Donald Trump Tariff On India: 'पंतप्रधान मोदी चांगले मित्र आहेत पण...'; डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादला 26% कर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिग्टंन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (02 एप्रिल) व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये अमेरिकेचा मुक्ती दिवस (Liberation Day) घोषित केला. यासह त्यांना भारत आणि इतर अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात रेसिप्रोकल टॅक्स लावण्याची घोषणा केली. या नव्या धोरणांनुसार, भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर ट्रम्प यांनी 26% दराने कर लादण्याची घोषणा केली आहे. भारतासह, चीन, जपान आणि युरोपियन युनियनसारख्या अनेक देशांवर अमेरिकेने मोठा कर लादला आहे. सध्या ट्रम्प यांच्या या नवीन धोरणामुळे जागतिक व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांनी भारतावर कर लादताना म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत, पण भारत व्यापारात आम्हाला योग्य वागणूक देत नाहीत. त्यांनी म्हटले की, भारत अमेरिकेवर 52% पर्यंत कर लादतो, म्हणून प्रत्युत्तरा अमेरिका भारतावर 26% कर लादणार आहे.” तसेच त्यांनी असेही म्हटले की, इतर देश आमच्याकडून जेवढे शुल्क आकारतात जवळपास त्याचा निम्म्याटक्यापर्यंत कर आम्ही लादत आहोत. यामुळे दर पुर्णपणे परस्परसंवादी नसतील, पण अनेक देशांसाठी कठीण होईल.”
US President Donald Trump imposes 26% “reciprocal tariffs” on India, followed by 34% on China, 20% on EU, and 24% on Japan pic.twitter.com/0uhLSCKSOV
— ANI (@ANI) April 2, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणानुसार अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्यात आला आहे. कंबोडियावर 49% कर लादण्यात आला असून इतर देशांच्या तुलनेत हा अधिक आहे. भारतावर 26%, तर चीनवर 34% कर अमेरिकेने लादला आहे. युरोपियन युनियन देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी 20% परस्पर कराची घोषणा केली आहे, तर जपानवर 24 टक्के कर तर तैवानवर 22% कर लादला आहे. तसेच इस्त्रायलवर 17 टक्के कर लादण्यात आला आहे. ट्रम्प यांनी कोलंबिया, तुर्की, ऑस्ट्रेलिया, चिले, ब्राझील, सिंगापूर आणि ब्रिटन वर केवळ 10% टक्के कर लादण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापर अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यापर करणे अत्यंत महागांत पडेल. परिणामी अमेरिकन ग्राहकांना भारतीय वस्तू महाग मिळतील तसेच काही अमेरिकन कंपन्यांच्या उत्पादन खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतासह अनेक देशांच्या व्यापारवर मोठा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या या निर्णयाच्या प्रत्युत्तरात इतर देशही अमेरिकेन उत्पादनांवरील कर वाढवू शकतात. यामुळे जागतिक व्यापरयुद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, टॅरिफ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुरळित करेल, परंतु अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यामुळे जागतिक व्यापार संबंध कमकुवत होण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेला आर्थिक नुकसानीचा देखील सामाना करावा लागू शकतो.