फोटो सौजन्य AI
पण अशा प्रकारे समाज माध्यमांवर बंदी घालणे हे अमेरिकेसाठी देखील योग्य नाही . यामुळे जगभरात लोकशाहीवर बोलायला अमेरिकेचा नैतिक अधिकार कमी होऊ शकतो . किंवा अमेरिकेच्या लोकशाहीवादी वक्तव्यांवर चेष्टा होऊ शकते . असे बोलले जात आहे .
१८ सप्टेंबरला ट्रम्प यांनी CNN ,MSNOW आणि POLITICO या समाज माध्यमांवर व्हाईट हाऊस प्रवेशास बंदी घातली . तसे त्यांचे व्हाईट हाऊस मधील प्रवेशाचे पासेस रद्द केले . त्यांचा प्रवेश नाकारला . कारण ट्रम्प यांच्या मते हे तिन्ही समाज माध्यमे ट्रम्प यांच्या विरोधात खोटी माहिती , खोट्या बातम्या पसरवीत आहेत .
आणि ट्रम्प यांच्या विरोधात काम करत आहेत . याआधीही ट्रम्प यांचे पत्रकारांचे टोकदार संभाषण आपण पाहिलेले आहे . ट्रम्प यांना त्यांच्या सोयीचे प्रश्नच आवडत असल्याचे बोलले जात आहे . किंवा काही समाज माध्यमे ही ट्रम्प यांची आवडती असल्याचे देखील बोलले जाते .
world News: आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
बंदी केलेल्या संस्थांचे मत असे आहे कि , सरकारला एखाद्या माध्यमाच्या रिपोर्टींगशी असहमती असल्यामुळे त्याचा पत्रकाराचा प्रवेश रद्द करता येऊ नये . त्यांच्या निवेदनानुसार या कारवाईमुळे प्रेसच्या स्वातंत्र्यावर आणि सरकारवर स्वतंत्रपणे नजर ठेवण्याच्या माध्यमांच्या भूमिकेवर परिणाम होऊ शकतो .
त्यांनी याच आधारावर First Amendment अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे . त्यामुळे हा वाद आता वाढला असून ट्रम्प विरुद्ध मीडिया असा झाला आहे . यावर न्यायालय काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरेल .
खटला Washington D.C. येथील U.S.District Court मध्ये दाखल करण्यात आला असून , माध्यमांनी व्हाईट हाऊसचा प्रवेश तातडीने पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे . या प्रकरणावर लवकरच आपत्कालीन सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे म्हंटले जात आहे .
याआधीही AP आणि CNN पत्रकार Jim Acosta यांच्या व्हाईट हाऊस प्रवेशावरून ट्रम्प प्रशासनाशी न्यायालयीन संघर्ष झाला होता . त्यामुळे सध्याचा खटला अमेरिकेत सरकार पत्रकारितेच्या स्वातंत्र्याच्या मर्यादांबाबत महत्वाचा कायदेशीर वाद ठरू शकतो .






