Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ECFR : ट्रम्पचे फासे पडले उलटे! अमेरिका नव्हे तर चीनलाच बनवतोय ग्रेट; 21 देशांच्या सर्वेक्षणात अजबच अहवाल झाला प्रसारित

China-Rise: एका सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की जगभरातील बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की ट्रम्प यांचा "राष्ट्र-प्रथम", "अमेरिका पुन्हा महान बनवा" हा दृष्टिकोन प्रत्यक्षात चीनला पुन्हा महान बनविण्यास मदत करत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 15, 2026 | 02:15 PM
trump making china great again ecfr 21 country survey report 2026

trump making china great again ecfr 21 country survey report 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘अमेरिका फर्स्ट’ की ‘चीन फर्स्ट’?
  • मित्रांपासून दुरावलेली अमेरिका
  • चीनचा वाढता दबदबा

ECFR 21-country survey Trump China 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे “मेक अमेरिका ग्रेट अगेन” (MAGA) हे ब्रीदवाक्य जगभरात गाजत असले तरी, एका नव्या जागतिक सर्वेक्षणाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ (ECFR) या प्रभावशाली थिंक टँकने केलेल्या २१ देशांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिका पुन्हा महान होण्याऐवजी चीनला जागतिक महासत्ता बनण्यासाठी आयती संधी मिळत आहे.

२६,००० लोकांचा कौल: चीनचा प्रभाव वाढणार!

या सर्वेक्षणात भारत, अमेरिका, चीन, रशिया, ब्राझील आणि १३ युरोपीय देशांमधील सुमारे २६,००० लोकांनी सहभाग घेतला होता. यातील बहुतांश लोकांचे असे मत आहे की, येणाऱ्या दशकात चीनचा जागतिक प्रभाव प्रचंड वाढणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दक्षिण आफ्रिकेतील ८३%, ब्राझीलमधील ७२% आणि अगदी अमेरिकेतील ५४% लोकांनाही चीनची शक्ती वाढण्याची खात्री वाटत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Secret Pact: अमेरिकेचा विश्वासघात! ट्रम्पला पत्ताच नव्हता अन् इराणने खेळली चाणाक्ष राजनैतिक चाल; थेट इस्राएल-रशियाच्या आशीर्वादाने

युरोप आणि अमेरिकेतील दुरावा वाढला

अहवालानुसार, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेने ‘नाटो’ (NATO) आणि युरोपीय मित्रांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मित्र राष्ट्र दुरावली आहेत. बहुतेक युरोपीय नागरिक आता अमेरिकेला ‘विश्वासार्ह मित्र’ मानत नाहीत. युक्रेनसारखे देश आता मदतीसाठी अमेरिकेऐवजी युरोपियन युनियनकडे पाहत आहेत. दुसरीकडे, रशियामध्ये आता अमेरिकेपेक्षा युरोपला मोठा शत्रू मानले जात आहे, जे ट्रम्प यांच्या रशियाप्रती असलेल्या मऊ धोरणाचे निदर्शक मानले जाते.

📢New report! How is Trump making China great again & what does it mean for Europe? New ECFR survey data shows that Trump’s “America First” approach is pushing states closer to China while reducing fear of the US.
✍️ @markhleonard, Ivan Krastev & @fromTGA.… pic.twitter.com/a1AopkE0Ll
— ECFR (@ecfr) January 15, 2026

credit – social media and Twitter

इलेक्ट्रिक वाहने आणि ऊर्जेत चीनचा डंका

बहुतेक युरोपीय देशांमधील नागरिकांना अशी अपेक्षा आहे की, चीन लवकरच इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे, जगाला चीनच्या या वाढत्या वर्चस्वाबद्दल आता पूर्वीसारखी भीती वाटत नाहीये. केवळ दक्षिण कोरिया आणि युक्रेनमध्येच चीनला ‘प्रतिस्पर्धी’ मानले जाते, तर भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत चीनची प्रतिमा ‘मित्र’ म्हणून सुधारत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran protests 2026: इराणमध्ये AI ने घातला धुमाकूळ! आंदोलनाचे बनावटच VIDEO VIRAL; 35 लाख लोकांनी पाहिला ‘खोटा’ हिंसाचार

भारताची भूमिका काय?

