रशियात भीषण अपघात ; ब्रायन्स्कमध्ये पूल कोसळ्याने रेल्वे रुळावरुन घसरली, 7 जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: रशियात एक मोठी दुर्घटना घडली. रशियाच्या ब्रायन्स्क प्रदेशात रविवारी (1 जून) रोजी भीषण रेल्वे अपघात घडला. युक्रेन सीमेला लागून असलेल्या भागात हा पूल कोसळला. यामुळे किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 हून अधिक लोक जखमी झाले आहे. रशियन रेल्वे विऊभागाच्या म्हणण्यानुसार, यामध्ये युक्रेनचा हात आहे. युक्रेनने रेल्वे अपघाताचा कट रचला होता असे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. दरम्यान या घटनेने रशियात मोठी खळबळ उडाली आहे.
अपघातात लोको पायलटाचाही मृत्य झाल्याचे रशियन रेल्वेने म्हटले आहे. जखमी झालेल्यांपैकी एकाच प्रकृती गंभीर आहे. या घटनेचटी माहिती मिळताच बचाव पथक आणि आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या बचाव कार्य सुरु आहे. तसेच अपघाताच्या कारणाचाही शोध घेतला जात आहे.
रशियाच्या बाझा रशियन टेलिग्राम चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, हा पूल स्फोटकांच्या सहाय्याने उडवण्यात आला. परंतु याबाबत अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही. तसेच युक्रेनकडूनही अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर वायगोनिच्स्करी जिल्ह्यात हा अपघात झाला. ट्रेन क्लिमोव्होहून मॉस्कोला रवाना झाली होती.
गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. हे युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.तसेच दोन्ही देश सातत्याने एकमेकांवर हल्ला करत आहे. रशियाच्या म्हणण्यानुसार, युक्रेन गुप्त छापे, गोळीबार आणि ड्रोन हल्ले करत आहे. विशेष करुन युक्रेनकडून रशियाच्या सीमावर्ती प्रदेशांमध्ये हे हल्ले करण्यात येत आहेत. यादरम्यान हा अपघात घडला आहे. यामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली असून युक्रेनने अपघात घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनला शांतता चर्चेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. जागतिक स्थरतेसाठी युद्ध संपवणे आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
लवकरच दोन्ही देशांमध्ये तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा होईल.ही रशिया आणि युक्रेनमधील इस्तंबूल येथे दूसरी चर्चा असणार आहे. याचा प्रस्ताव रशियन अधिकाऱ्यांनी दिला. अद्याप युक्रेनने या चर्चेसाठी आपल्या उपस्थितीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रशियाच्या प्रस्तावांचा आढावा घेतल्यानंतर युक्रेन चर्चेत सहभागी होईल असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान अमेरिकन सिनेटरने रशियाला इशारा दिला आहे की, युद्ध सुरुच राहिले तर अमेरिका रशियावर नवीन निर्बंध लादेल यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.