GBU‑57 Massive Ordnance Penetrator : पश्चिम आशियात युद्धसदृश स्थिती अधिकच गडद होत चालली आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावाचा भडका उडण्याची शक्यता वाढली आहे, कारण अमेरिकेने आपले प्राणघातक बी-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्स डिएगो गार्सिया येथील हवाई तळावर पाठवले आहेत. यासोबत आठ केसी-135 रिफ्युएलिंग टँकर विमानेही पाठवण्यात आली आहेत. या हालचालींमुळे हे स्पष्ट होत आहे की अमेरिका इराणच्या फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पावर संभाव्य हल्ल्याची तयारी करत आहे.
व्हाईटमन एअरबेसवरून बी-2 ची उड्डाणे सुरू
बी-2 बॉम्बर्स मिसुरीमधील व्हाईटमन एअरफोर्स बेसवरून रवाना झाली असून, हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया बेटावर तैनात केली जात आहेत. डिएगो गार्सिया हा अमेरिकेचा सर्वात महत्त्वाचा रणनीतिक हवाई तळ असून, पर्शियन आखात व इराणसारख्या देशांवर हल्ले करण्यासाठी येथेून थेट कारवाई करता येते. बी-2 बॉम्बर्सची ही तैनाती सामान्य बॉम्बिंग मिशन नसून एक गंभीर धोरणात्मक सिग्नल मानली जात आहे.
फोर्डो – इराणचा अणुकिल्ला
इराणमधील फोर्डो युरेनियम समृद्धी केंद्र हे जमिनीपासून तब्बल 90 मीटर खोल खडकांमध्ये वसलेले आहे. याला इराणचा ‘अणुकिल्ला’ म्हणतात. हे स्थळ इतके सुरक्षित आहे की सामान्य बॉम्बने ते नष्ट करणे अशक्य आहे. फक्त अमेरिकन Massive Ordnance Penetrator (MOP) बॉम्बच याला भेदू शकतात. हे बॉम्ब बी-2 किंवा बी-52 सारख्या मोठ्या विमानांमधून टाकले जातात. पण बी-52 मध्ये स्टेल्थ क्षमता नसल्याने बी-2 हेच या मोहिमेसाठी योग्य मानले जात आहे, कारण हे रडारला चकमा देण्यास सक्षम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel- Iran War: इराण इस्त्रायल युद्ध पार्श्ववभूमीवर ‘हा’ अनोख्या मिसाइलचा VIDEO सोशल मीडियावर का होतोय इतका VIRAL??
डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश?
अहवालानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याची परवानगी दिली आहे, पण प्रत्यक्ष कारवाईसाठी काही वेळ मागितला आहे. या हालचालीमुळे अमेरिका गंभीर स्थितीकडे झुकतेय हे स्पष्ट होत आहे. बी-2 बॉम्बर्सना ‘फर्स्ट स्ट्राइक’ प्लॅटफॉर्म मानले जाते आणि त्यांची उपयोगिता खास करून शत्रूच्या अणुक्षेत्रांवर प्रथम आघात करण्यासाठी असते.
बी-2 – अमेरिका आणि जगाचे सर्वात प्रगत सामरिक शस्त्र
बी-2 बॉम्बर्स हे केवळ रडारला टाळणारे विमान नाहीत, तर ते 30,000 पौंड वजनाचे MOP बॉम्बही वाहून नेऊ शकतात, जे जमिनीखालच्या बंकर व मजबूत लक्ष्यांना उद्ध्वस्त करू शकतात. त्यांची रचना एवढी प्रगत आहे की कोणतीही रडार प्रणाली त्यांना सहजपणे पकडू शकत नाही. सुमारे 9,600 किमी इतकी प्रचंड रेंज असलेले बी-2 जगातील कोणत्याही भागात मोहिम पार पाडू शकते.
NITRO61 FLT (KC-135s) departed Altus AFB, OK joining with MYTEE21 FLT (B-2s) from Whiteman AFB, MO. pic.twitter.com/WhJfVhmg2S
— Aircraft Spots (@AircraftSpots) June 21, 2025
credit : social media
डिएगो गार्सियाची निवड का?
डिएगो गार्सिया बेट हे अमेरिका आणि ब्रिटनच्या ताब्यात असलेले धोरणात्मक स्थान आहे. येथून इराण, पर्शियन आखात आणि आशियाई देशांवर कोणतेही ओव्हरफ्लाइट निर्बंध न घेता थेट हवाई कारवाई करता येते. यापूर्वी अमेरिकेने इराक, अफगाणिस्तान आणि लिबियामधील मोहिमांमध्ये याच एअरबेसचा वापर केला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : फ्रान्सची आण्विक झेप; रशियाच्या अणुधमक्यांवर तोडगा, ‘Super Rafale’सह नवीन Airbase उभारणीचा निर्णय
इराण-अमेरिका संघर्ष शिगेला
बी-2 बॉम्बर्सची तैनाती म्हणजे अमेरिकेची ‘रेड लाइन’ ओलांडण्याच्या तयारी आहे. इराणचा फोर्डो प्रकल्प हे अमेरिकेसाठी ‘टार्गेट नंबर वन’ बनले असून, युद्धाची शक्यता आता अधिक भासत आहे. पेंटागॉनकडून अद्याप औपचारिक घोषणा करण्यात आलेली नसली, तरी डिएगो गार्सियावर बी-2 च्या उपस्थितीने जागतिक लक्ष वेधले आहे. यामुळे संपूर्ण पश्चिम आशिया पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे.