Trump authorized Israel to take action against Iran and its proxy organizations
वॉशिंग्टन/जेरुसेलम: सध्या अमेरिका आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण आहे. इराणच्या अणु प्रकल्पांना आळा घालण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा शेजारी मित्र देश इस्त्रायलाला इराणवर हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. इराण आणि त्यांच्या प्रॉक्सी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी इस्त्रायलला ट्रम्प यांनी परवानगी दिली आहे. यामुळे आता इस्त्रायलला इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेला सतत परवानगी घेण्याची गरज नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाने इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठे युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या विनाशाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2020 मध्ये इराणच्या अल-कुद्स फोर्स कमांडर कासिम सुलेमानीला ठार मारण्याचे आदेश देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलला म्हटले आहे की, इथूनपुढे हुथी दहशतवाद्यांचा प्रत्येत हल्ला इराणच्या शस्त्रांस्त्रांमधून आल्याचे मानले जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केली यासाठी इराण जबाबदार असेल आणि त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. इराणसाठी हे परिणाम खूप गंभीर असतील. इराण नेहमीच इस्त्रायलचा मोठा शस्त्रू राहिला आहे. यामुळे ट्रम्प यांचा निर्णयाने मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती आली. तेव्हापासून इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा धोका निर्माण झाला. 1988 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमेरिकेन नौदलला कुवैती तेल टॅंकरवर हल्ला करणाऱ्या इराणीजहाजांना नष्ट करण्याचे आदेश दिले होते. यामुळे इराण आणि अमेरिकेत मोठा संघर्ष सुरु झाले. पर्शियन आखातामध्ये अमेरिकन खलाशांच्या अपहरणापासून ते इराणमधील अमेरिकन सैनिकांची हत्या इराणने केली.
मात्र अमेरिकेने खेट कारवाई केली नाही. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलला इराणवर हल्ल्याची परवानगी दिली आहे. यामुळे मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांनी देखील कधी इराणवर थेट कारवाईचे आदेश दिले नव्हते. यामुळे ट्रम्प यांचा हा निर्णय कोणते वळण घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मात्र सध्या परिस्थिती बदलली असून इस्त्रायल इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेविरोधीत ठाण भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेच्या दबावाखाली इराण आपला आण्विक कार्यक्रम रोखणार नाही किंवा कोणत्याही वाटाघाटींमध्ये सामील होणार नाही. त्यांनी ट्रम्प प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अमेरिका आम्हाला धमक्या देऊ शकत नाही.
आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही. अमेरिकेने जर आमच्यावर निर्बंध लादले, तर आम्हीही योग्य वेळी योग्य उत्तर देऊ.” इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनीही शनिवारी याच गोष्टीला दुजोरा दिला. त्यांनी अमेरिकेच्या दबावाला झुगारून दिले आणि सांगितले की, “इराण कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही किंवा वाटाघाटी करणार नाही.”