अमेरिकेकडून येमेनमधील हुथी बंडोखोरांवरील हल्ल्यात देशाच्याच लढाऊ विमानावर गोळीबार
वॉश्गिंटन: काही दिवसांपूर्वी अमेरिकेने येमेनमधील हूथी बंडखोरांच्या ताब्यातील राजधानीवर मोठा हवाई हल्ला केला होता. या कारवाईत विद्रोह्यांच्या क्षेपणास्त्र साठ्यांच्या ठिकाणांचे आणि ‘कमांड आणि कंट्रोल’ सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुसकसान झाले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, लाल समुद्रावरून येणाऱ्या हूथी बंडखोरांच्या ड्रोन्स आणि जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रावरही हल्ले करण्यात आले. दरम्यान अमेरिकेन स्वत:च्याच एका लढाऊ विमानावर हल्ला केला.
F/A-18 लढाऊ विमानावर गोळीबार अमेरिकेकडून गोळीबार
यामुळे हूती विद्रोह्यांच्या कारवायांना मोठा फटका बसला आहे. या मोहिमेदरम्यान एक विचित्र घटना घडली. अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेने चुकून एफ/ए-18 लढाऊ विमानावर गोळीबार केला आणि त्याला पाडले. या लढाऊ विमानात दोन पायलट होते, पण ते सुरक्षित आहेत. त्यापैकी एका पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. सेंट्रल कमांडने सांगितले की, ही घटना कशामुळे घडली याचा शोध घेण्यात येत आहे.
घटनेचा तपास सुरू
F/A-18 हे विमान ‘यूएसएस हैरी एस. ट्रूमन’ या विमानवाहू नौकेवरून उड्डाण करत होते, तर ‘यूएसएस गेटीसबर्ग’ या युद्धनौकेने चुकून त्याला शत्रूचे विमान किंवा क्षेपणास्त्र समजून लक्ष्य केले. युद्धनौकेचे रडार आणि रेडिओ प्रणाली कार्यान्वित असूनही ही चूक कशी घडली, याबाबत सध्या तपास सुरू आहे. लाल समुद्र क्षेत्र सध्या अत्यंत धोकादायक बनले आहे. हूथी बंडखोरांनी जहाजांवर सतत हल्ले केले आहेत, यामुळे या क्षेत्रात गस्त घालणाऱ्या अमेरिकन आणि युरोपीय सैन्य दलांसाठीही आव्हाने उभी राहिली आहेत. या हल्ल्यांनी हूती विद्रोह्यांच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या क्षमतेवर परिणाम केला आहे.
लाल समुद्रातील सुरक्षावर प्रश्नचिन्ह
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या निवेदनानुसार, युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी हूथी विद्रोह्यांनी डागलेल्या अनेक ड्रोन्स आणि एक जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्र नष्ट केले. परंतु चुकून F/A-18 विमान पाडण्याच्या घटनेने अमेरिकन सैन्य मोहिमेत झालेल्या त्रुटीवर प्रकाश टाकला आहे. या घटनेने येमेनमधील संघर्षात आणखी गंभीरता निर्माण केली आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमुळे हूथी विद्रोह्यांचे मोठे नुकसान झाले असले, तरी अशा चुकांनी लाल समुद्रातील सुरक्षा आणखी कठीण बनली आहे.
इस्त्रायलचाही हुथीं बंडखोरांवर हल्ला
इस्त्रायल सेना सध्या विविध मोर्च्यांवर लढत आहे. इस्त्रायली सैन्य एकीकडे गाझामध्ये हमासविरोधी तर दुसरीकडे लेबनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी गटांवविरोधात इस्त्रायलचे युद्ध सुर आहे. तिऱ्या बाजूल इस्त्रायल सीरियामध्ये बंडखोरांविरोधात मोठी भूमिका बजावत आहे. दरम्यान त्यांनी येमेनमधील हुथी बंडखोरांवरही हल्ले केले आहेत. इस्त्रायलने येमेनमधील हूथी विद्रोह्यांच्या गडावर भीषण हवाई हल्ले केले असून, त्यामध्ये अनेक ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत.