Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Conflict: ट्रम्प यांचा ‘शूट टू किल’ आदेश! इराणच्या बोटी समुद्रातच उडवणार; US Navy हटवतेय होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भूसुरुंग

Trump orders US Navy Iran boats 2026 : "याबाबतीत कोणताही संकोच नसावा. शिवाय, आमची सुरुंगशोधक जहाजे सध्या सामुद्रधुनी साफ करत आहेत," असे डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 24, 2026 | 12:59 PM
trump orders us navy to destroy iranian boats strait of hormuz mine clearing 2026

trump orders us navy to destroy iranian boats strait of hormuz mine clearing 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा ‘फायर’ आदेश
  • सागरी मार्ग मोकळा करण्याची मोहीम
  • शांतता चर्चेत तणाव

Strait of Hormuz mine clearing mission : जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) सध्या अत्यंत तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी घेतलेल्या एका निर्णयाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. इराणच्या निमलष्करी ‘रिव्होल्यूशनरी गार्ड्स’ने (IRGC) तीन मालवाहू जहाजांवर हल्ले करून त्यातील दोन जहाजे ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी “जशास तसे” उत्तर देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

“संकोच करू नका, थेट गोळ्या घाला!”

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे अमेरिकन नौदलाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “मी नौदलाला आदेश दिले आहेत की, होर्मुझच्या पाण्यात कोणतीही इराणी सुरुंग पेरणारी बोट दिसली, मग ती कितीही लहान असली तरी, तिला गोळीबार करून नष्ट करा.” ट्रम्प यांच्या या विधानामुळे आखाती देशांमधील युद्धाची शक्यता अधिक गडद झाली आहे. इराणकडून सागरी मार्गावर सातत्याने होणाऱ्या हस्तक्षेपाला लगाम घालण्यासाठी अमेरिकेने आता शस्त्रांची भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Embassy: ‘कभी इंडिया आके देखो…’ भारताला नरक’ बोलणाऱ्या ट्रम्पना इराणने दाखवली जागा; केले ‘असे’ धडाकेबाज Tweet

भूसुरुंग हटवण्याची मोहीम तिप्पट वेगाने

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील तेल व्यापाराचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. इराणने या मार्गात पेरलेले भूसुरुंग जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठे संकट बनले आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकन सुरुंगशोधक जहाजे सध्या हा मार्ग साफ करण्याचे काम करत आहेत. “हे काम सुरू ठेवा, पण त्याचा वेग तिप्पट करा,” असे आदेश त्यांनी लष्कराला दिले आहेत. व्यापार सुरळीत व्हावा यासाठी अमेरिकेने आपले संपूर्ण नौदल सामर्थ्य पणाला लावले आहे.

Multi-national conference was held at Northwood yesterday to consider military options to ensure shipping flows in Strait of Hormuz, once the Iran war comes to an end. UK has offered autonomous mine-hunting capability and specialist divers but no decision has been made on… pic.twitter.com/ROsvryDmex — Navy Lookout (@NavyLookout) April 24, 2026

credit – social media and Twitter

इराणमधील नेतृत्वाचा गोंधळ आणि पाकिस्तानचे प्रयत्न

ट्रम्प यांनी इराणच्या अंतर्गत परिस्थितीवरही भाष्य केले आहे. त्यांच्या मते, इराणमध्ये सध्या मध्यममार्गी आणि कट्टरपंथी यांच्यात तीव्र मतभेद असून, देशाला कोणाचे नेतृत्व मान्य आहे, हे त्यांनाच माहीत नाही. दुसरीकडे, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी हे अमेरिका आणि इराणला पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी धडपडत आहेत. त्यांनी अमेरिकेच्या उपराजदूत नताली बेकर यांची भेट घेऊन इस्लामाबादमध्ये चर्चेची दुसरी फेरी आयोजित करण्याबाबत चर्चा केली आहे. मात्र, एकीकडे शांततेचे प्रयत्न आणि दुसरीकडे “नष्ट करा” असे आदेश, यामुळे या वादाचा अंत नेमका कसा होणार, याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘मी खरंच मोठी चूक केली, ते मांजर-कुत्र्यांसारखे…’, इराणचं नाव घेऊन ट्रम्प यांनी पुन्हा केले खळबळजनक विधान

सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पेंटागॉनने प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये अमेरिकन लष्कर इराणशी संबंधित जहाजांवर ताबा मिळवताना दिसत आहे. इराणला होणारी भौतिक मदत रोखण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे संरक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. होर्मुझमधील कोणत्याही अडथळ्याचा थेट परिणाम भारतासह जगातील अनेक देशांतील इंधन दरांवर होणार आहे, त्यामुळे या संघर्षाचे पडसाद केवळ आखाती देशांतच नव्हे, तर जागतिक स्तरावर उमटणार हे निश्चित आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला कोणता आदेश दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीत कोणतीही इराणी सुरुंग पेरणारी बोट दिसल्यास तिला तात्काळ गोळीबार करून नष्ट करण्याचे आदेश नौदलाला दिले आहेत.

  • Que: होर्मुझच्या सामुद्रधुनीत सध्या काय सुरू आहे?

    Ans: अमेरिकेची सुरुंगशोधक जहाजे इराणने पेरलेले सागरी भूसुरुंग हटवून व्यापाराचा मार्ग मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवत आहेत.

  • Que: पाकिस्तानचे या वादात काय भूमिका आहे?

    Ans: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि गृहमंत्री मोहसिन नक्वी हे अमेरिका आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इस्लामाबादमध्ये दुसऱ्या फेरीची चर्चा आयोजित करण्याचे प्रयत्न करत आहेत.

Web Title: Trump orders us navy to destroy iranian boats strait of hormuz mine clearing 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • iran
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Saudi Aramco: होदेदाहचा सूड! येमेनी ड्रोन्सचा सौदीच्या अरामको रिफायनरीवर भयानक क्षेपणास्त्र हल्ला; अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित
1

Saudi Aramco: होदेदाहचा सूड! येमेनी ड्रोन्सचा सौदीच्या अरामको रिफायनरीवर भयानक क्षेपणास्त्र हल्ला; अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित

Erbil Strike: इराकमधील अमेरिकी तळाजवळ 7 मोठे स्फोट; संपूर्ण मध्य पूर्वेत हाय-अलर्ट, US-Iran संघर्षाने जागतिक बाजारात धुमाकूळ
2

Erbil Strike: इराकमधील अमेरिकी तळाजवळ 7 मोठे स्फोट; संपूर्ण मध्य पूर्वेत हाय-अलर्ट, US-Iran संघर्षाने जागतिक बाजारात धुमाकूळ

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर सलग 13 व्या रात्री भीषण हल्ले; होर्मुझच्या वादाने पेटले आखात, क्रूड ऑइल 100 डॉलर पार
3

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर सलग 13 व्या रात्री भीषण हल्ले; होर्मुझच्या वादाने पेटले आखात, क्रूड ऑइल 100 डॉलर पार

IRGC Attack THAAD: जॉर्डन आणि कुवेतमध्ये स्फोटांची मालिका; इराणच्या मिसाइलनी अमेरिकेच्या अभेद्य कवचालाच भेदले
4

IRGC Attack THAAD: जॉर्डन आणि कुवेतमध्ये स्फोटांची मालिका; इराणच्या मिसाइलनी अमेरिकेच्या अभेद्य कवचालाच भेदले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.