Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत; चीनने केली नाराजी व्यक्त म्हणाला…

तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते सध्या पॅसिफिक बेटांच्या आठवड्याभराच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी अमेरिकेच्या हवाई प्रांतातून सुरूवात केली. अमेरिकेने केलेल्या त्यांच्या स्वागताने चीनने नाराजी व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 02, 2024 | 12:01 PM
अमेरिकेत तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत; चीनने केली नाराजी व्यक्त म्हणाला...

अमेरिकेत तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत; चीनने केली नाराजी व्यक्त म्हणाला...

Follow Us
Follow Us:

तापेइ: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते सध्या पॅसिफिक बेटांच्या आठवड्याभराच्या दौऱ्यावर आहेत. लाइ चिंग-ते यांनी अमेरिकेच्या हवाई मधून आपल्या दौऱ्याची सुरूवात केली. हावाईमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान अमेरिकेने तैवानला अधिक शस्त्रास्त्रे विकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे चीन अमेरेकेच्या या मदतीने चीन संतापला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूएस स्टेट डिपार्टमेंटने तैवानला $385 दशलक्ष किमतीचे स्पेयर पार्ट्स , F-16 जेट आणि रडारसाठी मदत मंजूर केली आहे. या मदतीचा चीनने तीव्र विरोध केला आहे.

संपूर्ण घटनेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल- चीन

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संपूर्ण घटनेवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि देशाच्या सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. चीनने अमेरिकेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत स्पष्ट केले आहे की, तैवानच्या स्वतंत्र दलाला चुकीचा संदेश दिला जात आहे. त्यांनी सूडबुद्धीने कारवाई करण्याचा इशाराही दिला. तसेच चीनने स्पष्ट केले आहे की, या मदतीचे अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Violence: चिन्मय दास यांच्या जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

अमेरिका आणि तैवानने युद्ध रोखण्यासाठी एकत्र यावे

तर, दुसरीकडे तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते  यांनी हवाईतील पर्ल हार्बर येथे यूएसए ऍरिझोना मेमोरियलला भेट दिली. तेथे त्यांनी शांततेचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले की, अमेरिका आणि तैवानने युद्ध रोखण्यासाठी एकत्र काम करायला हवे. युद्धात कोणाचाही विजय होत नाही, शांतता अमूल्य आहे असे त्यांनी म्हटले. लाइ चिंग-ते पुढील काही दिवसांमध्ये मार्शल बेटे, तुवालू आणि पलाऊलाही भेट देणार आहेत. या राष्ट्रांनी तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे या भागांमध्ये तैवानचा प्रभाव वाढवणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

चीनला तैवानवर कब्जा करायचा आहे

चीन तैवानला आपला हिस्सा मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो. त्यामुळे चीनला तैवानवर कब्जा करायचा आहे. तैवानवर वर्चस्व मिळवून चीन पश्चिम प्रशांत महासागरात आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतो, यामुळे अमेरिकेच्या हवाई व गुआमसारख्या लष्करी तळांना धोका निर्माण होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.

यामुळे चीन-अमेरिका संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, तैवान हा अत्याधुनिक सेमीकंडक्टर उत्पादनात अग्रगण्य असल्याने त्याचे आर्थिक महत्त्वही प्रचंड आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, तैवान व अमेरिका यांचे संबंध अधिक दृढ होत आहेत, तर चीनने आपली नाराजी व्यक्त करत प्रतिकाराची भूमिका घेतली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कॅनडा खलिस्तानींचा हिंदूंना पुन्हा एकदा विरोध; मंदिराबाहेर भारतविरोधी घोषणाबाजी

Web Title: Taiwan president ching te in america cina got angry nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 12:00 PM

Topics:  

  • America
  • China
  • world

संबंधित बातम्या

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?
1

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?

China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी
2

China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
3

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?
4

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.