Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ukraine Russia War: 100 अब्ज रुबलची राख! युक्रेनियन ड्रोन्सचा थरार; रशियाचे लॉजिस्टिक्स नेटवर्क उध्वस्त, 50 उड्डाणे विमान रद्द

Ukraine Drone Strikes Russia: युक्रेनने रशियाच्या एका लॉजिस्टिक्स केंद्रावर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. सेंट पीटर्सबर्ग आणि क्रिमियामधील आगींमुळे रशियाला अंदाजे १.२ अब्ज डॉलर्सचा आर्थिक फटका बसला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 24, 2026 | 02:54 PM
ukraine drone attack russia saint petersburg wildberries warehouse fire pulkovo airport

ukraine drone attack russia saint petersburg wildberries warehouse fire pulkovo airport

Follow Us
Follow Us:
  • लॉजिस्टिक्स नेटवर्कवर भीषण ड्रोन हल्ला
  • १.२ अब्ज डॉलर्सचे मोठे नुकसान
  • लष्करी पुरवठ्याचे केंद्र लक्ष्य

रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेले भीषण युद्ध आता थेट रशियाच्या सीमेच्या खोलवर आणि ऐतिहासिक शहरांमध्ये पोहोचले आहे. शुक्रवारी रात्री युक्रेनच्या लांब पल्ल्याच्या कामिकाझे ड्रोनने (Kamikaze Drones) रशियातील सर्वात मोठे ऑनलाइन रिटेल नेटवर्क असलेल्या ‘वाइल्डबेरीज’ (Wildberries) च्या अनेक लॉजिस्टिक्स केंद्रांना लक्ष्य करून मोठा तांडव घडवून आणला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मूळ गाव मानल्या जाणाऱ्या आणि कडक हवाई सुरक्षा असलेल्या सेंट पीटर्सबर्ग (St. Petersburg) शहरासह व्याप्त क्रिमिया आणि त्हेर शहरात एकाच वेळी हे भीषण हल्ले करण्यात आले. या हल्ल्यानंतर उसळलेल्या आगीच्या ज्वाळा आणि विषारी धुराच्या लोटामुळे सेंट पीटर्सबर्ग शहराचा परिसर झाकला गेला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Elon Musk: ‘माझी जोडीदार अर्धी भारतीय’; वंशवादाच्या आरोपांवर एलॉन मस्क यांचे प्रत्युत्तर; मुलाच्या नावामागील भारतीय कनेक्शनही उघड

युक्रेनच्या सीमेपासून सुमारे १,१०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सेंट पीटर्सबर्गमध्ये यापूर्वी इतका मोठा हवाई हल्ला झाला नव्हता. सेंट पीटर्सबर्गचे गव्हर्नर अलेक्झांडर बेग्लोव्ह यांनी मॉस्कोव्हस्कोये महामार्गावरील (Moskovskoye Highway) नागरी व औद्योगिक पायाभूत सुविधांना ड्रोनने लक्ष्य केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. तसेच लेनिनग्राड ओब्लास्टच्या गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार, नोवोसातालोव्हका (Novosaratovka) येथील ई-कॉमर्स गोदामावर झालेल्या हल्ल्यात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाला सेंट पीटर्सबर्गच्या पुल्कोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Pulkovo Airport) तब्बल ५० हून अधिक विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग तातडीने थांबवावे लागले.

WATCH: Dramatic video shows the moment Ukrainian drones struck a Wildberries logistics hub in St. Petersburg, Russia, sending massive plumes of smoke and fire into the sky. pic.twitter.com/b3em3MN9dx — Breaking911 (@Breaking911) July 24, 2026

credit – social media and Twitter

रशियन अर्थव्यवस्थेला १०० अब्ज रुबलचा मोठा तडाखा

आंतरराष्ट्रीय माध्यम विश्लेषकांच्या प्राथमिक अंदाजानुसार, गेल्या आठवडाभरात युक्रेनने वाइल्डबेरीजच्या नेटवर्कवर ५ पेक्षा जास्त वेळा पद्धतशीरपणे हल्ले चढवले आहेत. या लागोपाठ झालेल्या हल्ल्यांमुळे रशियन ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचे किमान १०० अब्ज रुबल म्हणजेच अंदाजे १.२ अब्ज डॉलर्सचे अभूतपूर्व आर्थिक नुकसान झाले आहे. या गोदामांमधील अब्जावधी रुपयांचा माल, डिजिटल सर्व्हर्स आणि वाहतूक यंत्रणा जळून खाक झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की कंपनीने सेंट पीटर्सबर्ग आणि आसपासच्या प्रदेशातील आपली मुख्य वितरक केंद्रे सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरती बंद केली आहेत.

