Terrible Plane accident in Australia's Sydney video
Ausralia Plane Crash News in Marathi : कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात (Australia) एक भीषण विमान अपघात (Palne Crash) घडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एक विमान अचानक तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागण्यात आले असून गोल्फ कोर्सवर उतरवण्यात आले आहे. रविवारी (१७ ऑगस्ट) ही घटना घडली. सध्या या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विमानमध्ये एका पायलटसह एक प्रवासी होता. सुदैवाने दोघेही सुरक्षित आहे. त्यांना वेळे आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन आणि बचाव अधिकाऱ्यांनी घटनास्थली धाव घेतली होती. तातडीने पायलट आणि प्रवाशाला बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.
दरम्यान यावेळी काही लोक गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळत होते. विमान त्यांच्या दिशेने येताना दिसताचा लोकांमध्ये जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु झाली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
सध्या या अपघाताची चौकशी सुरु आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना गोल्फ कोर्सवर झाल्याने तेथे उपस्थित लोकांमध्ये गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शनींच्या मते ही घटना एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी होती. यावेळी सर्व खेळाडू गोल्फ कोर्सवर होते.
विमान आपल्या दिशेने येताना दिसताच त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला असण्याची शक्यता आहे. तसेच इतर तांत्रिक बिघाडांचा आणि कारणांचाही शोध सुरु आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर माहिती कळवण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
‼️A light aircraft crash lands in a golf course in Sydney, Australia.
Pilot and passenger survive pic.twitter.com/7yBob51bDt
— Wolf Brief (@wolfbrief_) August 18, 2025
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाने हवेत उड्डाण केल्याच्या काही मिनिटांनी अचानक थरथरु लागले. यामुले पायलटने सावधगिरी दाखवत विमानाचे जवळच्या गोल्फ कोर्सवर इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंग वेळी विमानाचे प्रचंड नुकसान झाले. विमानाच्या पुढचा भाग मोठ्या प्रमाणा खराब झाला. सुदैवाने पायलट आणि प्रवाशी अपघातातून बचावले. सध्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या अपघाताने ऑस्ट्रेलियात गोंधळ उडाला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा