Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीमा संघर्षात पाकड्यांचा ‘खेळ खल्लास’; अफगाणिस्तानच्या एअर स्ट्राईकने ५८ सैनिक ठार, अनेक पाकिस्तानी चौक्यांवर ताबा!

कुराम जिल्ह्यातील गावी क्षेत्रात पाकिस्तान आणि अफगाण सीमा दलांमध्ये भीषण संघर्ष झाला. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान येथील सीमेवर झालेल्या गोळीबार आणि संघर्षात पाकिस्तानचे ५८ सैनिक मारले गेले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 12, 2025 | 03:06 PM
अफगाणिस्तानच्या एअर स्ट्राईकने ५८ पाक सैनिक ठार (Photo Credit- X)

अफगाणिस्तानच्या एअर स्ट्राईकने ५८ पाक सैनिक ठार (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • सीमा संघर्षात पाकिस्तानचा ‘खेळ खल्लास’
  • अफगाणिस्तानच्या एअर स्ट्राईकने ५८ सैनिक ठार
  • अनेक पाकिस्तानी चौक्यांवर ताबा!
Afghanistan Attacked Pakistan: दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याला अफगाणिस्तानच्या सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मागील रात्री डुरंड लाइनवर (Durand Line) असलेल्या कुराम जिल्ह्यातील गावी क्षेत्रात पाकिस्तान आणि अफगाण सीमा दलांमध्ये भीषण संघर्ष झाला. खैबर पख्तुनख्वा (Khyber Pakhtunkhwa) आणि बलुचिस्तान (Balochistan) येथील सीमेवर झालेल्या गोळीबार आणि संघर्षात पाकिस्तानचे ५८ सैनिक मारले गेले. या जोरदार प्रत्युत्तरादरम्यान अफगाण सैन्याने सीमेवरील पाकिस्तानच्या २५ चौक्यांवर कब्जा केल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानी सीमा बंद, तालिबानचा इशारा

सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानने खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमधील अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमा बंद केल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत कठोर प्रत्युत्तर देण्याचा संकल्प केला आहे. दुसरीकडे, तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर पुन्हा अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न झाला, तर अफगाणिस्तानचे सशस्त्र दल कठोर प्रतिक्रिया देण्यास पूर्णपणे तयार आहेत.

#𝐁𝐑𝐄𝐀𝐊𝐈𝐍𝐆: 🚨Afghanistan has initiated an offensive against Pakistan from seven distinct border points, according to the Afghan Ministry of Defence; Huge battles underway. Pakistani jets have gone airborne in the east of the country.#Afghanistan #Pakistan pic.twitter.com/n5gwjaicYs — Jahangir (@jahangir_sid) October 11, 2025

आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? ‘हा’ देश कोणत्याही क्षणी पाकड्यांवर डागणार क्षेपणास्त्र

अफगाण सरकारची पहिली प्रतिक्रिया

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी काबुलमध्ये पत्रकार परिषदेत पाकिस्तानवर गंभीर आरोप केले. “पाकिस्तान आपल्या भूमीवर ISIS ला आश्रय देत आहे, पण अफगाणिस्तान असे करणार नाही.” “आम्हाला आमच्या हवाई आणि भूभागीय सीमांचे रक्षण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.” “पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे आणि त्यांना अफगाण सरकारकडे सोपवावे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी केंद्रे आजही कार्यरत आहेत.”

TTP चीफला लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

९-१० ऑक्टोबरच्या रात्री पाकिस्तानच्या सैन्याने TTP प्रमुख नूर वली मेहसूद यांना लक्ष्य करत अफगाणिस्तानमधील काबुल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिका येथे हवाई हल्ले केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानच्या २०१ खालिद बिन वालिद आर्मी कोरने पाकिस्तानच्या फ्रंटियर कोर्प्सच्या (Frontier Corps) तळांवर कुराम, बाजौर आणि नॉर्थ वजीरिस्तानमध्ये एकाच वेळी तोफ, मोर्टार आणि ड्रोन हल्ले केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा दोन्ही देशांमधील तणावावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

अफगाण सैनिकांनी कब्जा केलेल्या चौक्या

इस्लामिक एमिरेट्स ऑफ अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानच्या अंगूर अड्डा, बाजौर, कुर्रम, दीर, चित्राल आणि बलुचिस्तानमधील बारामचा येथील चौक्यांवर गोळीबार करून त्या उद्ध्वस्त केल्या आणि कब्जा केला.तालिबानच्या अधिकाऱ्यांनीही या संघर्षाला दुजोरा दिला आहे. माहितीनुसार, अफगाण सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांची शस्त्रे हिसकावून घेऊन हल्ला केला.

IND & AFG Relation अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा, दिल्लीच्या भूमीवरून अमेरिकेलाही संदेश

Web Title: Tensions high on pak afghan border 58 pakistani soldiers killed in afghan airstrike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Air Strike
  • international news
  • pakistan

संबंधित बातम्या

Radar Proof : युद्धाच्या पार्शवभूमीवर ड्रॅगनचा आश्चर्यकारक दावा; लुफा तंत्रज्ञानामुळे गुप्तचर विमान होऊ शकते पूर्णपणे ‘अदृश्य’
1

Radar Proof : युद्धाच्या पार्शवभूमीवर ड्रॅगनचा आश्चर्यकारक दावा; लुफा तंत्रज्ञानामुळे गुप्तचर विमान होऊ शकते पूर्णपणे ‘अदृश्य’

Rare Minerals : काचिन प्रदेश नव्या भू-राजकीय रणभूमीत; म्यानमार पर्वतांमध्ये दडलेल्या दुर्मिळ खजिन्यावरून ‘या’ 3 महासत्ता आमनेसामने
2

Rare Minerals : काचिन प्रदेश नव्या भू-राजकीय रणभूमीत; म्यानमार पर्वतांमध्ये दडलेल्या दुर्मिळ खजिन्यावरून ‘या’ 3 महासत्ता आमनेसामने

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात ‘नो एन्ट्री’
3

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात ‘नो एन्ट्री’

Imran Khan News: पाकिस्तानमध्ये वातावरण तापले! इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या? PTI समर्थकांचे देशात हिंसक आंदोलन सुरू
4

Imran Khan News: पाकिस्तानमध्ये वातावरण तापले! इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या? PTI समर्थकांचे देशात हिंसक आंदोलन सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.