युक्रेनची राजधानी कीव (Kyiv) येथे बुधवारी एक हेलिकॉप्टर (Ukraine Helicopter Crash ) कोसळले. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा अपघात बालसंगोपन केंद्र आणि शाळा (बालवाडी) जवळ झाला. या अपघातात 2 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की (ukraine home minister died in helicopter Crash ) यांचा समावेश आहे.
[read_also content=”प्रेम,आत्महत्या,लग्न! असा घडला उलटा प्रवास, मेल्यानंतर ‘या’ जोडप्याच्या डोक्यावर पडल्या अक्षता https://www.navarashtra.com/india/gujarat-couple-statue-marriage-after-loves-commit-suicide-nrps-362681.html”]
युक्रेनच्या ‘कीव इंडिपेंडंट’ वृत्तपत्रानुसार – हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेल्या सर्व 9 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. हेलिकॉप्टरचा अपघात झाला तेव्हा एका शाळेत मुलं उपस्थित होते. या अपघातात एकूण 22 जण जखमी झाले असून यामध्ये कर्मचाऱ्यांसह 10 मुलांचा समावेश आहे.
या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. हेलिकॅाप्टरचा अपघात झाल्यानतंर शाळेत आग लागली. कीवचे राज्यपाल ओलेसी कुलेबा यांनी सांगितले की, – बालवाडीजवळ हा अपघात झाला. यामध्ये लहान मुलांसह काही कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात ग्रस्त झालेलं हेलिकॉप्टर ते कोणत होतं आणि त्याचे अपघाताचे कारण काय हे अद्याप अधिकाऱ्यांनी सांगितलेले नाही.
घटनेच्या वेळी परिसरात दाट धुके होते आणि काही वेळापूर्वी बर्फवृष्टी झाली होती. त्यामुळेच हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. खराब हवामानामाळे अपघात झाल्याचही काही तज्ञांच मत आहे. तर, त्याचवेळी, रशियाने या हेलिकॉप्टरला लक्ष्य केल्याच काही जणांनी मत व्यक्त केलं आहे. अपघात स्थळी काही विद्युत ताराही तुटलेल्या आढळून आल्या आहेत. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरच्या पायलटला तारा दिसत नव्हते त्यामुळे हा अपघात झाल्याचही बोललं जात आहे. अपघातानंतर बालवाडीच्या इमारतीलाही आग लागली.
????”As a result of a helicopter crash near a kindergarten in Brovary, 5 people lost their lives, among them may be children,” — the speaker of the Kiev region police Irina Pryanishnikova.
— AZ ???? (@AZgeopolitics) January 18, 2023