Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’

Trump vs Pope:अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील संघर्ष समजण्यासारखा आहे, कारण हे तीनही देश वेगवेगळ्या धर्मांचे आहेत, पण आता ट्रम्प यांनी स्वतः ख्रिश्चन असूनही पोप लिओ यांच्याशी संघर्ष केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 16, 2026 | 03:30 PM
trump pope leo conflict church vs state us christian population history 2026

trump pope leo conflict church vs state us christian population history 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प विरुद्ध पोप महासंग्राम
  • चर्च विरुद्ध राज्य संघर्ष
  • ऐतिहासिक तणाव

Trump vs Pope Leo XIV conflict 2026 : एप्रिल २०२६ मध्ये जागतिक राजकारणात एक अतिशय दुर्मिळ पण धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. जगातील सर्वात सामर्थ्यवान ख्रिश्चन राष्ट्राचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि कॅथोलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप लिओ( चौदावे यांच्यात उघडपणे वाकयुद्ध सुरू झाले आहे. स्वतःला ख्रिश्चन मानणारे आणि कॅथोलिक मतदारांच्या जोरावर सत्तेत आलेले ट्रम्प, एका अमेरिकन वंशाच्या पोपशी का भिडले आहेत? हा केवळ दोन व्यक्तींमधील वाद नसून, तो ‘स्टेट’ (राज्य) आणि ‘चर्च’ (धमसंस्था) यांच्यातील शतकानुशतके चालत आलेल्या संघर्षाचा नवीन अध्याय आहे.

इराण युद्धाची ठिणगी आणि ट्रम्प यांचा संताप

या वादाची ठिणगी जानेवारी २०२६ मध्ये पडली, जेव्हा ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलामध्ये सत्तापालट केला. मात्र, खरा भडका एप्रिलमध्ये उडाला, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर लष्करी हल्ले चढवले. पोप लिओ चौदावे यांनी या युद्धाचा तीव्र निषेध करत “युद्धखोरांच्या प्रार्थना देव ऐकत नाही” असे स्पष्टपणे सुनावले. ट्रम्प यांनी याला आपल्या परराष्ट्र धोरणावर आणि ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणावरील हल्ला मानले. त्यांनी तर एका पावलापुढे जाऊन पोप यांच्या कामाला “गुन्हा” असे संबोधले. इतकेच नाही तर, स्वतःची तुलना येशू ख्रिस्ताशी करणारी एआय प्रतिमा पोस्ट करून त्यांनी खळबळ उडवून दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Amir Hamza : ‘यमदूत आला अन् गेम करून गेला’, हाफिज सईदचा ‘उजवा हात’ लाहोरमध्ये रक्ताच्या थारोळ्यात, भारताच्या शत्रूचा गेम ओव्हर

राज्य आणि चर्च: संघर्षाचा १०७ वर्षांचा इतिहास

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि पोप यांच्यातील संघर्षाची ही पहिलीच वेळ नाही. १९१९ मध्ये वुड्रो विल्सन जेव्हा व्हॅटिकनमध्ये गेले, तेव्हा त्यांनी पोपचा आशीर्वाद घेताना गुडघे टेकण्यास नकार दिला होता, तिथूनच हा “अस्वस्थ करणारा प्रवास” सुरू झाला. पुढे १९५१ मध्ये हॅरी ट्रुमन यांनी व्हॅटिकनमध्ये राजदूत नेमण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अमेरिकेतील प्रोटेस्टंट समुदायाने त्याला विरोध केला. १९९३ मध्ये बिल क्लिंटन आणि पोप जॉन पॉल दुसरे यांच्यात गर्भपाताच्या मुद्द्यावरून उघड मतभेद झाले होते. जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या इराक युद्धालाही तत्कालीन पोप यांनी कडाडून विरोध केला होता.

#NSTcolumnists US President Donald Trump has feuded with Pope Leo XIV over the Iran war – setting off an unholy row that could have serious political implications for the Republican leader at home.https://t.co/pnLNH0rbuk pic.twitter.com/NjqbGhR34J — New Straits Times (@NST_Online) April 14, 2026

credit – social media and Twitter

बहुसंख्य ख्रिश्चन असूनही अमेरिका चर्चविरोधी का?

