Taliban's brutality! Are the lives of 1 lakh Afghans in danger Britain's report has created a stir
काबूल : सध्या अफगाणिस्तानातील १ लाख लोकांवर मृत्यूची टांगती तलावर लटकत आहे. यामागचे कारण म्हणजे ब्रिटनच्या डेली मेलच्या अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, ब्रिटीश लष्कर आणि गुप्तचर संस्थांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या अफगाण नागरीकांची गोपनीय माहितीची कागदपत्रे गहाळ केली आहे. ही कागपत्रे तालिबानच्या हाती लागल्याचा दावा डेली मेलच्या अहवालात केला आहे.
डेली मेल वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांमध्ये तीन अफगाण नागरिकांना ठारही करण्यात आले आहेत. या तीन्ही लोकांचा ब्रिटनशी संबंध असल्याचे वृत्तात सांगितले आहे. याच वेळी अफगाणिस्तानमधील नागरिकांना सरकारकडून माफीचे पत्र देखील मिळाले आहे. या पत्रात नागरिकांचा वैयक्तिक डेटा लीक झाल्याचे सांगण्यात आले आहे. ब्रिटनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा डेटा उल्लंघन मानला जात आहे. सध्या सुमारे १ लाख अफगाण लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनकडून गहाळ झालेली कागपत्रे तालिबान सरकारपर्यंत पोहोचली आहे. परंतु याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. मात्र नुकतेच ब्रिटनच्या सैन्यात काम करणाऱ्या अफगाण नागरिकांना लक्ष्य केले जात असल्यामुळे हा संशय अधिक वाढत आहे.
डेली मेलच्या अहवालात एका अफगाण नागरिकाची प्रतिक्रिया नमूद करण्यात आली आहे. हा अफगाण सैनिक ब्रिटनला पळून गेला होता. त्यांने सांगितले की, त्यांच्या भावाला मारण्यात आले असून, तालिबानला त्याच्या ब्रिटन संबंधाची माहिती होती. सध्या संपूर्ण यादी तालिबानकडे पोहोचली असून क्रूर हत्याकांड घडण्याची शक्यता आहे.
डेली मेले अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, ३०० हून अधिक लोकांची यादी तालिबानच्या हाती लागली आहे. यामध्ये ब्रिटनच्या अफगाण पूर्वसेन योजनेत (ARAO) अर्ज केलेल्या नागरिकांचा समावेश आहे. ब्रिटिश सैन्यात काम करणारे कर्नल शफीर अहमद खान, यांची मे २०२२ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच एप्रिल २०२३ मध्ये कमांडो अहमदझाई आणि सैनिक कासिमही मारले गेले.
यादरम्यान ब्रिटिश सरकारने पूर्णत: मौन पाळले होते. यावेळी ब्रिटिश सरकारने ऑपरेशन रुबिफिक राबवले आणि जवळपास १८, ५०० अफगाण लोकांना ब्रिटनमध्ये परत आणण्यात आले. परंतु अद्यापही सुमारे ७५ हजार अफगाण तालिबानमध्ये अडकले आहेत. ब्रिटिश सरकारने या संपूर्ण प्रकरणावर मौन पाळले आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, सध्या ब्रिटिश संसदेत या संदर्भात गोंधळ सुरु आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली असून लोकांच्या बचावासाठी योजना आखली जात आहे. परंतु यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उघड करण्यात आलेली नाही.