावली होती. या याचिकेत राणाने नमूद केले होते की, ‘मी पाकिस्तानी मुसलमान आहे आणि म्हणून जर मला भारतात पाठविले तर मला ठार केले जाईल’.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिका-चीन Tariff War घमासान; कोण घेणार माघार अन् वरचढ?
अमेरिकेत १४ वर्षांची शिक्षा
२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत जो भीषण अतिरेकी हल्ला झाला होता, त्या हल्ल्यात १६६ निरपराध नागरिकांचा बळी गेला होता तर ३०० लोक जखमी झाले होते. या हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक तहव्वुर हुसेन राणा होता. राणा हा २०१३ मध्ये डेविड कोलमन हेडलीसोबत मुंबई हल्ल्याचा आरोपी आणि डेनमार्कमध्ये हल्ल्याची योजना तयार करण्याचा दोषी होता. यावरून अमेरिकेच्या न्यायालयाने त्याला १४ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान मुंबई हल्ल्यात ६ अमेरिकन नागरिक ठार झाले होते आणि म्हणूनच अमेरिकेची चौकशी संस्था एफबीआय हल्लेखोरांची कसून चौकशी करीत होती. याच कालावधीत राणा आणि हेडलीला ऑक्टोबर २००९ मध्ये शिकागो विमानतळावर अटक करण्यात आली होती. तेव्हा हे दोघेही मोठा हल्ला करण्यासाठी डेन्मार्कला जात होते.
लष्कर-ए-तोयबासोबत संबंध
तेव्हापर्यंत कोणालाच माहिती नव्हती की, हे २६/११ च्या हल्ल्यातील दोषी आहेत, परंतु त्यांना अटक झाल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत हे स्पष्ट झाले की, राणा आणि हेडली हे दोघेही पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या शिबिरात प्रशिक्षण घेण्यासाठी जात होते. मुंबईवर हल्ला करण्याची कामगिरी लष्कर-ए-तोयबाने डॅवहिड केलमन हेडलीवर सोपविली होती. यावेळी हेडलीला ५ वर्षाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी राणाने मदत केली होती. हेडली आणि राणा हे बालपणाचे मित्र होते. दोघांनीही लहानपणी ५ वर्षेपर्यंत सोबतच शिक्षण घेतले. त्यानंतर दोघेही वेगवेगळे झाले आणि त्यानंतर २००६ मध्ये दोघांचीही शिकागो येथे भेट झाली. २८ ऑगस्ट २०१८ रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने राणाविरूद्ध अटक वारंट जारी केले होते. १० एप्रिल २०२५ ला राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताने डाव टाकला, बांगलादेशची केली गळचेपी; आर्थिक नुकसान अनिवार्य
राणाला भारतात परत आणणे हे भारत सरकारचे मोठे यश आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधाना यामुळे आणखी बळकटी येण्याची शक्यता आहे. राणाच्या प्रत्यार्पणामुळे २६/११ च्या हल्ल्याचे कारस्थान उघड तर होईलच शिवाय भारताविरूद्ध पाकिस्तानच्या ताकवाआगी उघड होईल. ही कारवाई निश्चितच भविष्यातील अतिरेकी कारवाया रोखण्यास भारतीय सुरक्षा संस्थांना सहाय्यभूत ठरेल.