अमेरिकेत २१ कोटींहून अधिक ख्रिश्चन आहेत, तरीही अमेरिकेचे सरकार चर्चच्या आदेशावर चालत नाही. याचे मुख्य कारण अमेरिकेच्या संविधानातील पहिली दुरुस्ती आहे. थॉमस जेफरसन यांनी म्हटल्याप्रमाणे, अमेरिका हे ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य आहे, जिथे धर्म आणि सरकार यांच्यात एक भक्कम भिंत आहे. अमेरिकेचे संस्थापक पित्यांनी ही काळजी घेतली होती की, युरोपप्रमाणे इथे धर्माच्या नावाने हुकूमशाही गाजवली जाणार नाही. राष्ट्राध्यक्ष संविधानाची शपथ घेतात, बायबलची नाही. त्यामुळेच जेव्हा राष्ट्रीय हित आणि धार्मिक नैतिकता समोरासमोर येतात, तेव्हा राष्ट्राध्यक्ष संविधानाला आणि देशाला प्राधान्य देतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Crisis: ‘इराणी युरेनियमच कारण!’ ऊर्जा युद्धात रशिया छुपा योद्धा; दिमित्री म्हटले, ‘ट्रम्पना डावलून पुतिन भारतासाठी…’

काय असेल भविष्यातील चित्र?

परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ प्रसेनजित बिस्वास यांच्या मते, हा संघर्ष नैतिक मार्गदर्शन (पोप) आणि राजकीय जबाबदारी (ट्रम्प) यांच्यातील आहे. पोप शांततेचा संदेश देत राहतील, तर ट्रम्प सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोड करणार नाहीत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी ट्रम्प यांची भाषा अमान्य असल्याचे म्हटले आहे. व्हॅटिकन आणि व्हाईट हाऊस या दोन्ही सत्ताकेंद्रांमधील हा हट्टीपणा जागतिक राजकारणावर काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प आणि पोप लिओ चौदावे यांच्यातील मुख्य वादाचे कारण काय आहे?

    Ans: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलची लष्करी मोहीम आणि व्हेनेझुएलातील सत्तापालट यावरून पोप यांनी युद्धाचा निषेध केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

  • Que: अमेरिकेच्या संविधानात धर्म आणि राज्याबद्दल काय तरतूद आहे?

    Ans: अमेरिकेच्या संविधानातील पहिली दुरुस्ती धर्म आणि राज्य यांच्यात स्पष्ट भिंत निर्माण करते, ज्यामुळे सरकार कोणत्याही धर्माला राजधर्म मानू शकत नाही.

  • Que: इतिहासात कोणत्या राष्ट्राध्यक्षांचे पोपशी मतभेद झाले होते?

    Ans: वुड्रो विल्सन, बिल क्लिंटन (गर्भपात), जॉर्ज डब्ल्यू. बुश (इराक युद्ध) आणि बराक ओबामा यांचे पोपशी महत्त्वाच्या धोरणात्मक मुद्द्यांवरून मतभेद झाले होते.

Web Title: Trump pope leo conflict church vs state us christian population history 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

America Vs China :जागतिक स्तरावर अडचणीत अमेरिका, प्यू रिसर्चच्या नवीन सर्वेत चीनने घेतली ऐतिहासिक आघाडी
1

America Vs China :जागतिक स्तरावर अडचणीत अमेरिका, प्यू रिसर्चच्या नवीन सर्वेत चीनने घेतली ऐतिहासिक आघाडी

Bangladesh Crisis: सत्य लिहिण्याची हीच का शिक्षा? बांगलादेशात 4 पत्रकारांवर अंदाधुंद गोळीबार; खुलना शहरात प्रचंड तणाव
2

Bangladesh Crisis: सत्य लिहिण्याची हीच का शिक्षा? बांगलादेशात 4 पत्रकारांवर अंदाधुंद गोळीबार; खुलना शहरात प्रचंड तणाव

ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?
3

ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?

BabElMandeb: ‘अश्रूंचे द्वार’ जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? ‘बाब अल-मंदेब’ नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप
4

BabElMandeb: ‘अश्रूंचे द्वार’ जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? ‘बाब अल-मंदेब’ नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.