'पैगंबर मुहम्मद यांच्या व्यंगचित्रावरुन पेटला वाद' ; मुस्लिम समाज आक्रमक ४ जणांना अटक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Turkey News marathi : अंकारा : एक मोठी बातमी समोर आली आहे. तुर्कीमध्ये पैगंबर मुहम्मद यांच्या व्यंगचित्रावरुन तीव्र वाद पेटला आहे. याअंतर्गत चार जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (३० जून) तुर्कीच्या एका साप्तहिकात लेमनमध्ये एक व्यंग्यात्मक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. या व्यंगचित्रावरुन दोन जणांना अटक करण्यात आली. देशात मोठ्या प्रमाणावर निदर्शने देखील सुरु आहेत. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले जात आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यंगचित्रामध्ये पैगंबर मोशे आणि पैगंबर मुहम्मद यांच्यावरुन व्यंगचित्र काढण्यात आले होते. यामध्ये दोन पुरुष आकाशात हात मिळवणी करत होते आणि त्यांच्यात खाली क्षेपणास्त्र उडाताना युद्धासारखे दृश्य दाखवण्यात आले होते. या व्यंगचित्रातून धार्मिक सलोख्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सरकारी अधिकारी आणि धार्मिक नेत्यांकडून यावर तीव्र विरोध नोंदवला गेला आहे.
Peygamber Efendimizin (S.A.V) karikatürünü yaparak nifak tohumları ekmeye çalışanları bir kez daha lanetliyorum.
Bu alçak çizimi yapan D.P. adlı şahıs yakalanarak gözaltına alınmıştır.
Bir kez daha yineliyorum:
Bu hayasızlar hukuk önünde hesap verecektir. pic.twitter.com/7xYe94B65d— Ali Yerlikaya (@AliYerlikaya) June 30, 2025
तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामद्ये कार्टूनिस्टच दोन पेहलिनाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला हातकडी बांधून पायऱ्या चढवत आहेत. अली येरलिकाया यांच्या म्हणण्यानुसार, मासिकाचे मुख्य संपादक, संस्थात्मक संचालकत आणि ग्राफिक डिझायनरला या प्रकरणांतर्गत अटक करण्यात आली आहे.
येरलिकायांनी देखील या व्यंगचित्राचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पैगंबर मुहम्मद यांचे व्यंगचित्र काढून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या लोकांनी मी शाप देतो. हे घृणास्पद चित्रण तयार करण्याला अटक करण्यात आली आहे. या बेजबाबदार लोकांनी कायदा योग्य ती शिक्षा दिली जाईल.”
याशिवाय धार्मिक नेत्यांनी देखील तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “कोणत्याही धर्माच्या पविक्ष मूल्यांना कुरुप पद्धतीने दाखवणे, विनोदाचा विषय बनवण्याचा अधिकार म्हणजे स्वंतत्र्य नव्हे. पैगंबर मुहम्मद यांचे व्यंगात्मक चित्र रेखाटून धार्कि लोकांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. या विरोधात तीव्र निदर्शने देखील काढण्यात आली आहे. मॅगझिनयच्या कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सध्या पैगंबर मुहम्मद यांच्या व्यंगचित्रावरुन हा वाद अधिकच पेटत चालला आहे.