
Thailand Cambodia Ceasefire
‘मी एका कॉलवर युद्ध थांबवेन…’ ; Thailand Cambodia संघर्षावर ट्रम्पचा मोठा दावा
यापूर्वी ट्रम्प यांनी मलेशियात (Malaysia) आसियान शिखर परिषदेत थायलंड आणि कंबोडियात शांतता करार घडवनू आणला होता. जुलै २०२५ मध्ये दोन्ही देशांत तीव्र संघर्ष सुरु झाला होता. दोन्ही देश सीमेवर आमने-सामने आले होते. ट्रम्प यांनी बिघडती परिस्थिती पाहता दोन्ही देशांना व्यापार शुल्क वाढवण्याची धमकी दिली, ज्यामुळे दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती केल्याचे म्हटले होते. पंरतु काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांत पुन्हा सीमावादाला तोंड फुटले आणि गोळीबार सुरु झाला.
आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशात युद्धबंदी केल्याचा दावा केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट करत म्हटले आहे की, मी थायलंडचे पंतप्रधान अनुतिनन चार्नविराकुल यांच्याशी आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दोन्ही देश गोळीबार थांबवण्यास तयार आहे. दोन्ही देशांनी मलेशियात झालेल्या करारवर पुन्हा सहमती दर्शवली आहे. ट्रम्प यांनी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी दोन्ही देशांत युद्धबंदी घडवल्याचा दावा केला.
मात्र त्यांच्या या दाव्यानंतरही दोन्ही देशात सीमेवर तणावाचा परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी दोन्ही देशांत हल्ले सुरुच आहे. थाई सैनिकांनी लढाऊ विमानांनी हल्ला केला आहे. तसेच बॉम्बफेकही सुरु असल्याची माहिती कंबोडियाच्या मंत्रालयाने दिली आहे. तर यावर थायलंडच्या लष्कराने कंबोडिया नागरी ठिकाणांना लक्ष्य करत असल्याचे म्हटले आहे. कंबोडियाने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप थायलंडने केला आहे.
हा वाद थायलंड आणि कंबोडियासाठी ऐतिहासिक वाद आहे. प्रेम विहार मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. १९६२ मध्ये या मंदिराला कंबोडियाचा भाग घोषित करण्यात आले होते. परंतु थायलंड या मंदिराचा काही भाग त्यांच्या भूभागात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवाद आणि धार्मिक वाद वाढत चालला आहे. २००८ मध्ये जागतिक वारसा यादीत यामंदिराचे नाव सामील झाल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. २००८ , २०११, २०१५ मध्ये यावादवरुन तीव्र संघर्ष झाला होता.
Thailand Cambodia संघर्षामुळे दशलक्ष लोक घरे सोडून पळाली ; सीमेवर दोन दिवसांपासून गोळीबार सुरुच
Ans: थायलंड आणि कंबोडियाच्या पंतप्रधानांशी चर्चा केली असून दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी आणि गोळीबार थांबवण्यास सहमती दर्शवल्याचा दावा ट्रम्प यांनी केली आहे.
Ans: ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही थायलंड आणि कंबोडियात सीमेवर गोळीबार सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ल्याचे आरोप करत आहे.
Ans: Ans: थायलंड आणि कंबोडिात प्रेम विहार मंदिरावरुन १९६२ पासून वाद सुरु आहे.