फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ओटावा: कॅनडात पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थकांनी भारतीयांना विरोध दर्शवला आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाच्या भेटीनंतर पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थकांनी भारतविरोधात नारेबाजी केली. मिळालेल्या माहितीनुसार,ग्रेटर टोरंटो भागातील लक्ष्मी नारायण मंदिराच्या बाहेर भारतीय वाणिज्या दूतावासाने आयोजित केलेल्या कांऊन्सलर शिबिरादरम्यान खलिस्तान समर्थकांनी आंदोलने केली आहेत. या वाग्रस्त कृतींमुळे पुन्हा एकदा भारत-कॅनडा संबंधावर वादळ निर्माण झाले आहे.
भारतीय वाणिज्य दूतावासाच्या प्रतिनिधींनी या कांसुलर सेवांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना, विशेषतः वृद्धांना, पेंशनशी संबंधित मदत करण्यासाठी शिविराचे आयोजन केले होते. मात्र, या शिबीरादरम्यान खलिस्तानी समर्थकांनी मंदिराबाहेर भारत सरकारविरोधात घोषबाजी देली निदर्शने केली. या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. यामुळे भारत-कॅनडा संबंध अधिक बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
HAPPENING NOW: I’m outside the Lakshmi Narayan Mandir where the Khalistanis extremists have gathered to protest the temple and the “Indian government”.
What is actually happening inside is that there are elderly people from India who qualify for an Indian pension. So once a year… pic.twitter.com/gbjthukMhE— Daniel Bordman (@DanielBordmanOG) November 30, 2024
मीडिया रिपोर्टनुसार, खलिस्तानी समर्थकांवर भारत आणि कॅनडामधील संबंध अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निदर्शनांमध्ये “सिख्स फॉर जस्टिस” या भारतातील स्वतंत्र सिख राज्याची मागणी करणाऱ्या गटाचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. या गटाच्या प्रवक्त्याने हे आंदोलन धार्मिक नव्हते, तर भारत सरकारच्या विरोधात होते, असे सांगितले आहे. निदर्शने घालण्यास बंदी असताना देखील अशा घटना घडल्या आहेत. यामुळे कॅनडातील भारतीयंमध्ये नाराजी दिसून येत आहे.
निदर्शनांवर बंदी असताना देखील घोषणाबाजी
तसेच काही दिवसांपूर्वीच, टोरंटोमधील एका कॅनडाच्या न्यायालयाने मंदिर परिसरात 100 मीटरच्या आत कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांवर बंदी घातली होती.परंतु, या आदेशानंतर देखील काही दिवसांतच खलिस्तानी समर्थकांनी आंदोलने केली. या घटनांमुळे त्यांच्या उद्देशांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंदिरात आयोजित शिबिर हा हिंदू, सिख, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा विविध धर्मीय नागरिकांसाठी पेंशनसंबंधित मदत मिळवून देण्याचा प्रयत्न होता.
Consulate organized the last Consular Camp of the season at Laxminarayan Mandir, Scarborough. Close to 250 life certificates were issued to the elderly.
Though there are no more scheduled camps in this season, Certificates would continue to be issued at the Consulate during… pic.twitter.com/flFbTu3aca
— IndiainToronto (@IndiainToronto) November 30, 2024
भारतीय नागरिकांच्या आणि दूतावासांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता
मात्र, खलिस्तानी समर्थकांनी या सेवेत अडथळा निर्माण करत समाजात धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारने आणि कनाडा सरकारने अशा घटनांवर कठोर कारवाई करून भारत-कनाडा संबंध टिकवण्यावर भर द्यावा, अशी मागणी भारतीय समुदायाकडून होत आहे. या घटनांनी परदेशातील भारतीय नागरिकांच्या आणि दूतावासांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.