Ukraine drone attack on two Russian military bases; Ukrainian soldiers claim to have destroyed 40 bombers
मॉस्को: युक्रेनने रशियाच्या दोन लष्करी तळांवर हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाच्या ओलेन्या आणि बेलाया या लष्करी तळांवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. 40मिडिया रिपोर्टनुसार, हा हल्ला युक्रनेन सैन्याने केलेला सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे. रशियाचे हे दोन लष्करी तळ बॉम्ब हल्ला करण्यासाठी वापरले जात होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, या ड्रोन हल्ल्यात रशियाचे ४० बॉम्बर यूक्रेनियन सैनिकांनी नष्ट केल्याचा दवा केला आहे.
या बॉम्बरचा वार रशिया युक्रेनवर बॉम्बहल्ला करण्यासाठी करत होता. युक्रेनच्या म्हणणानुसार ही बॉम्ब विमाने युक्रेनवरुन वारंवार उड्डाण करत आणि बॉम्बफेक करत होती. युक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या (SBU) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनचे ड्रोन रशियाच्या हद्दीत घुसू शकले नाहीत. पण रशियाच्या Tu-95, Tu-22 आणि A-50 महागड्या आणि दुर्मिळ A-50 गुप्तचर विमानांसह मोठ्या बॉम्बर्सचे नुकसान करण्यात युक्रेन सैन्य यशस्वी झाले आहे.
युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला रशियातील इर्कुत्स्कच्या दुर्गम भागात बेलाया आणि ओलेन्या लष्करी तळांवर झाला. या हल्ल्यात ओलेन्या लष्करी तळाला भीषण आग लागल्याचेही वृत्त समोर आले आहे. परंतु अद्याप रशियाकडून यांची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
रशियासाठी महत्त्वपूर्ण विमाने
Tu-95 आणि Tu-22 ही लष्करी विमाने रशियाची महत्त्वाची आहेत. Tu-95 हे १९५० च्या दशकातील जुने विमान आहे. हे विमान दूरच्या शहरांना लक्ष्य करण्यात आणि विविध क्रझ क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षण आहे. या विमानात इंजिनऐवजी मोठे फिरणारे प्रोपेलर आहे. तर Tu-22 हे एक हाय स्पीड लष्करी विमान आहे. हे विमान सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. अमेरिका आणि युरोपमधील सर्वात प्रगत सुरक्षा प्रणाली शिवाय युक्रेनला हे विमान नष्ट करणे किंवा याचे हल्ले थांबवणे कठीण आहे. तसेच A-50 हे एक रशियाचे गुप्तचर विमान आहे.
युक्रेनच्या या हल्ल्यामुळे रशियाचे मोठे लष्करी नुकसान झालेले नाही. पण रशियाची तीन महत्त्वपूर्ण विमाने हल्ल्यात नष्ट झाल्याने रशियाला धक्का बसला आहे. मात्र सध्या युक्रेनच्या या हल्ल्यावर रशियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.