
US Visa Rules
या निवेदनानुसार, आता फॅक्ट-चेकिंग, कंटेंट मॉडरेशन, ट्रस्ट अँड सेफ्टी, ऑनलाइन सेफ्टी किंवा कंप्लायन्स क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला असून याचा सर्वाधिक परिणाम भारतीय व्हिसा धारकांवर होण्याची शक्यता आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने एक मेमो जारी केला आहे. या मेमोनुसार, हे निर्देश देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा सर्वाधिक परिणाम टेक क्षेत्रातील कंपन्या आणि कर्मचाऱ्यांवर मुख्यत: भारतीय अर्जधारकांवर होणार आहे.
नवी मार्गदर्शक सुचनांनुसार, अमेरिकन व्हिसा धारकांची आता, व्यावसायिक पार्श्वभूमी, लिंक्डइन प्रोफाइल आणि सोशल मीडियावरील एक्टिव्हिटी, डिजिटल प्रोफाइल तपासली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीचे काम अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने कंवा सेन्सॉरशिप बंधनाशी निगडीत असेल तर त्याचा व्हिसा नाकराल जाणार आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक फटका एच-1बी व्हिसावर टेक इंजिनियर, डेटा अनालिस्ट, ऑनलाइन मॉनिटरिंग करणाऱ्या लोकांना बसण्याची शक्यता आहे. पत्रकार, पर्यटक, किंवा नोकरी शोधणाऱ्या सर्व श्रेणीतील व्हिसा धारकांना हा नियम लागू होणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम भारतीयांवर होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेत टेक क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या लक्षणीयरित्या अधिक आहे.
तज्ज्ञांच्या मते, या नव्या व्हिसा नियमांचा परिणाम ऑनलाइन सायबरबुलिंग रोखण्यासाठी, लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी होणार आहे. यामुळे देशातील अनेक भागात हा कायदा लागू करण्यात येणार आहे. यामुळे या नव्या व्हिसा नियमांमुळे अमेरिकेत टेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळणे आता अधिक कठीण होणार आहेत.
ट्रम्प प्रशासनाने निर्णायाचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, हा नियम अमेरिकन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी घेण्यात आला आहे.सरकार सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या होणाऱ्या छळाला सहन करणार नाही, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. पण या व्हिसा नियमांमुळे अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांवर याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे.
ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीचा भारताला फायदा? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स
Ans: अमेरिकेच्या नव्या व्हिसा नियमांनुसार, अमेरिकन व्हिसा धारकांचे आता व्यावसायिक पार्श्वभूमी, लिंक्डइन प्रोफाइल आणि सोशल मीडियावरील एक्टिव्हिटी, डिजिटल प्रोफाइलची तपासणी केली जाणार आहे.
Ans: अमेरिकेच्या नव्या व्हिसा नियमांनुसार, फॅक्ट-चेकिंग, कंटेंट मॉडरेशन, ट्रस्ट अँड सेफ्टी, ऑनलाइन सेफ्टी किंवा कंप्लायन्स क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना आता प्रवेशात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
Ans: या नव्या व्हिसा नियमांचा परिणाम ऑनलाइन सायबरबुलिंग रोखण्यासाठी, लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्याचा अमेरिकेचा हेतू आहे.
Ans: ट्रम्प प्रशासनाने नवे व्हिसा नियम अमेरिकन नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्याच्या संरक्षणासाठी लागू केला आहे.