Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिटन हादरला! मँचेस्टरमध्ये यहूदी प्रार्थनास्थळाबाहेर लोकांवर हल्ला ; कारने धडक दिल्यानंतर चाकूने वार

ब्रिटनच्या मँँचेस्टरमध्ये यहूदी समुदायावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे यहूदी समुदायात घबराटीचे वातावरण आहे. लोकांनी ब्रिटनच्या सुरक्षा व्यवस्थाव व कायद्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 02, 2025 | 06:40 PM
Two Dead Four injured after car ramming, stabbing outside synagogue in Manchester

Two Dead Four injured after car ramming, stabbing outside synagogue in Manchester

Follow Us
Close
Follow Us:
  • ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये यहूदी प्रार्थनास्थळाबाहेर मोठा हल्ला
  • एका अज्ञात गाडीने लोकांना धडक दिली अन् चाकूनेही केला वार
  • यहूदी समाजात घबराटीचे वातावरण

Britain News in Marathi : लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये गुरुवारी (०२ सप्टेंबर) एका यहूही प्रार्थनास्थलाबाहेर लोकांवर हल्ला झाला आहे. एका अज्ञात वेगाने लोकांना कारने धडक दिली आहे, तसेच चाकूनेही वार करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मँचेस्टरच्या क्रॅम्पसॉल भागातील हीटन पार्क हिब्रू सभेबाहेरही घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जखमी झाले आहे. जखींच्या संख्या अद्याप अधिकृत करण्यात आलेली नाही.

हल्लेखराला घटनास्थळावरुन अटक

घटनेनंतर हल्लेखोराने कार घेऊव पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यावेळी पोलिसांनी त्याला पकडले आणि अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरु असून घटनेमागच्या कारणाचा तपास घेतला जात आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.३० च्या दरम्यान त्यांना घटनास्थळावरुन फोन आला होता. प्रत्यक्षदर्शनींने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने प्रार्थनास्थळाबाहेरील लोकांवर कार चढवली. नंतर कारमधून उतरून त्यांच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपाचारदरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोरालाही घटनास्थळावरुन पळून जाताना तातडीने अटक केली.

ट्रम्प यांना मोठा धक्का! हमासकडून प्रस्ताव मान्य होण्यापूर्वीच इस्रायलची कारवाई ; दक्षिण गाझा रिकामा करण्याचे पॅलेस्टिनींना आदेश

GMP declared PLATO and a major incident at 9.37am.
Shots were fired by Greater Manchester Police firearms officers at 9.38am. One man has been shot, believed to be the offender.
— Greater Manchester Police (@gmpolice) October 2, 2025

या घटनेनंतर ब्रिटनच्या मँचेस्टरमधील स्थानिक यहूदी समुदायाता घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त केला आहे. तसेच आरोपीची ओळख अद्यापर जाहीर करण्यात आलेले नाही. पण एका मुस्लिम व्यक्तीने हल्ला केला असल्याचे मानले जात आहे. सध्या ब्रिटनच्या सुरक्षा व्यवस्था आणि कायद्यावर प्रश्न विचारले जात आहे. पण पोलिसांनी नागरिकांना विश्वासात घेऊन अफवांपासून दूर राहण्याचे आणि कोणतीही संशायास्पद हालचाली दिसताच माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. ब्रिटनमध्ये कुठे झाला यहूदींवर हल्ला?

ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये यहूदी प्रार्थनास्थळबाहेर हल्ला झाला असून एका अज्ञात कार चालकाने लोकांना धडक दिली आहे. तसेच लोकांवर चाकूनेही वार करण्यात आला आहे.

प्रश्न २. ब्रिटनमधील मँचेस्टरच्या हल्ल्यात किती जीविताहानी झाली?

ब्रिटनच्या मँचेस्टमरमध्ये लोकांवर झालेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू, तर अनेक जखमी झाले आहेत.

प्रश्न ३. या घटनेनंतर ब्रिटनमध्ये काय परिस्थिती आहे?

ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे यहूदी समाजाच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पण धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रश्न ४. पोलिसांनी घटनेविरोधात कोणती कारवाई केली?

मँचेस्टरमध्ये घडलेल्या घटनेवर पोलिसांनी एक आरोपीला अटक केली आहे. सध्या हा हल्ला का करण्यात आला याची चौकशी सुरु आहे.

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

Web Title: Two dead four injured after car ramming stabbing outside synagogue in manchester

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • britain
  • World news

संबंधित बातम्या

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच
1

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत
2

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका
3

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

१० लाख नोकऱ्या अन् ९ लाखाची गुंतवणूक…; भारत आणि युरोपीय देशांमध्ये FTA करार लागू
4

१० लाख नोकऱ्या अन् ९ लाखाची गुंतवणूक…; भारत आणि युरोपीय देशांमध्ये FTA करार लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.