Taliban minister's anti Non Muslim remark sparks fear among Afghan Hindu Sikh community
Khalid Hanafi’s Statement Regarding Minorities: अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमध्ये नैतिकता आणि दुर्गुण नियंत्रण मंत्री असलेल्या खालिद हनाफी यांनी एका मेळाव्यात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे देशातील आणि परदेशातील हिंदू व शीख समुदायामध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काबूलमध्ये झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना खालिद हनाफी यांनी गैर-मुस्लिम लोकांना “चार पायांच्या प्राण्यांपेक्षाही वाईट” असे म्हटले. या विधानामुळे अफगाणिस्तानात उरलेल्या अल्पसंख्याक हिंदू आणि शीख धर्मीयांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
हनाफीचे कठोर आणि धार्मिक द्वेषपूर्ण विचार पुन्हा समोर
खालिद हनाफी यांचे हे विधान काही नवीन नाही. महिलांच्या शिक्षणावर आणि नोकरीवर बंदी घालण्याचा निर्णय याच हनाफी यांनी घेतला होता, ज्यास तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांनीही मान्यता दिली होती. त्यांच्या या घोषणांमुळे लाखो अफगाण महिलांचे भवितव्य अंधकारमय झाले. खालिद हनाफी यांचे पूर्ण नाव शेख अल-हदीस मोहम्मद खालिद हनाफी आहे. त्यांचे वडील तालिबानचे वरिष्ठ कमांडर होते. नुरिस्तान प्रांतातील दोआबी जिल्ह्यात जन्मलेल्या हनाफी यांनी मदरशांमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर तालिबानच्या लढवय्या गटात सामील झाले. खालिद हनाफी यांचे पूर्ण नाव शेख अल-हदीस मोहम्मद खालिद हनाफी आहे. त्यांचे वडील तालिबानचे वरिष्ठ कमांडर होते. नुरिस्तान प्रांतातील दोआबी जिल्ह्यात जन्मलेल्या हनाफी यांनी मदरशांमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर तालिबानच्या लढवय्या गटात सामील झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युक्रेन दोन भागात विभागले जाणार! काय आहे ट्रम्पच्या दूताचा ‘प्रस्ताव’ आणि पुतिनची ‘खळबळजनक’ प्रतिक्रिया?
परदेशस्थ अफगाण हिंदू-शीख नेत्यांचा तीव्र निषेध
युनायटेड किंग्डममध्ये राहणाऱ्या अफगाण शीख आणि हिंदू समुदायाच्या नेत्यांनी हनाफी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या विधानाला “चिथावणीखोर, विभाजनकारी आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणारे” असे संबोधले. नेत्यांनी म्हटले की, या प्रकारच्या विधानांमुळे देशात उरलेल्या अल्पसंख्याक धर्मीय नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. त्यांना सतत आपली धार्मिक ओळख लपवावी लागत आहे, आणि या प्रकारच्या भाष्यांमुळे त्यांना देश सोडण्याची वेळ येऊ शकते.
तालिबानच्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विधान
विशेष बाब म्हणजे तालिबान सध्या दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत – एक गट अधिक कट्टरवादी असून दुसरा गट थोडा सौम्य दृष्टिकोन ठेवतो. अशा वेळी खालिद हनाफी यांचे द्वेषमूलक विधान त्यांच्या कट्टर धार्मिक भूमिकेचे आणि तालिबानच्या सत्तासंघर्षाचे स्पष्ट उदाहरण आहे. त्यांनी अफगाणिस्तानातील शीख व हिंदूंसोबतच इतर धार्मिक अल्पसंख्याकांविषयीही अपमानास्पद वक्तव्ये केल्याने, अंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्कांचे उल्लंघन आणि धार्मिक सहिष्णुतेचा अभाव स्पष्ट होतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेच्या करप्रणालीबद्दल संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता; इतर देशांना फटका, जागतिक व्यापारात मोठी भीती
हनाफीचा कट्टरपंथी प्रवास
खालिद हनाफी यांचा तालिबानशी संबंध दीर्घकाळाचा आहे. तालिबानच्या पहिल्या कारकिर्दीत त्यांनी लढवय्या म्हणून काम केले होते. एकदा जखमी झाल्यानंतरही त्यांनी तालिबानशी निष्ठा सोडली नाही. आज ते “सद्गुणांचे संवर्धन आणि दुर्गुणांचे निवारण” या मंत्रालयाचे प्रमुख आहेत, जे तालिबानच्या कट्टर इस्लामिक आदेशांची अंमलबजावणी करते.
अल्पसंख्याकांच्या अस्तित्वावर गंडांतर
खालिद हनाफी यांचे विधान केवळ धार्मिक असहिष्णुतेचे प्रतिबिंब नसून, अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांच्या अस्तित्वावरच संकट निर्माण करणारे आहे. यामुळे केवळ अफगाणिस्तानातीलच नव्हे, तर परदेशातील अफगाण नागरिकांमध्येही तीव्र अस्वस्थता आहे.अफगाण हिंदू-शीख समुदायाचा संघर्ष हा केवळ धर्म टिकवण्याचा नसून, आपल्या अस्तित्वासाठी लढण्याचा आहे, आणि अशा प्रकारची वक्तव्ये त्यांच्यावरील धोका वाढवणारी आहेत, हे दुर्लक्षित करता येणार नाही. अंतरराष्ट्रीय समुदायाने याची गंभीर दखल घेणे अत्यावश्यक आहे.