Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेलेन्स्कींचा अमेरिकेवरील विश्वास उडाला; रशिया पुढे झुकले डोनाल्ड ट्रम्प

सध्या रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ट्रम्प यांनी युक्रेन व युरोपला युद्धातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सौदी अरेबियात चर्चा देखील झाली.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 20, 2025 | 10:47 AM
Ukraine looses faith in America to stop war with Russia

Ukraine looses faith in America to stop war with Russia

Follow Us
Follow Us:

कीव: सध्या रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ट्रम्प यांनी युक्रेन व युरोपला युद्धातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सौदी अरेबियात चर्चा देखील झाली. मात्र, ट्रम्प यांची भूमिका कमकुवत होत चालली असल्याचे म्हटले जात आहे. कारण अरिकन प्रशासन आता थेट रशियाशी चर्चा करत आहेत. तसेच या चर्चेचा मुख्य उद्देश युक्रेन युद्ध थांबवणे बाजूला राहिला असून अमेरिका-रशिया संबंधांवर भर देण्यात येते आहे.

अमेरिका भूमिकेत कमकुवत? 

दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या रियाध येथे झालेल्या रशियन व अमेरिकन अधिकाऱ्यांच्या चर्चेत अनेक प्रश्न समोर आले. युक्रेनटे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या सल्लागारा पोडोल्याक यांनी दावा केला आहे की, अमेरिका आपल्या भूमिकेत कमकुवत पडत आहे आणि शांतता चर्चेपूर्वी रशियाला कूटनीतिक आघाडी दिली आहे.

ट्रम्प यांनी अलीकडेच केलेल्या एका विधानानंतर पोडोल्याक यांनी प्रतिक्रिया दिली, यामध्ये ट्रम्प यांनी युद्धासाठी कीव जबाबदार असल्याचे म्हटले होते. आता या युद्धाला पुठील आठवड्यात तीन वर्षी पूर्ण होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युक्रेन युद्ध थांबेल का? सौदी अरेबियातील रशिया बैठकीचा अमेरिकेला फायदा, नेमकं प्रकरण काय?

पोडोल्याक यांची प्रतिक्रिया 

सौदी अरिबयाची राजधानी रियाध येथे अमेरिकन व रशियन अधिकाऱ्यांनी चर्चा केली, मात्र या चर्चेत युक्रेनचा नव्हे तर युरोपियन युनियनचा देखील सहभाग नव्हता. यामुळे पोडोल्याक यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, “आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देशाला निर्णय प्रक्रिया सोपवायची म्हणजे काय?” त्यांना पूर्वी झालेल्या कोणत्याही चर्चेची माहिती देण्यात आलेली नाही. पोडोल्याक यांनी असेही म्हटले की, अमेरिकेच्या ‘ताकदीच्या माध्यमातून शांतता’ या संकल्पनेत खूप कमकुवतपणा आहे.

युक्रेनमध्ये निवडणुकांची मागणी

याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमध्ये निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, झेलेन्स्की हे निवडणुकांशिवाय सत्तेत असल्यामुळे त्यांना निवडणुकीला सामोरे जायला हवे. मात्र, कीव प्रशासनाने सांगितले की युद्धाच्या काळात निवडणुका घेणे संविधानाच्या विरोधात आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरही झेलेन्स्की यांच्यावर टीका करत त्यांना ‘तानाशाह’ म्हटले.

युक्रेनचा अमेरिकेवरील विश्वास उडाला

मात्र, पोडोल्याक यांनी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की रशियावर तीव्र नाराज असून युक्रेनच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा रशिया प्रयत्न करेल असा दावाही पोडोल्याक यांनी केला आहे. युक्रेनच्या भूमिकेला डावलून चाललेल्या या घडामोडींनी युक्रेनची चिंता वाढवली आहे, आणि आता युक्रेनला शांतता प्रक्रियेबाबत अमेरिकेवर फारसे विश्वास राहिलेला दिसत नाही.

जागतिक घडमोडी संबंधित बातम्या-  युक्रेनला शांतता चर्चेतून वगळल्याने राष्ट्राअध्यक्ष झेलेन्स्की संतापले; म्हणाले…

Web Title: Ukraine looses faith in america to stop war with russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
3

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
4

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.