Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

G-20 तून मोठा संदेश! UN प्रमुखांचे सदस्य शक्तींना जागतिक शांततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन

G-20 Summit : दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच जी-२० शिखर परिषदत पार पडत आहे. यासाठी भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आहे. याच वेळी UN चे सेक्रेटरी गुटेरस यांनी मोठा संदेश दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 22, 2025 | 03:48 PM
UN Secretary-General Antonio Guterres

UN Secretary-General Antonio Guterres

Follow Us
Close
Follow Us:
  • G-20 तून मोठा संदेश
  • संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचे सर्व देशांना एकत्र येण्याचे आवाहन
  • जाणून घ्या आणखी काय म्हणाले गुटेरस?
 

G-20 Summit news in Marathi : जोहान्सबर्ग : यंदा २०२५ ची जी-२० शिखर परिषद दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे सुरु आहे. २१ ते २३ नोव्हेंबर ही परिषद असणार असून आज या परिषदेचे दुसरे सत्र सुरु आहे. या परिषदेत भारतासह इतर जागतिक प्रतिनिधी उपस्थित राहिले आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस देखील या परिषदेसाठी उपस्थित असून त्यांनी इथून मोठा संदेश जगाला दिला आहे.

ट्रम्पचा अडमुटेपणा कायम! G-20 शिखर परिषदेत जाण्यास दिला नकार; दक्षिण आफ्रिकेला गटातून बाहेर काढण्याची मागणी

G-20 तून गुटेरस यांचा मोठा संदेश

अँटोनियो गुटेरस यांनी जी-२० शक्तींना जगाच्या शांततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जी-२०च्या सर्व सदस्य राष्ट्रांना त्यांच्या शक्तीचा वापर जगभरातील अडचणी कमी करण्यासाठी वापरावे असे म्हटले आहे. यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आणि त्याची अमंलबजावणी करण्याचे गुटेरस यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) जोहान्सबर्ग येथे गुटेरस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्या नेतृत्व आणि दूरदृष्टीची वेळ आहे, यामुळे जी-२० च्या नेत्यांसाठी केवळ एकच संदेश, एकत्र येऊ जगभरातील अडचणी दूर करा. जगभरात सुरु असलेले संघर्ष हवामान बदल, आर्थिक अनिश्चितता आणि कमी होण्याऱ्या जागतिक मदतीवर पुन्हा एकत्र या.

गुटेरस यांनी पुढे म्हटले की, वाढत्या संघर्षामुळे लष्करी खर्च वाढत आहे. यामुळे देशांच्या विकासासाठी संसाधनांची कमरता निर्माण होत आहे. यामुळे जी-२० देशांनी आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांनी अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या देशाच्या आणि जगाच्या चांगल्या भविष्यासाठी, शांततापूर्ण जीवनासाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि याची ताकद केवळ या जी-२० देशांमध्ये असल्याचे गुटेरस यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी परिषदेला उपस्थित

यापूर्वी २०२३ मध्ये जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताने भूषवले होते. याच वेळी दक्षिण आफ्रिकेला याचे सदस्यत्व मिळाले. यासाठी भारताने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणून भारताला ग्लोबल साउथचा आवाज म्हणून ओळखले जाऊ लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची परिषदेला उपस्थिती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावणारी आणि एक राजनैतिक आदर्श ठरत आहे.

या परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

या परिषदेदरम्यान शाश्वत विकास, जागतिक प्रशासनांमध्ये सुधारणा, हवामान बदल आणि पर्यावरणीय आव्हाने , आर्थिक संकट, डिजिटल विकास, उर्जा संक्रमणावर, स्टार्टअप्सवर, कृत्रिम बुद्धमत्ती (AI Intelligence) या मुद्यांवर चर्चा होईल. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अमेरिकेच्या बहिष्कारानंतरही मोदी या परिषदेला जात आहे. यामुळे परिषदेत मोदींची काय भूमिका असेल याकडे सर्वजण बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

अमेरिकेच्या विरोधाला भारताकडून कचऱ्याची टोपली? दक्षिण आफ्रिकेतील G-20 मध्ये PM मोदी राहणार उपस्थित

💡

Frequently Asked Questions

  • Que: G-20 तून संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी अँटोनियो गुटेरस यांनी काय संदेश दिला?

    Ans: संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी अँटोनियो गुटेरस यांनी जी-२० शक्तींना जागतिक शांततेसाठी एकत्र येण्याचे आणि अडचणींवर, संघर्ष, हवामान बदल, आर्थिक अनिश्चितता यांसारख्या विषयांवर संयुक्तपण निराकरण करण्याचे आवाहन केले आहे.

  • Que: G-20 परिषदेत कोणत्या मुद्यांवर चर्चा होणार आहे?

    Ans: या परिषदेदरम्यान शाश्वत विकास, जागतिक प्रशासनांमध्ये सुधारणा, हवामान बदल आणि पर्यावरणीय आव्हाने , आर्थिक संकट, डिजिटल विकास, उर्जा संक्रमणावर, स्टार्टअप्सवर, कृत्रिम बुद्धमत्ती या मुद्यांवर चर्चा होणार आहे.

Web Title: Un secretary general antonio guterres calls on g 20 powers to unite for world peace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • G-20 Summit
  • South Africa
  • World news

संबंधित बातम्या

भारत होणार मालामाल! दुबई एअर शोमध्ये ‘BrahMos’ खरेदीदारांच्या रांगा
1

भारत होणार मालामाल! दुबई एअर शोमध्ये ‘BrahMos’ खरेदीदारांच्या रांगा

Donald Trump Jr: ट्रम्प ज्युनियरचा हाय-प्रोफाइल भारत दौरा; ताजमहाल ते वनतारा आणि उदयपूरच्या शाही लग्नालाही राहणार उपस्थित
2

Donald Trump Jr: ट्रम्प ज्युनियरचा हाय-प्रोफाइल भारत दौरा; ताजमहाल ते वनतारा आणि उदयपूरच्या शाही लग्नालाही राहणार उपस्थित

पंतप्रधान मोदी आजपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर; तीन दिवसांचा असणार दौरा
3

पंतप्रधान मोदी आजपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर; तीन दिवसांचा असणार दौरा

Meta ची मोठी कारवाई! ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांचे Instagram-Facebook अकाउंट करणार ब्लॉक
4

Meta ची मोठी कारवाई! ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांचे Instagram-Facebook अकाउंट करणार ब्लॉक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.