Taslima Nasreen criticism : बांगलादेशातील राजकारणात सध्या मोठा भूकंप घडवणाऱ्या घटनेवर जगप्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेवर तीव्र संताप व्यक्त करत, त्यांनी युनूस यांच्यावर जिहादी हिंसा, हिंदू नरसंहार, देशातील अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय संबंध बिघडवणे यांसारख्या गंभीर आरोपांचा भडिमार केला आहे. तस्लिमा नसरीन यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमातून थेट भाष्य करत लिहिले की, “मी ऐकले आहे की मोहम्मद युनूस राजीनामा देणार आहेत आणि त्यांचे उर्वरित आयुष्य युरोप किंवा अमेरिकेत आरामात घालवतील. त्याला का सोडून द्यावे? त्याला तुरुंगात टाकले पाहिजे.”
युनूस यांच्यावर ‘जिहादी’ हिंसाचाराचे आरोप
तस्लिमा नसरीन यांच्या मते, मोहम्मद युनूस यांनी तौहिदी जमातसारख्या कट्टर संघटनांद्वारे देशात हिंसाचार पसरवण्याचे षड्यंत्र रचले. त्या म्हणाल्या, “युनूस यांनी जमाव हिंसाचार, रक्तपात यासाठी चिथावणी दिली. त्यांनी देशभरात द्वेष आणि धार्मिक विष पेरले. त्यामुळे अनेक निष्पाप लोक मारले गेले, हजारो जखमी झाले.” तस्लिमांच्या म्हणण्यानुसार, युनूस यांनी केवळ देशांतर्गत शांतता बिघडवली नाही, तर बांगलादेश आणि शेजारील राष्ट्रांमधील संबंधही पूर्णतः ढवळून टाकले. “कॉरिडॉर, बंदरे परदेशी लष्करी शक्तींना सोपवली गेली. भारतासह इतर शेजारी देश यामुळे त्रस्त आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताची जागतिक दौऱ्यावर कूच; शशी थरूर अमेरिकेत करणार पाकिस्तानचा पर्दाफाश, ओवैसी आखाती देशांमध्ये गरजणार
‘अपराधांवरून सूट का द्यायची?’ नसरीन यांचा सवाल
तस्लिमा नसरीन यांनी असा सवाल उपस्थित केला की, “इतक्या गंभीर गुन्ह्यांनंतरही युनूस यांना मोकळे का सोडले जात आहे?” त्या म्हणाल्या, “देशात प्रवेश करताच त्याच्यावरील पाच खटले रद्द झाले. इतक्या मोठ्या गुन्ह्यांची शिक्षा कोणालाच झाली नाही का?” या वक्तव्यांमुळे बांगलादेशातील सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नसरीन यांनी पुढे म्हटले की, “एका पिढीला त्यांनी अशा विचारांमध्ये झोकून दिले आहे की जी असहिष्णु, अतिरेकी आणि तर्कहीन झाली आहे. युनूस यांनी या सगळ्याची जबाबदारी घ्यायला हवी आणि तुरुंगात शिक्षा भोगायला हवी.”
I’ve heard that Mr. Yunus is going to resign and will go off to live the rest of his life in comfort in Europe or America. Why should he be allowed to leave? He should be imprisoned. As soon as he entered the country, he had five cases against him dismissed. From his position as…
— taslima nasreen (@taslimanasreen) May 23, 2025
credit : social media
‘तोच गुन्हेगार का सुटावा?’ इतरांवर जन्मठेप, युनूस मात्र मोकळे?
तस्लिमा नसरीन यांनी शेवटी लिहिले की, “इतक्या लोकांना लहान गुन्ह्यांमध्ये जन्मठेप झाली आहे. मग युनूससारखा व्यक्ती, जो देशद्रोह, धार्मिक विघटन, हिंसाचार आणि आंतरराष्ट्रीय संकटांसाठी जबाबदार आहे, त्याला का माफ करायचे?” त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “त्याने आयुष्य अमेरिकेत किंवा युरोपमध्ये मोकळेपणाने घालवू नये. त्याला अटक झाली पाहिजे आणि कारागृहातच उर्वरित आयुष्य घालवायला लावले पाहिजे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची तिहेरी जबाबदारी; रशियाची लज्जास्पद भूमिका आणि चीनचा पाकिस्तानला पडद्यामागून पूर्ण पाठिंबा
तस्लिमा नसरीन यांचे वक्तव्य
तस्लिमा नसरीन यांचे हे वक्तव्य केवळ एका व्यक्तीवर टीका नसून, बांगलादेशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर एक गंभीर भाष्य आहे. अंतरिम सरकारच्या प्रमुखावर केलेले आरोप केवळ वैयक्तिक नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित करणारे आहेत. युनूस राजीनामा देतात की नाही, यापेक्षा आता अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांच्यावर कारवाई होणार का? या प्रकरणात पुढील घडामोडी बांगलादेश आणि दक्षिण आशियात राजकीय आणि सामाजिक घडामोडींना कलाटणी देऊ शकतात.