Trump invites Israel's PM Netanyahu to meet with him at the White House
वॉशिंग्टन: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिका भेटीचे आमंत्रण मिळाले आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस आणि नेतन्याहूंच्या मंत्रीमंडळाने दिलेल्या माहितीनुसार नेतन्याहू 4 फेब्रुवारी रोजी व्हाईट हाऊसला भेट देणार असून अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनातील पहिले पाहुणे ठरले आहे. ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि त्यांच्या शेजारील देशांत शांतता प्रस्थापित करण्याच्या चर्चेसाठी हे आमंत्रण दिल्याचे व्हाईयट हाऊसने म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्याकाळात परदेशी राजकारण्याचा हा पहिलाच अधिकृत दौरा असणार आहे. यासंबंधी इस्त्रायलने जारी केलेल्या निवेदतनात नेतन्याहूंनी ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यात उत्सुक असल्याचे म्हटले आहे. दोन्ही नेते इस्रायल आणि त्याच्या शेजारी देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करणार आहेत. ट्रम्प आणि नेतन्याहूंची ही भेट चार वर्षांनी होत आहे.
संघर्ष कायमचा संपवण्याचे उद्दिष्ट
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या ट्रम्प इस्त्रायल आणि हमासमधील युद्धबंदीसाठी सतत दबाव आणत आहे. या संदर्भात ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. इस्त्रायल आणि हमासमधील 15 महिन्यांच्या युद्धानंतर 19 जानेवारी रोजी संघर्षविराम करण्यात आला होता. या काळात हमासने बंधक बनवलेल्या इस्त्रायली ओलिस आणि इस्त्रायलच्या कैदत असलेल्या फिलिस्तानी नागरिकांची सुटक करण्यात आली होती. सध्या युद्धबंदीचा 3 टप्पा सुरु असून हा संघर्ष कायमचा संपवण्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहूंच्या येत्या भेटीदरम्यान इस्त्रायल आणि हमासमधील संघर्षावर काय चर्चा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध पूर्णत: संपुष्टात आणण्यासाठी या चर्चेच तोडगा निघेल अशी आशा जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे.
शस्त्र पुरवठा बंदी उठवण्याचा निर्णय
मात्र, एककीडे ट्रम्प यांनी इस्त्रायलवरील शस्त्र पुरवठा बंदी उठवली असून यामुळे पुन्हा एकदा युद्ध सुरु होण्याची अशंका व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे मध्ये पूर्वेत तणाव वाढण्याची आणि संभाव्य विध्वंसाची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. व्हाईट हाऊस ने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलला 2000 पाऊंड वजनाच्या बॉम्बची शिपमेंट पाठवण्याची परवानगी ट्रम्प यांनी दिली आहे. हा निर्णय माजी अध्यक्ष जो बायडेन मागील वर्षी स्थगित केला होता.
युद्धबंदीनंतर पॅलेस्टिनी लोक उत्तर गाझामध्ये परतले
खरंतर इस्त्रायल आणि हमासमधील संघर्षविरामानंतर रफाह सीमा आणि दक्षिण गाझाच्या क्षेत्रांतून 3 लाखहून अदिक पॅलेस्टिनी नागरीक उत्तरी गाझात परतले होते. मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे गाझाच्या या भागांत पुन्हा एकदा चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.युद्ध सुरु झाल्यानंतर 10 लाखाहूंन अधिक लोक दक्षिणेकडे गेले होते. तर 47 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहे.याशिवाय 1.10 लाखांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. युद्धबंदी करारानुसार, इस्रायल 25 जानेवारीपासून पॅलेस्टिनींना उत्तर गाझामध्ये परतण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.