Syria's government signs deal with Kurdish-led authorities in the northeast
दमास्कस: सीरियातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरिकेच्या कुर्दिश सैन्यानेतृत्वाखाली सीरियन डेमोक्रिटिक फोर्स राज संस्थांमध्ये विलिन झाले आहे. सीरियन केंद्र सरकारने ईशान्येकडील भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी कुर्दिश नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारात युद्धबंदी आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने सीरियन सैन्याचे लष्करी सैन्यात समावेश करण्यात आले आहे. कुर्दिश सैन्याचे कमांडर इन-चीफ मजलूम अब्दी हे सीरियाचे अल-शाम तहरीर गटाचे प्रमुख अल-जुलानी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. हा करार अचानक झाल्याने जागतिक स्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
SDF चे सीरियन सैन्यात विलनीकरण
सीरियन सरकारने सांगितले की, या करारानुसार सीरियन डेमोक्रॅटिकचा(SDF) समावेश राज्य संस्थांमध्ये केला जाणार आहे. यामुळे SDF मधील लढाऊ शक्ती सीरियन सैन्यात सामील होणार आहे. या करारनुसार, उत्तर-पूर्व सीरियातील नागरी आणि लष्करी संस्था सीरियाच्या नियंत्रणाखाली येतील. यामध्ये सीमेवरील भाग, विमानतळ, तेल व गॅस क्षेत्रांचा समावेश आहे. गेल्या काही काळापासून कुर्दिश समुदाय वेगळ्या स्वायत्त प्रदेशाच्या मागणीसाठी संघर्ष करत होता. आता त्यांचा हा लढा संपुष्टात आला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सीरियातील सध्याचा संघर्ष
सध्या सीरियात हयात तहरीर अल-शाम (HTS) आणि अलावी समुदायामध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. अलावी समुदाय हा सीरियाचे माजी अध्यक्ष बशर अल-असद यांचा समर्थक मानला जातो. मात्र HTS ने देशभरताली सर्व लहान मोठ्या लष्करी संघटनांना त्यांच्या नियंत्रणाखाली येण्याचा आदेश दिला आहे. असद समर्थित गट अलावी समुदायाला हे मान्य नसल्याने त्यांनी अल-शाम गटावर हल्ला केला. या संघर्षामुळे हडारो लोक मृत्यूमुखी पडले.
मात्र, सीरियन डेमोक्रॅटिक सैन्य आणि सीरियाच्या नवीन सरकारमध्ये झालेला हा करार HTS च्या भितीमुळे करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, सीरियन सरकारसोबत करार न केल्यास SDF वर कठोर कारवाईची शक्यता आहे. यामुळे SDF ने सीरियच्या नवीन सरकारशी HTS सोबत हात मिळवणी केल्याचा अंदाज बांधला जात आहे.
SDF तुर्कीचा मोठा विरोधक
सीरियन डेमोक्रॅटिक फोर्स (SDF) हा अमेरिका समर्थित गट आहेय या गटाने 2015 पासून उत्तर-पूर्व सीरियात अर्थ-स्वायत्त नियंत्रण स्थापन केले. मात्र, हा गट तुर्कीसाठी मोठा धोका असल्याचे मानले जाते. कारण तुर्कीच्या मते, अमेरिकेन समर्थित SDF हा तुर्कीचा मोठा विरोधक आहे.यामुळे तुर्की समर्थित सीरियन सरकारने (HTS) सरकारने केलेल्या कराराचा काय परिणाम होईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सध्या जागतिक स्तरावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.