The moment many Ukrainian FP-1 drones struck the Wildberries logistics hub in St. Petersburg one by one. No air defense present. #Russia pic.twitter.com/tkAPtwsITt — NOELREPORTS 🇪🇺 🇺🇦 (@NOELreports) July 24, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: अमेरिकेचा इराणवर सलग 13 व्या रात्री भीषण हल्ले; होर्मुझच्या वादाने पेटले आखात, क्रूड ऑइल 100 डॉलर पार

युक्रेनने केवळ एकाच शहराला लक्ष्य न करता रशियन लष्कराला रसद पुरवणाऱ्या संपूर्ण साखळीवरच प्रहार केला आहे. सेंट पीटर्सबर्ग व्यतिरिक्त, रशियन ताब्यातील क्रिमियामधील सिम्फेरोपोल (Simferopol) तसेच रशियाच्या अंतर्गत भागात असलेल्या त्हेर (Tver), वोरोनेझ (Voronezh), क्रास्नोदार (Krasnodar) आणि स्टावरोपोल (Stavropol) येथील महाकाय लॉजिस्टिक्स कॉम्प्लेक्सवरही ड्रोनद्वारे बॉम्बवर्षाव करण्यात आला. या सलग कारवाईमुळे रशियातील अंतर्गत मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

One more Ukrainian drone strike on a Wildberries warehouse in St Petersburg today. The third largest facility in Russia. It’s not a military chain supply, only a marketplace with goods for women and children. It’s not a ‘victory’, it’s just terror*sm. pic.twitter.com/YMr5JopSCa — Anastasia M (@AnastasiaMazh) July 24, 2026

credit – social media and Twitter

नागरी गोदामांवर हल्ले का? झेलेन्स्की यांनी मांडली स्पष्ट भूमिका

एका प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग कंपनीच्या गोदामांना लक्ष्य का केले जात आहे, यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जागतिक समुदायासमोर वस्तुस्थिती मांडली आहे. झेलेन्स्की यांच्या मते, रशियन सरकार आणि लष्कर या ई-कॉमर्स नेटवर्कचा वापर नागरी वस्तूंऐवजी लष्करी रसद आणि हत्यारांच्या वाहतुकीसाठी करत आहे. या गोदामांमध्ये रशियन सैन्यासाठी आवश्यक असलेले ड्रोनचे सुटे भाग, सॅटेलाइट नेव्हिगेशन उपकरणे, बुलेटप्रूफ जॅकेट्स (Body Armor) आणि दारुगोळा बेकायदेशीरपणे साठवून ठेवला जात होता.

वाइल्डबेरीजची संस्थापिका तातियाना किम (Tatyana Kim) या रशियातील सर्वात श्रीमंत महिला मानल्या जातात आणि युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियन लष्कराला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत केल्याबद्दल त्यांच्यावर अमेरिका, युक्रेन आणि युरोपियन युनियनने आधीच आंतरराष्ट्रीय निर्बंध लादलेले आहेत. युक्रेनच्या सैन्य दलाने स्पष्ट केले आहे की, रशियाच्या युद्ध निधीला (War Chest) आणि लष्करी पुरवठ्याला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी या ‘दीर्घ पल्ल्याच्या आर्थिक निर्बंध’ (Long-range Sanctions) धोरणाचा भाग म्हणून हे ड्रोन्स डागण्यात आले आहेत.

Web Title: Ukraine drone attack russia saint petersburg wildberries warehouse fire pulkovo airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Russia
  • Russia and Ukraine war
  • World news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine War : पुतिन यांच्या भेटीसाठी अमेरिकेचे दूत मॉस्कोत; युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक चर्चा सुरू
1

Russia-Ukraine War : पुतिन यांच्या भेटीसाठी अमेरिकेचे दूत मॉस्कोत; युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक चर्चा सुरू

Vladimir Putin : ट्रम्प यांच्या प्रस्तावामुळे पुतिन नमले? कीववर 3 दिवस डागणार नाहीत क्षेपणास्त्रे; क्रेमलिनचा मोठा खुलासा
2

Vladimir Putin : ट्रम्प यांच्या प्रस्तावामुळे पुतिन नमले? कीववर 3 दिवस डागणार नाहीत क्षेपणास्त्रे; क्रेमलिनचा मोठा खुलासा

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
3

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
4

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.