
Valero Refinery Explosion
US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी रिफायनरीमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात जोरदार हादरले बसले. स्फोटानंतर भीषण आग (Fire ) लागली होती. संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आग विझवण्याचे कार्य सुरु आहे.
प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर आगीच्या ज्वाळांनी भीषण रुप घेतले होते. काही क्षणाताच आकाशात काळ्या ढगाचे थर दिसू लागले होते. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या अग्निशामक दल आणि आपत्कालीन दल आग विझवण्याचे कार्य करत असून आग लागलेल्या युनिटचा परिसर बंद करण्यात आला आहे. टीम सध्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.
प्राथमिक तपासानुसार, हा स्फोट इंडस्ट्रियल हीटरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे झाला असण्याची शक्यता आहे. मात्र याचे अद्याप नेमकं कारण स्पष्ट झाले नसल्याने याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्फोटाच्या वेळी प्लांटमध्ये उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची तातडीने सुरक्षित सुटका करण्यात आली असल्याचे रिफायनरीच्या व्यवस्थापन विभागाने म्हटले. तसेच पोर्ट ऑर्थरचे पोलिस प्रमुख टिम ड्युरिसो यांनीही स्फोटात अद्याप कोणीही मृत किंवा जखमी झाले नसल्याची पुष्टी केली आहे.
आगीमुळे विषारी धुर हवेत पसरले असल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांठी शेल्टर-इन-प्लेस म्हणजेच आहे त्याच ठिकाणी सुरक्षित राहण्याचे आदेश दिले आहेत. खबदारी म्हणून जेफरसन काऊंटीमधील स्टेट हायवे तात्पुरत्या काळासाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांना घराच्या खिडक्या, दरवाजे बंद ठेवण्यास आणि सुचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. या भीषण दुर्घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
JUST IN: Explosion reported at Valero refinery in Port Arthur, Texas. Nearby residents told to shelter in place pic.twitter.com/wjYPyx98PW — BNO News (@BNONews) March 24, 2026
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, इंडस्ट्रियल हिटरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पोर्ट ऑर्थर रिफायनरीमध्ये स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Ans: टेक्सासच्या पोर्ट ऑर्थर रिफायनरीमधील स्फोटात सध्या कोणाच्याही मृत्यूची किंवा जखमींची नोंद झालेली नाही. सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.