Russia-Ukraine War: युक्रेनचे रशियाच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर; रशियाचेही सातत्याने हल्ले सुरुच
कीव: युक्रनने रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांचे जोरदार प्तयुत्तर दिले आहे. युक्रनेने रशियाच्या दक्षिण भागामध्ये ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यामुळे नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असल्याची याशिवाय रशियाच्या इंधन डेपोला आग लागल्याची माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, युक्रेन सीमेजवळ असलेल्या बेल्गोरोडच्या रशियन प्रदेशाचे गव्हर्नर व्याचेस्लाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या निवासी भागांवर ड्रोन हल्ले करण्यात आले आले आहेत. तसेच जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इंधन डेपोला लक्ष्य
युक्रेनच्या जनरल स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने रशियाच्या ओरिओल भागातील मोठ्या इंधन डेपोला लक्ष्य करत ड्रोन हल्ले केले आहेत. तसेच या हल्ल्यानंतर इंधन डेपोमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते. ओरिओलचे गव्हर्नर आंद्रे क्लिचकोव्ह यांनी या घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे तेथील इंधन डेपोला आग लागली. काही वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी म्हटले.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
रशियाचा हल्ला
दोन दिवसांपूर्वीच रशियाने युक्रेनवर डझनभर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते. रशियाने 93 मिसाइल आणि 200 ड्रोनचा वापर या हल्ल्यांमध्ये केला होता. या हल्ल्यात युक्रेनच्या पॉवर ग्रीड आणि गॅस इन्फ्रास्ट्रक्चरला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमुळे युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात आंचरराष्ट्रीय समुदायाला कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
याशिवाय रशियाने गेल्या 24 तासांत आणखी काही हल्ले युक्रेनवर केले आहेत.युक्रेनच्या 13 शहरांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. दक्षिण युक्रेनपासून ते कीवपर्यंत असे भयंकर हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे नाटोचीही अस्वस्थता वाढली आहे. नाटोला सतर्क करण्यात आले आहे.
इतर अनेक देशांना आवाहन
राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेंस्की यांनी जगभरातील देशांना एकत्र येऊन रशियाच्या दहशतवादी कारवायांविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की रशिया आपल्या दहशतीच्या रणनीतीने लाखो लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय समुदाला आवाहन करतो की, व्लादिमिर पुतिन आपण यांच्या विरोधात एकजूट व्हावे, तरच हा दहशतवाद संपेल असे ते म्हणाले.