Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Oil: पुन्हा एकदा चीनसाठी अमेरिकेची आक्रमक भूमिका; व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे ‘कब्जा’ करून किमती 30% ने वाढवल्या

China Venezuela Oil Deal : ट्रम्प प्रशासनाने चीनला व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे, परंतु एका अटीवर: मादुरोच्या हकालपट्टीनंतर अमेरिका आता व्हेनेझुएलाच्या तेल निर्यातीवर नियंत्रण ठेवेल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 23, 2026 | 02:56 PM
trump us control venezuela oil china deal fair market price 2026

trump us control venezuela oil china deal fair market price 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • तेलावर अमेरिकेची पकड
  • चीनसाठी ‘नो डिस्काउंट’ पॉलिसी
  • अमेरिकेला प्राधान्य

Trump Venezuela oil control China deal 2026 : दक्षिण अमेरिकेतील ‘सोन्याची खाण’ मानल्या जाणाऱ्या व्हेनेझुएलामध्ये (Venezuela) ३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर आता जागतिक तेल बाजारात भूकंप आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ‘ऑपरेशन अ‍ॅब्सोल्युट रिझॉल्व्ह’ (Operation Absolute Resolve) अंतर्गत निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर, अमेरिकेने या देशाच्या ३०३ अब्ज बॅरल तेल साठ्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. याचा सर्वात मोठा फटका चीनला (China) बसला असून, ड्रॅगनच्या स्वस्त तेल खरेदीच्या स्वप्नांना अमेरिकेने चूड लावली आहे.

मादुरो-चीनमधील ‘भ्रष्ट’ युतीचा अंत

निकोलस मादुरो यांच्या राजवटीत व्हेनेझुएलाने चीनकडून घेतलेले अब्जावधी डॉलर्सचे कर्ज फेडण्यासाठी आपले तेल अत्यंत कमी किमतीत विकले होते. याला “तेलासाठी कर्ज” (Debt-for-oil) असे म्हटले जात असे. अमेरिकेच्या ऊर्जा मंत्रालयानुसार, मादुरोच्या काळात चीनला हे तेल केवळ $३१ प्रति बॅरल या दराने मिळत होते. मात्र, ट्रम्प प्रशासनाने हे सर्व जुने करार मोडीत काढले आहेत. आता चीनला तेल हवे असेल, तर त्यांना जगातील इतर देशांप्रमाणेच $४५ ते $६० प्रति बॅरल या ‘वाजवी बाजारभावाने’ खरेदी करावी लागेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Bangladesh Rift: ‘आधी स्वतःच्या अल्पसंख्याकांकडे पाहा!’ बांगलादेशचा भारताला जहरी सल्ला; हिंदूंच्या हत्येवर झटकले हात

अमेरिकेचे कडक निर्बंध आणि चीनची कोंडी

ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनी स्पष्ट केले आहे की, व्हेनेझुएलाच्या तेलाचा ताबा आता अमेरिकन लष्कर आणि सरकारी यंत्रणेकडे आहे. “आम्ही व्हेनेझुएलाच्या तेलाचे मार्केटिंग करू आणि त्यातून मिळणारा नफा तिथल्या जनतेच्या हितासाठी वापरू,” असे राईट यांनी म्हटले आहे. चीन सध्या व्हेनेझुएलाच्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे (सुमारे ८०% निर्यात), पण फेब्रुवारी २०२६ पासून ही परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. अमेरिकेने कडक टँकर तपासणी आणि लोडिंग मर्यादा लागू केल्यामुळे चीनला होणारा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

JUST IN: President Trump allows China to buy Venezuelan oil at a higher price than before — Reuters pic.twitter.com/1En65o3Wj3 — Rapid Report (@RapidReport2025) January 22, 2026

credit – social media and Twitter

भारतासाठी काय आहे संधी?