सर्वेक्षण केलेल्या देशांपैकी भारत हा एकमेव असा देश आहे, जिथे बहुसंख्य लोक अजूनही अमेरिकेला आपला नैसर्गिक मित्र मानतात. भारताचा अमेरिकेच्या मूल्यांवर आणि हितसंबंधांवर अजूनही विश्वास आहे. मात्र, जागतिक स्तरावर अमेरिकेचा प्रभाव वाढेल असे वाटणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ट्रम्प यांच्या व्हेंझुएला आणि ग्रीनलँडमधील हस्तक्षेपाच्या धोरणामुळे ‘मजबूत होण्यापेक्षा लोकांनी आपल्याला घाबरावे’ अशी प्रतिमा तयार झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ECFR सर्वेक्षण नक्की काय आहे?

    Ans: 'युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स'ने २१ देशांतील २६,००० लोकांच्या मतांवरून जागतिक सत्तेच्या संतुलनावर काढलेला हा एक सर्वसमावेशक अहवाल आहे.

  • Que: लोक अमेरिकेला मित्र मानणे का कमी करत आहेत?

    Ans: ट्रम्प यांची 'अमेरिका फर्स्ट' धोरणे, आंतरराष्ट्रीय करारांतून माघार आणि मित्र राष्ट्रांवर लादलेले निर्बंध यामुळे जागतिक स्तरावर अमेरिकेची विश्वासार्हता कमी झाली आहे.

  • Que: चीनचा प्रभाव वाढण्याचे मुख्य कारण काय सांगितले आहे?

    Ans: तंत्रज्ञान (विशेषतः ईव्ही आणि अक्षय ऊर्जा) आणि अमेरिकेने सोडलेल्या जागतिक नेतृत्वाच्या पोकळीचा फायदा चीनला मिळत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

Web Title: Trump making china great again ecfr 21 country survey report 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • America
  • China
  • Donald Trump
  • World War 3

संबंधित बातम्या

Secret Pact: अमेरिकेचा विश्वासघात! ट्रम्पला पत्ताच नव्हता अन् इराणने खेळली चाणाक्ष राजनैतिक चाल; थेट इस्राएल-रशियाच्या आशीर्वादाने
1

Secret Pact: अमेरिकेचा विश्वासघात! ट्रम्पला पत्ताच नव्हता अन् इराणने खेळली चाणाक्ष राजनैतिक चाल; थेट इस्राएल-रशियाच्या आशीर्वादाने

US Supreme Court on Tariff: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुन्हा लांबणीवर! ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त शुल्कावर न्यायालयीन पेच
2

US Supreme Court on Tariff: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुन्हा लांबणीवर! ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त शुल्कावर न्यायालयीन पेच

Greenland Mystery : नकाशावर अमेरिकेत, पण मालक युरोपचा! ग्रीनलँड आजही डेन्मार्कचा गुलाम? यामागचं गूढ काय?
3

Greenland Mystery : नकाशावर अमेरिकेत, पण मालक युरोपचा! ग्रीनलँड आजही डेन्मार्कचा गुलाम? यामागचं गूढ काय?

Greenland: महाशक्तीचे अत्याधुनिक 175 अब्ज डॉलर्सचे ‘Golden Dome’ आणि ग्रीनलँड कनेक्शनचं आहे ट्रम्पचा आग्रही अट्टाहास, वाचा का?
4

Greenland: महाशक्तीचे अत्याधुनिक 175 अब्ज डॉलर्सचे ‘Golden Dome’ आणि ग्रीनलँड कनेक्शनचं आहे ट्रम्पचा आग्रही अट्टाहास, वाचा का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.