India-Bangladesh Rift: 'आधी स्वतःच्या अल्पसंख्याकांकडे पाहा!' बांगलादेशचा भारताला जहरी सल्ला; हिंदूंच्या हत्येवर झटकले हात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Touhid Hossain BBC interview India Bangladesh : भारत (India) आणि बांगलादेश ( Bangladesh) या शेजारील देशांमधील संबंध सध्या अत्यंत नाजूक वळणावर आहेत. बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे परराष्ट्र सल्लागार तौहिद हुसेन यांनी नुकत्याच दिलेल्या एका खळबळजनक मुलाखतीत भारतावर थेट टीका केली आहे. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत भारताने व्यक्त केलेली चिंता त्यांनी केवळ फेटाळली नाही, तर “भारताने आपल्या स्वतःच्या अल्पसंख्याकांची काळजी घ्यावी,” असा टोलाही लगावला आहे. त्यांच्या या विधानामुळे दक्षिण आशियातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत तौहिद हुसेन यांनी दावा केला की, बांगलादेशात हिंदू किंवा भारतीय नागरिकांवर अत्याचार होत असल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही. ते म्हणाले, “आम्ही भारतीयांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलो आहोत, हे सिद्ध करता येणार नाही. तरीही भारताने आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना माघारी बोलावले, हा दिल्लीचा निर्णय आम्हाला आवडलेला नाही.” भारताने अलीकडेच ढाका, चटगाव आणि इतर उप-दूतावासांना ‘नॉन-फॅमिली पोस्टिंग’ घोषित करून अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना भारतात परत पाठवले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : शांतीदूत की युद्धदूत? नोबेल विजेत्या मचाडो यांनी ट्रम्पना भेटून मागितले ‘बॉम्ब’; क्युबा-निकाराग्वा निशाण्यावर
जेव्हा त्यांना बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हिंसक हल्ल्यांबाबत विचारण्यात आले, तेव्हा तौहिद हुसेन यांनी बचावात्मक पवित्रा घेत भारतालाच आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “आम्ही भारतात अल्पसंख्याकांवर (मुस्लिम) काय कारवाई होते, यावर भाष्य करत नाही. त्यामुळे भारतानेही आमच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करू नये. जर आमच्या नागरिकांवर काही अन्याय झाला, तर आमच्याकडे त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. भारताने स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांची काळजी घेतली तर ते दोन्ही देशांच्या संबंधांसाठी चांगले होईल.”
Foreign Adviser Touhid Hossain has said there is no proof that the Bangladesh government has failed to ensure security for Indian nationals.#Bangladesh https://t.co/fRVHBIDhVU — The Daily Star (@dailystarnews) January 22, 2026
credit – social media and Twitter
या मुलाखतीतील सर्वात धक्कादायक भाग म्हणजे बांगलादेशची पाकिस्तानशी वाढती जवळीक. शेख हसीना यांच्या कार्यकाळात पाकिस्तानशी असलेले संबंध मुद्दाम बिघडवले गेले होते, असा आरोप हुसेन यांनी केला. ते म्हणाले, “आम्हाला पाकिस्तानशी सामान्य संबंध हवे आहेत. इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानही आमचा शेजारी आहे आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात काहीही गैर नाही.” १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगलादेशात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी सुधारत असलेले हे संबंध भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Canada-US: ‘आम्ही तुमच्या तुकड्यावर…’ पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांना दाखवला आरसा; शेजारी देशांमध्ये युद्ध तणाव वाढला
भारतात आश्रयाला असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबद्दल बोलताना हुसेन म्हणाले की, हसीना यांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर विधाने करणे थांबवावे अशी आमची अपेक्षा होती, पण तसे घडले नाही. सध्याचे संबंध इतिहासातील सर्वात खालच्या स्तरावर आहेत का? या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही, पण दोन्ही देशांनी संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे मान्य केले.
Ans: तौहिद हुसेन यांनी भारताला बांगलादेशातील हिंदूंवर भाष्य करण्याऐवजी भारतातील अल्पसंख्याकांच्या स्थितीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
Ans: बांगलादेशातील वाढती कट्टरता आणि १२ फेब्रुवारीच्या निवडणुकांआधी बिघडलेली सुरक्षा व्यवस्था पाहता भारताने सावधगिरी म्हणून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना माघारी बोलावले आहे.
Ans: अंतरिम सरकारनुसार, मागील राजवटीतील जुने वैर संपवून पाकिस्तानशी 'सामान्य' शेजारी म्हणून संबंध प्रस्थापित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.






