Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Trade Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांचा ‘टॅरिफ वॉर’चा इशारा; भारतासह अनेक देशांवर ‘Unfair Trade’ ची चौकशी

Donald Trump Trade Investigation : अमेरिकेने भारत, चीनसह जगभरातील व्यापारी भागीदारांची चौकशी सुरु केली आहे. दोन आघाड्यांवर चौकशी होत असून यामध्ये तूट आढल्यास या देशांवर टॅरिफ लादले जाऊ शकते.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 12, 2026 | 10:43 AM
US Opens Unfair Trade Probe with India and other Countries

US Opens Unfair Trade Probe with India and other Countries

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब
  • युद्धाच्या धामधुमीत अमेरिकन सरकाराचा मोठा निर्णय
  • हे १६ देशही रडारवर
Donald Trump Tariff Policy : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. इराणशी युद्धादरम्यान ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत भारत, चीनसह अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी बारतासह १६ प्रमुख व्यापारी भागीदारांविरोधात मोठे पाउल उचलले आहे. अमेरिकेच्या व्यापार तूट कमी करण्याच्या धोरणांतर्गत ट्रम्प या देशांवर पुन्हा टॅरिफ लादण्याची शक्यता आहे.

US Iran War : ‘आम्ही पहिल्याच तासांत युद्ध जिंकले होते’ ; ट्रम्प यांची इराणविरुद्ध विजयाची घोषणा, जगभरात खळबळ

यापूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे शुल्क (Tariff) रद्द केले होते. परंतु ट्रम्प सरकार आता यासाठी नवी पर्यायांचा शोध घेत आहे. यामुळे व्यापार तणाव वाढण्याची शक्यता आहे.

ट्रम्प सरकारने सध्या दोन आघाड्यांवर व्यापारी भागीदारांची चौकशी सुरु केली आहे.

  • ट्रम्प यांच्या मते, अनेक देश त्यांच्या देशांतर्गत गरजेपेक्षा जास्त करत उत्पादन करून माल स्वस्त दरात अमेरिकेत विकत आहे. यामुळे त्यांच्या औद्योगिक क्षमतांबाबत चौकशी करण्यात येणार आहे.
  • तसेच या देशांतून येणाऱ्या मालांची सक्तीच्या मजुरीअंतर्गतही चौकशी केली जाणार आहे.

या देशांवर ट्रम्प टॅरिफ लादण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प सरकार भारतासह, चीन, युरोपियन युनियन, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, आणि व्हिएतनाम यांसारख्या व्यापारी भागीदारांवर कर लादण्याची शक्यात आहे. यामुळे या देशांसोबत अमेरिकेचा व्यापार तणाव वाढू शकतो. या यादीत तैवान, जपान, थायलंड, मलेशिया, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बांगलादेश, स्वित्झर्लंड आणि नॉर्वे यांचाही समावेश आहे. मात्र अमेरिकेचा दुसरा सर्वात मोठा भागीदार कॅनडाला यातून वगळण्यात आले आहे.

काय आहे नेमकं कारण?

अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीन यांनी म्हटले आहे की, अमेरिकन नोकऱ्यांचे रक्षण करण्याची गरज आहे. यामुळे व्यापारी भागीदांसोबत निष्पक्ष व्यापार सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. समस्येच निराकरण करण्यासाठी शुल्क लागू करावे लागले तर ट्रम्प प्रशासन मागे हटणार नाही असे ग्रीर यांनी म्हटले आहे.

चीनशी बैठक

हा निर्णय अशी वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या  एप्रिलमध्ये बीजिंगमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. सध्या याची तयारी सुरु आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक व्यापारात तणाव निर्माण होण्याची शक्यात आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्वेतील संकटावर भारत मैदानात; २४ तासांत जयशंकर यांची अनेक देशांशी थेट चर्चा, जगात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने कोणत्या देशांविरोधात व्यापार चौकशी सुरु केली आहे?

    Ans: ट्रम्प सरकार भारतासह, चीन, युरोपियन युनियन, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, आणि व्हिएतनाम या प्रमुख देशांविरोधात व्यापार चौकशी सुरु केली आहे. तसेच यामध्ये तैवान, जपान, थायलंड, मलेशिया, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बांगलादेश, स्वित्झर्लंड आणि नॉर्वे या देशांचाही समावेश आहे,

  • Que: अमेरिकेने १६ देशांविरोधात व्यापार तपासणी का सुरु केली आहे?

    Ans: ट्रम्प सरकारच्या मते, काही देशांची व्यापार धोरणे अन्यायकारक आहेत. अनेक राष्ट्रांमध्ये त्यांच्या औद्योगिक क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात उत्पादन होत आहे. या वस्तू अमेरिकेत स्वस्त दराता विकल्या जात आहे. यामुळे ही चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Web Title: Trump tariff war warning unfair trade probe india other countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Tariff
  • Trade War
  • World news

संबंधित बातम्या

Trump Iran Talks : पाकिस्तान तोंडावर आपटला! आता ट्रम्प स्वत: थेट शांतता चर्चा करणार; इराणनेही फिरवली पाठ
1

Trump Iran Talks : पाकिस्तान तोंडावर आपटला! आता ट्रम्प स्वत: थेट शांतता चर्चा करणार; इराणनेही फिरवली पाठ

World Order: SAARCप्रमाणे BRICSही संपेल? इराणचा हट्ट अन् पाकिस्तानची घुसखोरी; PM मोदींसमोर ‘हे’ सर्वात मोठे राजनैतिक संकट
2

World Order: SAARCप्रमाणे BRICSही संपेल? इराणचा हट्ट अन् पाकिस्तानची घुसखोरी; PM मोदींसमोर ‘हे’ सर्वात मोठे राजनैतिक संकट

US Iran War : आखाती देशांत शांततेचे वारे! इराणचा पाकिस्तानमार्फत अमेरिकेला ‘गुप्त’ प्रस्ताव; वाचा अटी आणि शर्तींचा पेच काय?
3

US Iran War : आखाती देशांत शांततेचे वारे! इराणचा पाकिस्तानमार्फत अमेरिकेला ‘गुप्त’ प्रस्ताव; वाचा अटी आणि शर्तींचा पेच काय?

WHCD Shooting : ‘मी रेपिस्ट नाही’ लाइव्ह टीव्हीवर भडकले डोनाल्ड ट्रम्प; हल्लेखोराच्या पत्रातील घाणेरड्या आरोपांना दिलं उत्तर
4

WHCD Shooting : ‘मी रेपिस्ट नाही’ लाइव्ह टीव्हीवर भडकले डोनाल्ड ट्रम्प; हल्लेखोराच्या पत्रातील घाणेरड्या आरोपांना दिलं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.