Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तालिबानचा आणखी एक तानाशाही निर्णय; महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यापासून बंदी

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. महिलांचे अनेक अधिकार काढून घेण्यात आले आहेत. तालिबानने पुन्हा महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 04, 2024 | 01:00 PM
तालिबानचा आणखी एक हुकूमशाही निर्णय; महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यापासून बंदी

तालिबानचा आणखी एक हुकूमशाही निर्णय; महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यापासून बंदी

Follow Us
Close
Follow Us:

काबूल: तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अफगाण महिलांचे अनेक अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यातील मुख्य अधिकार म्हणजे शिक्षण. तालिबानने अफगाण महिलांना शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर तालिबानने आणखी एक तानाशाही निर्णय घेतला आहे. त्यांनी अफगाण महिलांना मिडवाइफरी ( दाई) म्हणून काम करण्यास आणि नर्सिंगचे शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे.

अफगाण महिलांसाठी शिक्षणाचे दार पूर्णपणे बंद

मीडिया रिपोर्टनुसार, महिलांसाठी शिक्षण घेण्याचे हे दोन्ही मार्ग देखील आता तालिबानने बंद केल्याने अफगाण महिलांसाठी शिक्षणाचे दार पूर्णपणे बंद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये सध्या आरोग्य व्यवस्था गंभीर परिस्थितीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 मध्ये जाहीर केले होते की, देशाला गरजा भागवण्यासाठी किमान 18,000 दाईंची आवश्यकता आहे. परंतु, दाई बनण्यासाठी किंवा नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या महिलांना वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘हिंदूंवरील अन्याय थांबायला हवा’…; ‘या’ भारतीय व्यक्तीने बांगलादेश सरकारला लिहिलं पत्र

2021 पासून किशोरवयीन मुलींना शिक्षणापासून अद्यापही

मात्र, तालिबानने पुढील आदेशापर्यंत हे शिक्षण बंद ठेवण्यास सांगितले आहे. पण, तालिबान सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान सरकारने वचन दिले होते की, अभ्यासक्रम इस्लामिक तत्वांशी सुसंगत बनवून नंतर शिक्षण पुन्हा सुरू केरण्यात येईल. मात्र, 2021 पासून किशोरवयीन मुलींना शिक्षणापासून अद्यापही वंचित ठेवण्यात आले आहे.

आता दाई किंवा नर्सिंग शिक्षण घेणे हे महिलांसाठी शिक्षणाचे एकमेव पर्याय होते. मात्र, हे पर्यायही बंद करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान महिलांवर उपचार करण्यासाठी पुरुष डॉक्टरांना पुरुष संरक्षकाच्या उपस्थितीतच परवानगी आहे. सध्या 17,000 महिला नर्सिंग किंवा दाईचे प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, तालिबानच्या या निर्णयामुळे या महिलांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

कोण आहे तालिबान? 

तालिबान या शब्दाचा अर्थ विद्यार्थी असा होतो. हे तालिबानी लोक स्वत:ला फगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात म्हणून संबंधोतात. तसेच तालिबान हा एक देवबंद इस्लामिक गट असून, या लष्करी संघटनेचे दोन लाख सैनिक आहेत. 2001 साली अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली तालिबानला सत्तेतून काढून टाकण्यात आले होते. मात्र, हा गट त्यानंतरही सक्रीय राहिला. या गटाने राष्ट्रपतीपद काबीज केले आहे. आता त्यांचे अफगाणिस्तान देशात सत्ता बळकवण्याचा उद्देश आहे.

2018 मध्ये तालिबानने अमेरिकेशी थेट चर्चा केली आणि फेब्रुवारी 2020 मध्ये दोन्ही बाजूंनी दोहा शांतता करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुदायात तालिबान सामील झाल्याची पुष्टी केली. तसेच अमेरिकन सैन्याच्या 2021 मध्ये  माघारीनंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यांनी देशावर शरिया कायद्याची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून महिलांचे हक्क आणि शिक्षण यावर मोठा आघात केला आहे.

जागतिक घडामोडी संबधित बातम्या- इस्त्रायलचे गाझावरील हल्ले तीव्र; हल्ल्यात 14 ठार, नागरिकांना घरे खाली करण्याचे आदेश

Web Title: Taliban banned afghan women from medical training amid worsening health crisis nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 01:00 PM

Topics:  

  • Afghanistan
  • America
  • world

संबंधित बातम्या

India US Trade: भारत-अमेरिका व्यापार कराराला गती! १ जून रोजी अमेरिकेचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ दिल्लीत
1

India US Trade: भारत-अमेरिका व्यापार कराराला गती! १ जून रोजी अमेरिकेचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ दिल्लीत

US-Iran Deal: इराणचा ‘हा’ एकच निर्णय भारतासह 8 देशांसाठी धक्कादायक! 11 लाख कोटींच्या खजिन्यासाठी अट; जागतिक बँकिंग क्षेत्रात खळबळ
2

US-Iran Deal: इराणचा ‘हा’ एकच निर्णय भारतासह 8 देशांसाठी धक्कादायक! 11 लाख कोटींच्या खजिन्यासाठी अट; जागतिक बँकिंग क्षेत्रात खळबळ

Zimmermann Telegram History: ‘त्या’ एका गुप्त पत्राने पहिल्या महायुद्धाचा इतिहास कसा बदलला? जर्मनीचा कोणता डाव अमेरिकेमुळे उलटला?
3

Zimmermann Telegram History: ‘त्या’ एका गुप्त पत्राने पहिल्या महायुद्धाचा इतिहास कसा बदलला? जर्मनीचा कोणता डाव अमेरिकेमुळे उलटला?

India US Critical Minerals Deal : चीनची दादागिरी संपणार? भारत अमेरिकेत ‘दुर्मिळ खनिजां’साठी महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी
4

India US Critical Minerals Deal : चीनची दादागिरी संपणार? भारत अमेरिकेत ‘दुर्मिळ खनिजां’साठी महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.