Taliban सर्किटच! अफगाणिस्तानमध्ये 'या' सर्वात महत्वाच्या गोष्टीवरच बंदी; आता नागरिकांचे हाल निश्चित
अफगानिस्तानमध्ये तालिबानचा नवा निर्णय
बल्ख प्रांतात वायफायवर बंदी
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होणार
अफगाणिस्तानमध्ये दिवसेंदिवस नागरिकांचे राहणे कठीण होत चालले आहे. 2021 पासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान संघटनेची सत्ता आहे. या ठिकाणी तालिबानचे सरकार आल्यापासून अनेक बंदीचे निर्णय घेण्यात आले आहे. नागरिकांना जाचक असणारे निर्णय देखील त्यांच्या सरकारने घेतला आहे. आता देखील तालिबानने नवीनच फतवा काढला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने स्त्रियांवर अनेक प्रकारचे निर्बंध घातले आहेत. मात्र आता तालिबानने अजून एक निर्णय घेतला आहे. तालिबान सरकारने बल्ख प्रांतात वायफायवर बंदी घातली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना वायफाय म्हणजेच इंटरनेट वापरता येणार नाही. त्यामुळे तालिबान सरकारने तेथे आणखी एक निर्बंध घातला आहे.
तालिबान सरकारच्या प्रमुखांनी आदेश देताच या भागातील वायफाय कनेक्शन तोडून टाकण्यात आली आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यापासून ही पहिलीच इंटरनेट बंदी आहे. त्यामुळे आता अजून कोण कोणते निर्बंध तालिबान सरकार येथील नागरिकांवर घालणार हे येत्या काळात पहावे लागणार आहे.
या भागात केवळ वायफाय बंद करण्यात आले आहे. मोबाइल इंटरनेट सुरू असणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. वायफाय बंद करण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. अनैतिक कृती रोखण्यासाठी हे पाऊस उचलण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे.
भारताने अफगाणिस्तानसाठी केले मोठे मन
भारताने पुन्हा एकदा प्रादेशिक सहकार्य आणि मानवतेचा आदर्श ठेवत अफगाणिस्तानशी व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारत सरकारने अलीकडेच १६० अफगाण ट्रकना अटारी-वाघा सीमेमार्गे भारतात प्रवेश करण्याची परवानगी दिली, ज्यामुळे अफगाणिस्तानातून सुकामेवा आणि अन्य कृषी उत्पादनांचा पुरवठा सुरू झाला आहे.
भारताने तालिबान सरकारला औपचारिक मान्यता दिलेली नसली, तरी अफगाण जनतेच्या कल्याणासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी दिला गेलेला हा हातभार जगाला भारताची सहानुभूतीपूर्ण भूमिका स्पष्ट करतो. यामुळे भारताने अफगाणिस्तानप्रती असलेली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे.
सर्वांनीच सोडली पाकिस्तानची साथ; भारताने अफगाणिस्तानसाठी केले मोठे मन, वाचा सविस्तर…
तालिबानच्या मुत्ताकी यांनी भारताच्या चीन आणि इराण दौऱ्यापूर्वी एस. जयशंकर यांना फोन करून संवाद साधला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा दिल्याबद्दल आणि पाकिस्तानच्या अफवांपासून दूर राहिल्याबद्दल भारताने अफगाणिस्तानचे आभार मानले. या संवादामुळे दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे आहेत. भारत, अफगाणिस्तानातील विकास प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. यासाठी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि मुत्ताकी यांच्यात याआधी दुबईमध्ये चर्चा झाली होती.