Transport services in Italy are disrupted due to transports strike
रोम: सध्या इटलीमध्ये मोठा गोंधळ सुरु आहे. देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामागचे कारण म्हणजे सध्या इटलीमध्ये वाहतूकदारांचा संप सुरु असून हा संप 9 एप्रलि ते 12 एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमान कंपन्यांपासून ते रेल्वेसेवापर्यंत प्रत्येक क्षेत्राच्या कामगांरांनी संप पुकारला आहे.
यामुळे इटलीतील लोकांचे जीवन कठीण झाले आहे. सध्या मेलोनी यांचे सरकार या संपांवर तोड काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान सामान्या लोकांच्या रोजच्या प्रवासाबाबत मोठा गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजेट एअरलाईन इझीडेटच्या फ्लाइट अस्टिस्टंटटनी 9 एप्रिल रोजी चार तासांच्या देशव्यापी संपाची घोषमा केली. 9 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता संप सुरु झाला ते 2:30 वाजेपर्यंत संप चालला. कामगार करार सुधारण्यासाठी हा संप सुरु करण्यात आला असल्याचे संघनांनी म्हटले आहे. इझीजेटने कोणतीही उड्डाणे रद्द केली नसून, प्रवाशांना त्यांच्या उड्डाणांबद्दल एअरलाइनकडून माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार मिलानच्या लिनेट आणि मालपेन्सा विमानतळाच्या चालकांनीही संपावर जाण्याचा निर्णय घेतला. पालेर्मो विमानकळ कर्मचाऱ्यांनी देखील संपावर जाण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान इटलीच्या नागरी वाहतूक प्राधिकरणाने (ENAC) ने उड्डाणे सकाळी 7 ते 10 पर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत सुरु राहतील असे म्हटले जात आहे. सध्या मेलोनी आमि त्यांचे सर्व अधिकार्या या संपाचे कारण जाणून घेऊ समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
रेल्वे प्रवासही ठप्प झाला असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसआय-कोबास युनियनने १० एप्रिल रोजी रात्री ९ ते ११ एप्रिल रोजी रात्री ८:५९ वाजेपर्यंत २४ तासांचा रेल्वे संप पुकारला आहे. रेल्वे चालवणारी कंपनी ट्रेनॉर्डने म्हटले आहे की, या संपामुळे लोम्बार्डी प्रदेशातील प्रादेशिक, विमानतळ आणि लांब पल्ल्याच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. सध्या अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.
या संपामुळे मेलोनी सरकारसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. केवळ कामगार संघटनाच संतप्त झाले नसून सामान्य नागरिकांची देखील गैरसोय होत आहे. इटलीच्या वाहतूक क्षेत्रात अशांतता निर्मणा झाली आहे. हा संप अशा वेळी सुरु आहे जेव्हा देशात पर्यटनाचा हंगाम सुरु होत आहे. यामुळे जॉर्जिया मेलोनी अधिकच चिंतेत आहेत.