Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UK Politics: ब्रिटनमध्ये सर्वात मोठं राजकीय संकट! निवडणुकीत सत्तेचा पत्ता कट, ‘Epstein Files’च्या वादळात अडकले PM Keir Starmer

UK Crisis Keir Starmer Resign: ब्रिटनमध्ये मोठी राजकीय खळबळ माजली आहे. एपस्टाईन फाईल्सचा समावेश केल्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर पंतप्रधान कीर स्टारमर लवकरच पायउतार होऊ शकतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 17, 2026 | 01:50 PM
uk political crisis pm keir starmer resign rumours local election defeat epstein files 2026

uk political crisis pm keir starmer resign rumours local election defeat epstein files 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • कीर स्टारमर यांच्या राजीनाम्याची शक्यता
  • निवडणुकीत लेबर पार्टीचा दारूण पराभव
  • पीटर मँडेलसन यांचे नाव समोर

Keir Starmer Resign News UK 2026 : ब्रिटिश राजकारणात सध्या अभूतपूर्व उलथापालथ पाहायला मिळत आहे. सत्ताधारी लेबर पार्टी आणि पंतप्रधान कीर स्टारमर (Keir Starmer) यांच्या अडचणींमध्ये एकाच वेळी एवढी वाढ झाली आहे की, आता ब्रिटनमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या ‘एपस्टाईन फाईल्स’ (Epstein Files) मध्ये लेबर पार्टीच्या बड्या नेत्याचे नाव समोर आल्याने आणि नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाचा दारूण पराभव झाल्याने पंतप्रधान कीर स्टारमर लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. ब्रिटिश मीडिया सूत्रांनुसार, स्टारमर यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांकडे पद सोडण्याची तयारी दर्शवली असून, स्वतःच्या पक्षातील ८० हून अधिक खासदारांनी त्यांना पायउतार होण्यास सांगितले आहे.

सत्तेचा पाया हादरला! निवडणुकांमध्ये लेबर पार्टीचा सुपडा साफ

गुरुवारी ब्रिटनमधील १३६ प्रांतांमध्ये पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांचे निकाल लेबर पार्टीसाठी अत्यंत लाजीरवाणे ठरले आहेत. जनतेने सत्ताधारी पक्षाला पूर्णपणे नाकारल्याचे या निकालांवरून स्पष्ट दिसत आहे. लेबर पार्टीने आपल्या २,२०० हून अधिक कौन्सिल जागांपैकी तब्बल १,२०० जागा गमावल्या आहेत. याउलट, नायजेल फराज यांच्या नेतृत्वाखालील उजव्या विचारसरणीच्या ‘रिफॉर्म यूके’ (Reform UK) पक्षाने १,४२२ जागा जिंकून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. स्काय न्यूजच्या अहवालानुसार, रिफॉर्म यूके पहिल्या स्थानावर, लेबर पार्टी ९८० जागांसह दुसऱ्या स्थानावर, लिबरल डेमोक्रॅट्स ८३४ जागांसह तिसऱ्या तर कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष ७५४ जागांसह चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Putin In China : ‘आधी ट्रम्प, आता पुतिन!’ चीनच्या दारात जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांची रांग; काय आहे जिनपिंग यांचा गेम प्लॅन?

वेल्स आणि स्कॉटलंडमध्येही सत्तेला सुरुंग

हा पराभव केवळ इंग्लंडपुरता मर्यादित नसून वेल्स आणि स्कॉटलंडमध्येही लेबर पक्षाचा पराभव झाला आहे. वेल्समध्ये तब्बल २७ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर लेबर पक्षाला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर ‘प्लेड सायमरू’ हा पक्ष ४३ जागांसह सर्वात मोठा पक्ष बनला आहे. स्कॉटलंडमध्येही स्कॉटिश नॅशनल पार्टीने ५८ जागांसह आघाडी मिळवली आहे, तर लेबर पार्टीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या राजकीय पतनामुळे कीर स्टारमर यांच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Keir Starmer set to resign as UK Prime Minister this week after humiliat… https://t.co/v7kxCXCDRy via @YouTube — DivineAxiom (@DivineAxiom) May 12, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Guerrilla Warfare: ‘प्राण देऊ, पण झुकणार नाही!’ अमेरिकन CIA प्रमुखांच्या गुप्त भेटीनंतर ‘हा’ देश थेट युद्धभूमीसाठी सज्ज

‘एपस्टाईन फाईल्स’ आणि पीटर मँडेलसन यांचे कनेक्शन

निवडणुकीतील पराभवापेक्षाही ज्या गोष्टीने ब्रिटिश जनतेला आणि सरकारला हादरवले आहे, ते म्हणजे ‘एपस्टाईन फाईल्स’मधील खुलासे. लेबर पार्टीचे अत्यंत वजनदार नेते पीटर मँडेलसन यांचे नाव या वादग्रस्त फाईल्समध्ये समोर आल्याने स्टारमर सरकार बॅकफूटवर आले आहे. सुरुवातीला पंतप्रधान स्टारमर यांनी “मी देशाला अराजकतेत लोटणार नाही आणि राजीनामा देणार नाही” अशी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, आता त्यांच्याच मंत्रिमंडळातील ३ प्रमुख सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याने आणि जनतेचा अविश्वास वाढल्याने पंतप्रधानांचा राजीनामा हा केवळ वेळेचा प्रश्न उरला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Web Title: Uk political crisis pm keir starmer resign rumours local election defeat epstein files 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Great Britain
  • Keir Starmer
  • prime minister
  • World news

संबंधित बातम्या

Putin In China : ‘आधी ट्रम्प, आता पुतिन!’ चीनच्या दारात जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांची रांग; काय आहे जिनपिंग यांचा गेम प्लॅन?
1

Putin In China : ‘आधी ट्रम्प, आता पुतिन!’ चीनच्या दारात जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांची रांग; काय आहे जिनपिंग यांचा गेम प्लॅन?

India Netherlands Deals : सेमीकंडक्टर ते हरित उर्जा…, भारत-नेदरलँड्समध्ये १७ सामंजस्य करार; द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळणार
2

India Netherlands Deals : सेमीकंडक्टर ते हरित उर्जा…, भारत-नेदरलँड्समध्ये १७ सामंजस्य करार; द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळणार

Guerrilla Warfare: ‘प्राण देऊ, पण झुकणार नाही!’ अमेरिकन CIA प्रमुखांच्या गुप्त भेटीनंतर ‘हा’ देश थेट युद्धभूमीसाठी सज्ज
3

Guerrilla Warfare: ‘प्राण देऊ, पण झुकणार नाही!’ अमेरिकन CIA प्रमुखांच्या गुप्त भेटीनंतर ‘हा’ देश थेट युद्धभूमीसाठी सज्ज

Beit Shemesh : इस्रायलमध्ये रात्रीच्या अंधारात महाविस्फोट; आकाशात उसळले आगीचे लोट, ‘तोमर’ कारखान्यात नेमकं घडलं काय?
4

Beit Shemesh : इस्रायलमध्ये रात्रीच्या अंधारात महाविस्फोट; आकाशात उसळले आगीचे लोट, ‘तोमर’ कारखान्यात नेमकं घडलं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.