This is something wrong; The bride shaves her head before the wedding

दक्षिण आफ्रिकन देश इथोपिया आणि सोमालियातील बोराना जातीमध्ये ही विचित्र प्रथा आहे. या प्रथेनुसार नववधूला मुंडन करावे लागते. या जातीमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे वर्चस्व दिसून येते. पुरुष घर चालवण्यासाठी कमाई करतात आणि जनावरांची देखभाल करतात, तर महिला घर सजवण्यापासून ते जुन्या परंपरा निभावण्याचे काम करतात.

    विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. या खास क्षणी प्रत्येक नववधूला आपण परफेक्ट आणि सुंदर दिसावे असे वाटते. मग ती वधू कुठल्याही धर्माची असो, आपल्या परंपरेनुसार ती लग्नात नटत असते. लग्नाबाबत जगात अनेक प्रथा-परंपरा आहेत. मात्र आज आपण एका विचित्र प्रथेबाबत जाणून घेणार असून येथे नववधूला आपल्या केसांचा त्याग करावा लागतो.

    दक्षिण आफ्रिकन देश इथोपिया आणि सोमालियातील बोराना जातीमध्ये ही विचित्र प्रथा आहे. या प्रथेनुसार नववधूला मुंडन करावे लागते. या जातीमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे वर्चस्व दिसून येते. पुरुष घर चालवण्यासाठी कमाई करतात आणि जनावरांची देखभाल करतात, तर महिला घर सजवण्यापासून ते जुन्या परंपरा निभावण्याचे काम करतात.

    बोराना जातीमध्ये लग्नापूर्वी तरुणी लांबसडक केस ठेवतात. मात्र लग्न जमवण्याची वेळ येते तेव्हा मुंडन करतात. मुंडन केल्याने चांगला पती मिळतो अशी धारणा बोराना जातीच्या लोकांची आहे. तसेच लग्नामध्ये फोटो काढण्याची हौस प्रत्येक नवदाम्पत्याला असते. मात्र बोराना जातीमध्ये फोटो काढणे चांगले मानत नाही. यामुळे शरिरात रक्ताची कमतरता होते अशी त्यांची अंधश्रद्धा आहे. तसेच या जातीमध्ये गावातील ज्या पुरुषाचे केस लांबसडक असतात त्याला नशिबवान मानले जाते आणि त्याला मानसन्मान दिला जातो.

    रुढी-परंपरा पाळणाऱ्या या बोराना जातीच्या लोकांमध्येही आता परिवर्तन होताना दिसत आहे. या जातीचे लोकही चांगले शिक्षण घेत असून समाजामध्ये आत्मविश्वासाने वावरत आहेत. पूर्वी मुलींना घराबाहेर पडू दिले जात नव्हते, मात्र आता मुलीही शहरांमध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जात आहेत.