थोडक्यात अनर्थ टळला! इंडोनेशियात बोईंग विमान लॅंडिगदरम्यान धावट्टीवरुन घसरले अन्... ; भयानक अपघाताचा VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Indonesia Airplane Crash: जकार्ता : अहमदाबादमध्ये झालेल्या भयानक अपघाताच्या दुखातून अजून जग बाहरे पडले नाही. जगभरातील लोकांनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला. याची चर्चा अजूनही सुरुच आहे. याच वेळी पुन्हा एकदा इंडोनेशियात बोईंग विमानाच्या अपघाताची माहिती समोर आली आहे. इंडोनेशियात बोईंग-७३७ विमानाचा अपघात होता होता टळला आहे. या अपघाताच एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे इंडोनेशियात बोईंग कपंनीचे विमान लॅडिंगदरम्यान धावपट्टीवरुन घसरले आणि यावेळी वाऱ्याच्या तीव्र वेगामुळे विमान डगमगीला देखील आले होते. यामुळे मोठा अपघात घडला असता. मात्र वैमिनकाच्या प्रयत्नामुळे हा अपघात टळला. इंडोनेशियाच्या टांगेरांग सोकरनो-हट्टा या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात घडला. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील क्रू मेंबर्ससह सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या अपघाताने अहमदाबाच्या विमान अपघाताची आठवण लोकांना करुन दिली.
🚨⚡ Soekarno-Hatta International Airport in Indonesia narrowly escaped d¡saster during severe weather.
The pilots of a Batik Air plane briefly lost control of the aircraft during landing but were able to avert an accident at the last second.#Indonesia #Batikair #planecrash pic.twitter.com/uktWKh36ld
— OsintWorld 🍁 (@OsiOsint1) June 29, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, बाटिक एअर बोईंग ७३७ हे विमान सोकरनो-हट्टा या आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅंड करत होते. यावेळी हवामान अत्यंत खराब होते. हवेत धुके साठलेले होते. तसेच वारे देखील जोरदार वेगाने वाहत होते. यामुळे लॅंडिंगवेळी विमान धावपट्टीवरुन घसरले तसेच तीव्र वाऱ्यामुळे लॅंडिंगवेळी विमान डगमगत होते. परंतु वैमानिकाने अत्यंत सावधगिरीने विमानचे लॅंडिग केले. यावेळी विमानतळावर असलेले लोकही मोठ्याने ओरडत होते. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वैमानिकाच्या प्रयत्ननामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
परंतु पुन्हा एकदा बोईंग कंपनींच्या विमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या अपघातानंतर बोईंग विमानांच्या सुरक्षा व्यवस्थांबद्दल चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येत बोईंग ७८७-८ आणि बोईंग ७८७-९ विमानांच्या वेगवेगळ्या तपासण्यांचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या या बोईंग विमानाच्या सर्व विमानांचे उड्डाण काही काळासाठी रद्द करण्यात आले आहे. तपासण्या पूर्ण झाल्यावर उड्डाणे पुन्हा सुरु करण्यात येतील असे इंडोनेशियाच्या टांगेरांग सोकरनो-हट्टा या आंतरराष्ट्रीय विमानतळाने माहिती दिली आहे.
‘पैगंबर मुहम्मद यांच्या व्यंगचित्रावरुन पेटला वाद’ ; मुस्लिम समाज आक्रमक ४ जणांना अटक