Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump China Visit : इराणशी संघर्षाच्या सावटात ट्रम्प चीन दौऱ्यावर रवाना; जिनपिंग यांच्याशी ‘या’ जागतिक मुद्द्यांवर करणार चर्चा

Trump China Visit : इराणसोबतच्या तणावादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चीनच्या दौऱ्याला रवाना झाले आहे. हा दौरा जागतिक समीकरणात मोठा बदल घडवून आणू शकतो. यामुळे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2026 | 01:07 PM
Trump China Visit

Trump China Visit

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प चीन दौऱ्यावर रवाना
  • इराण युद्ध आणि व्यापार युद्धावर होणार चर्चा
  • तैवानचा मुद्दाही करणार उपस्थित
Trump China Visit News in Marathi : बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा पश्चिम आशियातील इराणसोबतचा तणाव वाढत चालला आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांचा हा दौरा १३ ते १५ मे या कालावधीत होणार आहे. यावेळी ते चीन(China) चे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील. अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही राष्ट्राध्यक्षचा चीनला हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. सध्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

India Russia Relations : भारत नेहमीच…; रशियन मंत्र्यांचा पाश्चात्य देशांना टोला; तेलाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेला सुनावलं

व्यापार युद्धाला पुर्णविराम?

या दौऱ्यात केवळ व्यापारच नव्हे, तर बदलत्या जागतिक समीकरणावरही चर्चा होणार आहे. या दौऱ्याचा मुख्य हेतू अमेरिका (America) आणि चीनमधील व्यापार युद्ध थांबवणे आहे. गेल्या काही काळापासून दोन्ही देशात टॅरिफ वॉर सुरु आहे. ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

दरम्यान या दौऱ्यावर व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे म्हटले. आम्ही व्यापाराशी संबंधित गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी सविस्तर चरक्चा करु. ही भेट नक्कीच सकारात्मक राहील अशी त्यांनी आशा व्यक्त केली.

तैवानच्या सुरक्षेबाबात मोठे विधान

ट्रम्प यांच्या या दौऱ्यात तैवानचा मुद्दा सर्वात मोठ्या चर्चेचा विषय असेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या मते,  जिनपिंग या मुद्द्यावर जास्त चर्चा करतील. पण अमेरिका तैवानची सुरक्षा करण्यास सक्षम आहे, त्यांच्यावर कोणतेही संकट येणार नाही असे त्यांनी नमूद केले.

इराण युद्धावर कडक पवित्रा

इराणसोबतच्या युद्धावर बोलताना ट्रम्प यांनी इराणवर आमचे पूर्ण नियंत्रण असून आम्हाला कोणत्याही बाह्य मदतीची गरज नसल्याचे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. शी जिनपिंग यांच्याशी चीनने इराणसोबत घेतलेल्या भूमिकेवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

हे नेते ट्रम्प यांच्या शिष्टमंडळात सहभागी

  • विशेष म्हणजे दौऱ्याचे गांभीर्य लक्षात घेता ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात अनेक महत्त्वाच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे.
  • यामध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ, व्यापार प्रतिनिधी जॅमिसन ग्रीर, एरिका आणि ट्रम्प यांचा समावेश आहे. यामुळे हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
  • या दौऱ्यात अमेरिकेतील मुख्य कंपन्यांच्या सीईओंनाही आमंत्रण देण्यात आले आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क, अॅपलेचे टिम कूक, एनव्हिडिया चे जेन्सन हुआंग, मेटाच्या अध्यक्षा दिना पॉवेल मॅककॉर्मिक या तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांचा सहभाग आहे.
  • तसेच बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, ब्लॅकस्टोनचे अधिकारी स्टीफन श्वार्जमन, सिटीग्रुपचे जेन फ्रेझर , गोल्डमन सॅक्स डेव्हिड सोलोमन एरोस्पेस, पेमेंट आणि इतर उद्योगातील सीईओ आणि प्रतिनीधींना आमंत्रित करण्यात आले आहे.
Trump China Visit : ‘… ते माझा आदर करतात’, चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा मोठा दावा; तैवानच्या सुरक्षेबाबत मोठे विधान
💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याच्या मुख्य हेतू काय आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश अमेरिका चीनमधील व्यापार संबंध सुरळित करणे. दोन्ही देशांतील टॅरिफ वादावर तोडगा काढणे आणि जागतिक राजकारणातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणे आहे.

  • Que: इराण संकटाचा ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यावर काय परिणाम होईल?

    Ans: सध्या जागतिक बाजारातील अस्थिरता आणि इराण संकट यावर या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनचे इराणसोबतचे संबंध पाहता इराणच्या मुद्द्यावर चीन काय भूमिका घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ट्रम्प यांनी इराणवर आक्रमक पवित्रा मात्र कायम ठेवला आहे.

Web Title: Trump china visit iran conflict global issues talks with xi jinping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • America
  • China
  • Donald Trump
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Donald Trump : ट्रम्प यांचा भारतीय कंपनीवर मोठा घाव; CEOसह 8 जणांवर निर्बंध, नेमकं काय आहे प्रकरण?
1

Donald Trump : ट्रम्प यांचा भारतीय कंपनीवर मोठा घाव; CEOसह 8 जणांवर निर्बंध, नेमकं काय आहे प्रकरण?

India Seychelles: PM Modi रचणार इतिहास, सेशेल्सला पोहचले; 3 दिवसांचा दौरा ठरणार खास
2

India Seychelles: PM Modi रचणार इतिहास, सेशेल्सला पोहचले; 3 दिवसांचा दौरा ठरणार खास

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा
3

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
4

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.