Thailand Prime Minister suspended amid combodia dispute
बॅंकॉक : सध्या थायलंडमध्ये मोठा राजकीय गोंधळ उडालेला आहे. थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने नव्या पंतप्रधांनान पदावरुन काढून टाकले आहे. थायलंडच्या नव्या पंतप्रधान पियाथोंगटार्न शिनावात्रा यांना त्यांच्या पदावरुन निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर कंबोडियन नेते हुन सेन यांना संवेदनशील माहिती सांगितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कंबोडियन नेते हुन सेन यांच्याशी केलेल्या संवादाचा ऑडिओ लीक झाल्याने पियाथोंगटर्न सध्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पियाथोंगटार्न यांनी थाई आर्मी कमांडर यांच्यावर टीका केली होती. या ऑडिओ लीक झाल्याने त्याच्याविरोधात तीव्र निषेध नोंदवला जात आहे. सध्या ही बाब थायलंडमध्ये खूप गंभीर मानली जात आहे. थालंडमध्ये लष्कराचा मोठा प्रभाव आहे. यामुळे एखद्या लष्करी अधिकाऱ्याविरोधात बोलणे थायलंडमध्ये गुन्हा मानला जातो. सध्या नव्या पंतप्रधान पियाथोंगटार्न शिनावात्रा यांच्याविरोधात देशभर संतापाचे वातावरण आहे.
थालंडच्या संवैधानिक न्यायालयाने पियाथोंगटार्नविरोधात नैतिक उल्लंघनाचा खटला चालवला आहे. सध्या नव्या पंतप्रधानांची चौकशी सुरु आहे. यादरम्यान पंतप्रधान पियाथोंगटार्न यांना त्यांच्या पदावरुन निलंबित करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणावर न्यायालयात अंतिम सुनावणी सुरु आहे. तोपर्यंत उपपंतप्रधान फुमथम वेचायचाई प्रशासनाचे कामकाज पाहणार आहे.
पियाथोंगटार्न यांचा कंबोडियन नेते हुने सेन यांच्याशी झालेल्या संवादाचा कॉल लीक झाला. यामुळे पियाथोंगटार्न यांच्याकडून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या सरकारवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे त्यांच्या सरकारमध्ये फुट पडली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी युती सोडली आहे. पियाथोंगटार्न यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्या न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करतील, त्याचे पालन करतील.
सध्या पियाथोंगटार्न यांची चौकशी सुरु आहे. सध्या त्यांचे पद धोक्यात आले आहे. तसेच थाई राजाने मंत्रिमंडळात बदल करण्याची मंजूरी दिली आहे. पक्षात नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जुन्या मंत्र्यांना काढून टाकले जात आहे. यामुळे सध्या थायलंडमध्ये मोठा गोंधळ सुरु आहे.