'बंगालच्या उपसागरात सर्वात लांब किनारपट्टी भारताची...', एस. जयशंकर यांनी बांगलादेशला दाखवला आरसा (Hफोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर थायलंडची राजधानी बॅंकॉकमध्ये बिमस्टेक परिषदेत सहभागी झाले आहेत. या परिषदेदरम्यान बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी भारताच्या पूर्वोत्तर भागाला चिकन नेक वर अबलंबून असल्याचे म्हटले. तसेच बंगालच्या उपसागराचा बांगलादेश एकमेव संरक्षक असल्याचा दावा ही त्यांनी केला होता. यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंयक यांनी युनूस यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या सामर्थ्याचे आणि भौगोलिकतेचे स्पष्टीकरण देत एस जयशंकर यांनी युनूस यांना खडे बोल सुनावले.
तसेच जयशंकर यांनी हेही स्पष्ट केले की, भारत बिमस्टेक च्या जबाबदाऱ्यांबाबत पूर्णत: जागरुक आहे. भारताची बांगालच्या उपसागरात सर्वात लांब किनारपट्टी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय भारताचा पूर्वोत्तर भाग रेल्वे, रस्ते, जलमार्ग, उर्जा ग्रीड आणि पाइपलाइन नेटवर्कद्वारे BIMSTEC साठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या भाग एक महत्वाचे केंद्र बनत आहे. तर त्रिपक्षीय भाग पूर्ण झाल्यानंतर भाताच्या पूर्वोत्तर भागासी प्रशांत महासागर जोडला जाईल. हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असेल.
अलीकडचे मोहम्मद यूनूस यांनी चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान युनूस यांनी भारताच्या पूर्वोत्तर राज्यांबाबत खबळजनक विधान केले. युनूस यांनी म्हटले की, भारताच्या या पूर्वोत्तर भागाला लॅंडलॉक्ड क्षेत्र म्हणून संबोधले. त्यांनी दावा केला की, भारताच्या पूर्वोत्तर भागाला समुद्रातपर्यंत पोहोचण्यासाठी बांगलादेशच एकमेव मार्ग आहे. यामुळे त्यांनी चीनला या भागात मोठी गुंतवणूकचे करण्याची संधी असल्याचे सुचवले.
त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. भारतातून विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान एस जयशंकर यांनी त्यांच्या या विधानावर त्यांना आरसा दाखवत स्पष्ट केले की, भारत केवळ स्वत:साठीच नाही तर संपूर्ण BIMSTEC प्रांतासाठी स्थिरता आणि सहकार्यावर भर देते. भारताने या संघटनेच्या विकासासाठी गेल्या दशकभरात अनेक प्रयत्न केले आहेत. तसेच भारत भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि महत्वाचा आहे.
चिकन नेक याला सिलीगुडी कॉरिडोरही म्हटले जाते. हा भाग 20-22 किमी रुंद आणि 60 किमी लांब आहे. हा मार्ग भारताच्या मुक्य भूमाला पूर्वोत्तर राज्यांशी जोडतो. धोरमात्मक दृष्टीने हा प्रदेश अत्यंत महत्वाचा असून नेपाळ, भूतान, बांगलादेश आण चीन या देशांनी वेढलेला आहे. यटामुळे भारतासाठी हा मार्ग जीवनवाहिनी आहे. भारताचा पूर्वोत्तर भाग केवळ बांगलादेशवर अवलंबून नसून स्वत:च्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांद्वारे अधिक सक्षम आहे.