Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा आणि युद्धनीतीवरून अंतर्गत मतभेद वाढल्याचे चित्र आहे. पेंटागॉनमध्ये मध्यपूर्वेतील अमेरिकी सैन्याच्या तैनातीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता समोर आली आहे, तर CIA आणि ODNI यांच्यात गुप्तचर माहितीच्या देवाणघेवाणीवरून संघर्ष सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 05, 2026 | 04:35 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • पेंटागॉनमध्ये युद्धनीतीवरून अस्वस्थता
  • CIA – ODNI मध्ये गुप्तचर माहितीवरून संघर्ष
  • ट्रम्प प्रशासनासाठी मोठे आव्हान
Trump Administration : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा आणि युद्धनीतीवरून अंतर्गत मतभेद वाढत असल्याचे चित्र आहे . एका बाजूला संरक्षण विभाग म्हणजेच पेंटागॉन मध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून मध्यपूर्वेतील अमेरिकी लष्करी उपस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे . दुसरीकडे CIA आणि office of the Director of National Intelligence ( ODNI ) यांच्यात गुप्तचर माहितीच्या देवाणघेवाणीवरून तणाव निर्माण झाला आहे . या घडामोडींमुळे ट्रम्प प्रशासनाच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत .

पेंटागॉनमध्ये युद्धनीतीवरून अस्वस्थता

अमेरिका आणि इराणच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेंटागॉनमध्ये लष्करी तैनाती आणि युद्धाच्या पुढील दिशेबाबत मतभेद असल्याचे कळते आहे . संरक्षण सचिव पिट हेगसेथ यांच्या नेतृत्वाखाली मध्यपूर्वेत अमेरिकी सैन्याची मोठी उपस्थिती कायम ठेवण्याच्या निर्णयावर काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवल्याचे समोर आले आहे .

खासकरून खूप वेळ चालणाऱ्या तैनतीमुळे अमेरिकी सैन्याच्या संसाधनांवर दबाव येऊ शकतो आणि इतर महत्वाच्या भागातील संरक्षण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता नई भीती व्यक्त करण्यात आली आहे . पेंटागॉनने मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेगवेगळे मत मांडले जाणे ही लष्करी प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे .

याच काळात पेंटागॉनमधील वरिष्ठ नेतृत्त्वात बदल आणि राजीनाम्यामुळेही प्रशासनावर दबाव वाढला आहे . उपसंरक्षण सचिव स्टीव्ह फिनबर्ग यांच्या भवितव्यबाबतही व्हाईट हाऊस मध्ये चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे .

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

CIA – ODNI मध्ये गुप्तचर माहितीवरून संघर्ष

राष्ट्रीय सुरक्षेच्या दुसऱ्या आघाडीवर CIA आणि ODNI यांच्यातील मतभेद अधिक गंभीर मानले जात आहेत . CIA ने काही गुप्तचर अहवालांमध्ये योगदान कमी केल्याचे समजते आहे . यात इराण युद्धाशी संबंधित काही अहवाल सुद्धा आहेत असे समोर आले आहे . ODNI ही अमेरिकेतील १८ गुप्तचर संस्थांमध्ये समन्वय साधणारी प्रमुख यंत्रणा आहे .

मात्र कोणत्या संस्थेला कोणत्या प्रकारची माहिती मिळावी , ती कशी वापरावी आणि विश्लेषणाची प्रक्रिया कोणाच्या नियंत्रणाखाली असावी यावरून CIA आणि ODNI अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे .

 Global Food Crisis : जगभरातील अन्न महागाईचा नवा धोका; युद्ध, हवामान बदलाने पुरवठ्यावर मोठा परिणाम

ट्रम्प प्रशासनासाठी मोठे आव्हान

या दोन्ही घटनांकडे वेगवेगळ्या स्वरूपाचे मतभेद म्हणून पाहिले जात असले तरी त्यांचा थेट संबंध अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा निर्णय प्रक्रियेशी आहे . युद्ध सुरु असताना लष्कराकडून वेगळी भूमिका , तर गुप्तचर यंत्रणांकडून माहिती आणि विश्लेषणाबाबत मतभेद निर्माण झाल्यास राष्ट्राध्यक्षांसमोर निर्णय घेण्याचे आव्हान अधिक वाढते .

विशेषतः इराण संघर्ष , रशिया युक्रेन आणि चीनकडून वाढणारे सामरिक आव्हान अश्या अनेक आघाड्यांवर अमेरिकेला एकाच वेळी लक्ष द्यावे लागत आहे . त्यामुळे पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय हा ट्रम्प प्रशासनासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा बनला आहे .

Web Title: Trump administration internal unrest within the trump administration rifts between the pentagon and intelligence agencies out in the open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • America news
  • Dolald Trump
  • US News
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
1

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण
2

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे
3

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे

Global Economy : बॉन्ड बाजारात खळबळ; अमेरिकेचा यिल्ड 5%च्या दिशेने
4

Global Economy : बॉन्ड बाजारात खळबळ; अमेरिकेचा यिल्ड 5%च्या दिशेने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.