रशियाचा आक्रमक पवित्रा! एका रात्रीतून युक्रेनवर डागले ३०० हून अधिक ड्रोन (फोटो सौजन्य: एक्स/@ZelenskyyUa)
कीव : रशिया युक्रेन युद्धाने आता तीव्र रुप धारण केले आहे. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ हे युद्ध सुरु आहे. रशिया युक्रेनविरोधात पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक झाला असून तीव्र हल्ले करत आहे. पुन्हा एकदा युक्रेनच्या अनेक भागांवर रशियाने ड्रोन हल्ले केले आहे. रशियाचा हा हल्ला युद्धबंदीच्या शक्यतेला मोठा धक्का मानला जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर ड्रोन हल्ले केले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाच्या या हल्लांना विरोध केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना हा हल्ला झाला आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक्सवर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या हल्ल्याची माहिती दिली आहे.त्यांनी सांगितले की, रशियाने ३०० हून अधिक इराणी ड्रोन्स आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यात विशेष करुन युक्रेनच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. गेल्या काही महिन्यांत झालेल्या हल्ल्यांतील सर्वात मोठा आणि नियोजित हल्ला असल्याचे झेलेन्स्कींनी म्हटले. या हल्ल्यामुळे युक्रेनच्या अनेक रहिवासी भागांमध्ये भीषण आग लागली आहे.
Сьогодні вночі наші воїни різних підрозділів відбивали чергову російську атаку. Більш ніж 300 ударних дронів та понад 30 ракет різних типів було застосовано проти наших міст. Зараз продовжується знищення цілей: у повітрі ще є безпілотники.
Тривають рятувальні роботи після атаки.… pic.twitter.com/FAvOiim0Q8
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) July 19, 2025
याच वेळी रशियाने समुद्रकिनारी असलेल्या ओडेसा शहरावरही २० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तसेच लहान मुलांसह ६ जण जखमी झाले आहेत. रशिया युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करत आहे. तसेच उर्जा संसाधनेही रशियाने नष्ट केली आहेत. दिवसेंदिवस रशियाचे युक्रेनवरील हल्ले वाढत असून युक्रेनचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
रशियाच्या या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. युरोपियन युनियन आणि नाटो देशांनी रशियाला हल्ले थांबवण्याचा इशारा दिला आहे. परंतु यापुढे काहीही करु शकलेले नाहीत. तसेच ट्रम्प देखील युद्धबंदी करण्यात अपयशी ठरले आहेत.