
Donald Trump and Zelensky Meet
कीव हादरलं! ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा जोरदार हल्ला; युक्रेनवर दबाव वाढवण्याचा पुतिनचा कट?
वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी युद्ध संपणार असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, बैठकी यशस्वी झाली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा झाली. ट्रम्प यांनी विश्वास व्यक्त केला की रशिया युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर आहे. या वेळी अनेक गुतांगुंतीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. परंतु युरोपियन नेत्यांनी युद्ध रोखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ट्रम्प यांनी या युद्धाचे सर्वात घातक असे वर्णन केले.
ट्रम्प यांनी असेही म्हटले की, त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशीही चर्चा केली आहे. त्यांनी देखील हे युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे. ट्रम्प यांनी पुतिन यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी पुतिन आणि झेलेन्स्की यांच्या भेटीचेही संकेत दिले आहे.
ट्रम्प यांनी म्हटले की, पुतिन केवळ योग्य वेळेची वाट पाहत आहे. ते युक्रेनला भेट देण्याची शक्यता आहे. पुतिन यांना उदामतवादी संबोधत युद्ध थांबणार असल्याचा दावा केला. ट्रम्प यांनी सांगितले की, पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेतून अनेक चांगल्या आणि सकात्मक अशा गोष्टी समोर आल्या आहेत. हे थोडे विचित्र वाटेल पण हे युद्ध आता संपणार आहे.
दरम्यान या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी देखील चर्चा यशस्वी झाल्याचे संकेत दिले. त्यांनी सांगितले की, युद्धबंदीच्या सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली असून दोन्ही बाजूंनी ९० टक्के सहमीत झाली आहे. तसेच अमेरिका-युक्रेन सुरक्षा हमीवर देखील १०० टक्के सहमती झाली आहे. आता या योजनेची केवळ अमलबाजवणी बाकी असल्याचे झेलेन्स्कींनी म्हटले. त्यांनी सांगितले की, रशिया आणि युक्रेन शांततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा युद्धबंदीवर अंतिम निर्णयासाठी जानेवारी २०२६ मध्ये वॉशिंग्टन येथे बैठक होईल असे झेलेन्स्कींनी म्हटले.
Putin Ukraine-War News: ‘मी युद्ध थांबवेन पण…’ पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवली अशी अट