व्हेनेझुएलातील या घडामोडींचा भारतावरही परिणाम होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रिज (Reliance) आणि ओएनजीसी (ONGC) सारख्या भारतीय कंपन्यांनी आधीच या बदलांवर लक्ष ठेवले आहे. जर अमेरिकेने ‘मित्र देशांना’ सवलत दिली, तर भारताला रशियावरील अवलंबित्व कमी करून व्हेनेझुएलाकडून स्वस्त दरात ‘हेवी क्रूड’ (Heavy Crude) मिळण्याची आशा आहे. मात्र, सध्या तरी ट्रम्प प्रशासन हे तेल प्रामुख्याने अमेरिकेच्या स्वतःच्या गरजांसाठी (Gulf Coast Refineries) वापरण्याला प्राधान्य देत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : स्पायडर-मॅन बॅकपॅक अन् पोलीस कोठडी! 5 वर्षांच्या ‘Liam Ramos’च्या अटकेने अमेरिका उद्रेकाच्या उंबरठ्यावर; पाहा नेमकं काय घडलं?

भविष्यातील रणनीती: अमेरिकेची ‘एनर्जी डोमिनन्स’

डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य उद्दिष्ट अमेरिकेला जगातील सर्वात मोठी ऊर्जा शक्ती बनवणे हे आहे. व्हेनेझुएलावर ताबा मिळवून त्यांनी केवळ रशिया आणि चीनच्या वर्चस्वाला लगाम घातला नाही, तर ओपेक (OPEC) देशांच्या दादागिरीलाही आव्हान दिले आहे. “आम्ही आता ऑईल बिझनेसमध्ये आहोत,” या ट्रम्प यांच्या विधानाने हे स्पष्ट होते की, आगामी काळात जागतिक तेलाच्या किमती आणि पुरवठा साखळी व्हाईट हाऊसच्या इशाऱ्यावर चालणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने चीनला व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करण्यापासून रोखले आहे का?

    Ans: नाही, अमेरिकेने परवानगी दिली आहे, पण आता चीनला 'डिस्काउंट' मिळणार नाही; त्यांना पूर्ण बाजारभावाने (Market Price) खरेदी करावी लागेल.

  • Que: मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाच्या तेलाचे काय झाले?

    Ans: अमेरिकन लष्कराने आणि ऊर्जा विभागाने सर्व तेल क्षेत्रांचा ताबा घेतला असून, आता सर्व विक्री अमेरिकेच्या नियंत्रणाखाली होत आहे.

  • Que: या निर्णयामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढतील का?

    Ans: सुरुवातीला पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे किमती वाढण्याची शक्यता आहे, मात्र दीर्घकाळात व्हेनेझुएलाचे उत्पादन वाढल्यास किमती स्थिर होऊ शकतात.

Web Title: Trump us control venezuela oil china deal fair market price 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Nicholas Maduro
  • Xi Jinping China

संबंधित बातम्या

स्पायडर-मॅन बॅकपॅक अन् पोलीस कोठडी! 5 वर्षांच्या ‘Liam Ramos’च्या अटकेने अमेरिका उद्रेकाच्या उंबरठ्यावर; पाहा नेमकं काय घडलं?
1

स्पायडर-मॅन बॅकपॅक अन् पोलीस कोठडी! 5 वर्षांच्या ‘Liam Ramos’च्या अटकेने अमेरिका उद्रेकाच्या उंबरठ्यावर; पाहा नेमकं काय घडलं?

VIRAL VIDEO : शांतीदूत की युद्धदूत? नोबेल विजेत्या मचाडो यांनी ट्रम्पना भेटून मागितले ‘बॉम्ब’; क्युबा-निकाराग्वा निशाण्यावर
2

VIRAL VIDEO : शांतीदूत की युद्धदूत? नोबेल विजेत्या मचाडो यांनी ट्रम्पना भेटून मागितले ‘बॉम्ब’; क्युबा-निकाराग्वा निशाण्यावर

TikTok Is Backed: अमेरिकेत या सोशल मीडिया अ‍ॅपची पुन्हा एंट्री! या व्यक्तीच्या हाती दिली सिईओ पदाची कमान, काय आहे कंपनीचा प्लॅन?
3

TikTok Is Backed: अमेरिकेत या सोशल मीडिया अ‍ॅपची पुन्हा एंट्री! या व्यक्तीच्या हाती दिली सिईओ पदाची कमान, काय आहे कंपनीचा प्लॅन?

Canada-US: ‘आम्ही तुमच्या तुकड्यावर…’ पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांना दाखवला आरसा; शेजारी देशांमध्ये युद्ध तणाव वाढला
4

Canada-US: ‘आम्ही तुमच्या तुकड्यावर…’ पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांना दाखवला आरसा; शेजारी देशांमध्ये युद्ध तणाव वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.