Why Donald Trump excluded Russia from the tariffs
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राद्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर टॅरिफ बॉम्ब फोडला. त्यांनी 180 देशांवर भारी शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अमेरिकेचे अनेक मित्र देशांचा देखील समावेस आहे. भारताचे अमेरिकेसोबत चांगले संबंध असूनही 26% कर लादण्यात आहे. तसेच चीनवर 34% कर लादला आहे. तसेच त्यांनी मित्र देश इस्रायलवरही 17% कर लादला आहे. डोनाल्ड टम्प यांनी म्हटले आहे की, त्यांनी दयाळूपणा दाखवत, देशांवर त्यांच्या कराच्या निम्म्या टक्के कर लादला आहे. ट्रम्प यांनी याला सवलतीचा परस्पर कर म्हणून संबोधले आहे.
पण धक्कादायक बाब म्हणजे टॅरिफच्या या यादीतून रशियाला आणि उत्तर कोरियाला वगळण्यात आले आहे. यामुळे या मित्र देशांना दणका आणि शत्रू देशांना सवलत का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाचा या यादीत समावेश करण्यात आला नाही कारण, रशियावर युद्धामुळे आधीच अनेक निर्बंध आहेत. शिवाय सध्या डोनाल्ड ट्रम्प रशियाला मित्र बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिका आणि रशियामधील व्यापारात मोठा तणाव आहे. मात्र याउलट युद्धग्रस्त युक्रेनवर अमेरिकेने 10% कर लादला आहे. ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणानुसार सोव्हिएत देशांनाही शुल्काचा सामान करावा लागत आहे. मात्र रशियाला दिलेल्या सवलतीमुळे अनेक तज्ज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
रशियावर अनेक पाश्चात्य देशांना कठोर निर्बंध लादले आहेत. गेल्या काही काळापासून रशिया हे निर्बंध मागे घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुले त्यांच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. 2022 पासून अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियावर कठोर निर्बंध लादले होते. यामध्ये उर्जा, बॅंकिंग, संरक्ष आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा समावेश आहे. दरम्यान ट्रम्रप यांनी रशियावर कर लादल्यास पूर्णपणे कंगाल होण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर अनेकांनी रशियाविरोधात कठोर निर्बंधाची मागणी केली आहे.
ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका 500% पर्यंत कर लादेल असे काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी जाहीर केले होते. याव्यतिरिक्त, रशियाला आर्थिक मदत थांबवण्यासाठी दुय्यम शुल्क लादण्यात येईल असेही म्हटले होते. ट्रम्प यांच्या या नवीन धोरणामुले रशियासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि युक्रेन युद्ध संपवण्यास पुतिन यांना भाग पाडले जाऊ शकते असे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे.
रशियाशिवाय अमेरिकेने उत्तर कोरियावरही कोणताही टॅरिफ लादलले नाही. उत्तर कोरिया अमेरिकेचा मोठा शत्रू असून तैवानच्या मुद्दयावरकुन दोन्ही देशांत सतत वाद होत असतो. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्र धोरणांनुसार हा निर्णय घेतला असल्याचे व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सहयोगी देश, जपान, दक्षिण कोरिया, भारतावर प्रचंड टॅरिफ लादले आहे.