
Trump Gaza Peace Plan
Trump Gaza Peace Plan : तेल अवीव : गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले इस्रायल हमास युद्ध (Israel Hamas War) सध्या निवळले आहे. यावर युद्धबंदी करण्यात आली असून गाझा (Gaza) योजनेतील पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. हमास आणि इस्रायलने कैद्यांना सोडले आहे. परंतु दुसऱ्या टुप्प्यात पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. हमासने दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावाला विरोध केला आहे.
Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन
गाझा योजनेतील दुसऱ्या टप्प्यात अडथळा
दरम्यान ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रात दुसरा टप्पा मांडला होता. या योजनेवर काल, सोमवारी (१७ नोव्हेंबर) संयुक्त राष्ट्रात मतदान करण्यात आले. या दुसऱ्या प्रस्तावात गाझामध्ये आंतरराष्ट्रीय सैन्य तैनात केले जाणार आहे. याला संयुक्त राष्ट्राने मान्यता दिला आहे. परंतु हमासने याला तीव्र विरोध केला आहे. या दुसऱ्या टप्प्यात गाझामध्ये लष्करी हालचाली कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सैन्य तैनात होईल. हे सैन्य गाझातील सर्व शस्त्रांची ठिकाणे, गुप्त ठिकाणे, लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करतील असे या प्रस्तावात सांगण्यात आले आहे.
हमासने का केला ट्रम्पच्या प्रस्तावाला विरोध?
ट्रम्प यांचा दुसरा प्रस्ताव हा हमासच्या अस्तित्वार घाला घालणार आहे आणि हमासने कोणत्याही प्रकारे शरणागती पत्करण्यास नका दिला आहे. यामुळे गाझामध्ये आंतरराष्ट्रीय सैन्य तैनाती म्हणजे हमासला धोका निर्माण होणारा आहे. हमासच्या मते, ट्रम्प यांचा हा प्रस्ताव गाझा पट्टीत आंतरराष्ट्रीय यंत्रणा लादणारा आहे.यामुळे हमासने याला विरोध केला आहे.
गाझा योजनेतील पहिला टप्पा यशस्वी
डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील युद्धबंदी आणि पुनर्बांधणीसाठी २० कलमी योजना आखली होती. या योजनेअंतर्गत कैद्यांच्या सुटकेपासून गाझाचे पुन्हा पुनर्वसन करण्यासाठी काही योजना आखण्यात आल्या होत्या या योजनेतील पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. इस्रायल आणि हमासने कैद्यांना सोडले आहे.
ट्रम्प यांचा गाझा प्लॅन
ट्रम्प यांना गाझाला दहशतवाद मुक्त आणि शांततामय प्रदेश बनवायचे आहे. यासाठी त्यांच्या योजनेचा पहिला कैद्यांच्या सुटकेचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता गाझात सैन्य तैनाती, यानंतर सरकारची स्थापना आणि नंतर गाझाच्या पुर्नविकासाची प्रक्रिया सुरु होईल. सीमा सुरक्षाही मजबूत केली जाईल. युद्ध संपेपर्यंत सर्व हल्ले आणि गोळीबार थांबवला जाईल. यामुळे गाझात भविष्यात कोणत्याही प्रकारची अस्थिपता निर्माण होणार नाही.
Ans: ट्रम्प यांच्या गाझा योजनेतील दुसऱ्या टप्पात गाझात आंतरराष्ट्रीय सैन्य दल स्थापन केले जाईल, जे गाझातील सर्व शस्त्रे, लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करणार आहे.
Ans: गाझात आंतरराष्ट्रीय सैन्य तैनातीला हमासने विरोध केला असून ट्रम्प यांचा हा प्रस्ताव गाझा पट्टीत आंतरराष्ट्रीय यंत्रणा लादणारा आणि त्यांना धोका निर्माण करणार असल्याचे म्हटले आहे.