Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेलेन्स्कीच नव्हे, तर ‘या’ देशांच्या नेत्यांशीही भिडले ट्रम्प; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी असे अनेक निर्णय घेतले यामुळे जागतिक स्तरावर वाद निर्माण झाला. तेव्हापासून ते नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2025 | 11:15 PM
Trump clashed not only with Ukriane president Zelensky, but also with france, jordan's president

Trump clashed not only with Ukriane president Zelensky, but also with france, jordan's president

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी असे अनेक निर्णय घेतले यामुळे जागतिक स्तरावर वाद निर्माण झाला. तेव्हापासून ते नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यांनी या दरम्यान विविध देशांच्या नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू, फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की, जॉर्डनचे राजा अब्दुल्ला आणि जपानी पंतप्रधान इशिबा यांचा समावेश आहे. या नेत्यांची ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या केवळ 40 दिवसांत भेट घेतली. भेटीदरम्यान अनेक वेळा वादविवाद झाले.  विशेषत: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमर झेलेन्स्की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों आणि जॉर्डनचे किंग अब्दुल्लाह यांच्यासोबत त्यांच्या तणावपूर्ण चर्चा झाल्या.

ट्रम्प आणि झेलेन्स्की वाद

फेब्रुवारी 28 रोजी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की व्हाइट हाऊमध्ये ट्रम्प यांच्या भेटीसाठी गेले होते. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाद झाला. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण करण्याचा आरोप केला आणि त्यांना फटकारले. हा वाद इतका वाढला की, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी यामध्ये मध्यस्थी करावी लागली. या वादाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या या वादाची चर्चा जागतिक स्तरावर सुरु असून झेलेन्स्कींना युरोपियन देशांकडून पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प विलिन बनले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘ट्रम्पशी संबंध सुधारण्यावर लक्ष्य केंद्रित करा’; NATO प्रमुखांचा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींना सल्ला

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांच्यासी मतभेद

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनीही व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली होती. संयुक्त पत्रकार परिषदेदम्यना ट्रम्प यांनी युरोपियन देशांना केवळ कर्जाच्या स्वरुपात यूक्रेनला मदत केल्याचा दावा तेला. मात्र, मॅक्रों यांनी याला विरोध करत स्पष्ट केले की, त्यांची मदत शांततेसाठी होती, कर्जासाठी नव्हे.

जॉर्डनच्या किंग अब्दुल्लाह यांना धमकी

जॉर्डनचे किंग अब्दुल्लाह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यन ट्रम्प यांनी गाझा पट्टीवर अमेरिकेचा ताबा असल्याचे सांगितले. त्यांनी जॉर्डन यांना पॅलेस्टिनी निर्वासितांना त्यांच्या देशात स्थान देण्यास सांगितले, मात्र अब्दुल्लाह यांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर ट्रम्प यांनी जॉर्डन आणि इजिप्तला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत कपात करण्याची धमकी दिली.

इतर नेत्यांची भेट

याशिवाय, ट्रम्प यांचे जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्यासोबत व्यापर तुटीच्या मुद्दयावर चर्चा झाली. परंतु ही भेट उत्कृष्ट ठरली. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी यूक्रेनमधील ब्रिटिश सैन्याच्या मदतीसंदर्भात संभ्रम निर्माण करणारी विधाने केली.

या सर्व घटनांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दृष्टिकोनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. त्यांच्या निर्णयपद्धतीवर आणि जागतिक नेत्यांशी वागण्याच्या पद्धतीवर अनेक देशांमध्ये चर्चा सुरु असून टीका केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायलचा रमजानच्या काळात ‘हा’ मोठा निर्णय; जागतिक स्तरावर खळबळ

Web Title: Trump clashed not only with ukriane president zelensky but also with france jordans president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 11:15 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत
1

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून
2

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
3

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य
4

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.