
Thailand Crane Accident
थायलंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; धावत्या ट्रेनवर कोसळली भलीमोठी क्रेन, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, समुत साखोन प्रांतात रामा २ रोडवर एलिव्हेटेड एक्सप्रेसवेवर सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेनचे नियंत्रण अचानक सुटले आणि ती पुलाखालून जाणाऱ्या वाहनांवर पडली. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. क्रेन आणि गाड्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकेलेल्या लोकांना बाहेर काढले आहे. तसेच सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अवघ्या २४ तासांत हा दुसरा मोठा क्रेन अपघात झाला आहे.
या अपघाताच्या एक दिवस आधीच एक क्रेन थेट धावत्या रेल्वेवर कोसळली होती. थायलंडच्या ईशान्ये भागाता नाखोन रत्साचिमा प्रांतात रेल्वे अपघात (Train Accident) घडला होता. चीन-थायलंड हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम सुरु असलेल्या दोन क्रेनचा अपघात झाला आहे. या भयावह अपघातात किमान ३२ जणांचा मृत्यू झाल आहे. अनेकजण जखमी झाले आहेत.
एका पाठोपाठ घडलेल्या अपघातामुळे बांधकामाच्या सुरक्षा व्यवस्थांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. सध्या दोन्ही अपघातांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, सुरक्षेबाबत निष्काळजीपणा आढल्यास घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सध्या याच पार्श्वभूमीवर बांधकाम सुरु असलेल्या क्षेत्रातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कार्य सुरु आहे. या घटनेने संपूर्ण थायलंड (Thailand) हादरला आहे.
Two people killed when a construction crane and concrete beam collapsed onto vehicles on Rama II Road in Samut Sakhon, Thailand.
The incident occurred at 9:15am during work on the elevated section of Motorway No. 82, near the Paris Garden Inn before the Tha Chin River Bridge. pic.twitter.com/8z5f4eNpfJ — The South Asia Times (@thesouthasiatim) January 15, 2026
थायलंडमधील अनोखा फॅशन शो! सजून-धजून मॉडेलिंग करतात चक्क म्हशी…